या वर्षीची हरितालिका तृतीया आहे खूपच विशेष, जाणून घ्या तारीख, पूजनवेळ, पूजाविधी, व्रतकथा आणि कशी साजरी करायची…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

आपल्या पतीचे शुभ कल्याण आणि दीर्घायुष्यासाठी महिलांनी करावयाची हरितालिका व्रतपूजा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेच्या दिवशी असते. यावर्षी हरितालिका २१ ऑगस्टला आहे.

या दिवशी महिला दिवसभर निर्जला व्रत ठेवतात आणि संध्याकाळी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर पतीच्या हस्ते पाणी पिऊन त्याच्या आशीर्वादाने हे व्रत पूर्ण करतात. काही ठिकाणी कुमारी मुली योग्य वरासाठी व्रत ठेवतात. हे व्रत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि राजस्थानमध्ये साजरे केले जाते. चला या व्रताशी संबंधित परंपरा आणि श्रद्धा जाणून घेऊया…

WhatsApp Image 2020 08 17 at 9.07.00 AM 1 1

हरितालिका या व्रतामध्ये भगवान शिव आणि देवी पार्वती यांची एकत्रितपणे पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया सूर्योदय होण्यापूर्वी उठतात आणि आंघोळीनंतर साजशृंगार करतात. पौराणिक कथेनुसार पार्वतीने भगवान शिवशंकराला वर म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. त्यावेळी सर्वप्रथम, देवी पार्वतीने हे व्रत केले होते आणि या व्रताच्या परिणामामुळे भगवान शिवांनी पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला होता.

See also  श्री दत्त दिगंबरांच्या कृपेने या 7 राशींच्या नशिबात कुबेर योग, संपत्तीचे उघडणार भांडार, काही दिवसात बनणार धनवान…

WhatsApp Image 2020 08 17 at 9.07.00 AM 2

हरितालिका आख्यायिका :- हरितालिकेच्या व्रताची कहाणी देखील माता पार्वती आणि शिव यांच्याशी संबंधित आहे. पौराणिक कथांमध्ये असे सांगितले जाते की, वडिलांनी केलेल्या यज्ञ समारंभात, जेव्हा पार्वतीला पती शिवशंकरांचा अपमान सहन केला नव्हता, तेव्हा त्याच यज्ञकुंडातील अग्नीत तिने आत्मसमर्पण केले. मग पुढच्या जन्मामध्ये राजा हिमाचलची कन्या उमा म्हणून ती जन्मली आणि मग या जन्मात तिने भगवान शिव यांना आपला पती म्हणून स्वीकारले.

भगवान शिवांची जीवनशैली व वेशभूषा राजा हिमाचलला पसंत नव्हती. या संदर्भात त्यांनी नारदजींशी चर्चा केली तेव्हा नारदजींनी त्यांना उमाचे विष्णूशी लग्न करण्याचा सल्ला दिला. उमा तर शिवाला तिचा नवरा मानत असल्यामुळे तिने विष्णूजीशी लग्न करण्यास नकार दिला. मग हे लग्न थांबवण्यासाठी उमाच्या मित्रांनी एक विशेष योजना बनविली.

See also  उद्याचा दिवस उगवतच भगवान श्री शिवशंकर या राशींवर मेहरबान होणार सर्व कामात यश मिळणार...

WhatsApp Image 2020 08 17 at 9.07.02 AM 1

तिचे अपहरण करुन तिला जंगलात घेऊन गेले जेणेकरुन तिला विष्णूजीशी लग्न करावे लागू नये. जंगलात उमाने शिवशंकरच वर म्हणून मिळावा यासाठी तपश्चर्या सुरू केली. त्यानंतर शिवशंकरांनी तिला दर्शन दिले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले. या व्रतामुळेच उमा-शंकर विवाह झाला, यामुळे कुमारी मुली देखील शिवशंकरांसारखा योग्य वर मिळविण्यासाठी हे व्रत करतात.

व्रतविधी:- या दिवशी महिला पार्वती देवीला सुवासींनीच्या सौभाग्याच्या सर्व वस्तू अर्पण करतात. सकाळच्या पूजेनंतर महिला दिवसभर उपवास करतात. पूजेसाठी गौरी-शंकरची मातीची मूर्ती तयार केली जाते. मनोभावे पूजाअर्चा करून आरती करतात. सुवासिनी आपल्या पतीच्या हस्ते जल प्राशन करून व्रतसमाप्ती करतात.

पूजा मुहूर्त:- दि. २१ ऑगस्ट २०२० शुक्रवार रोजीचा हरितालिका तृतीय मुहूर्त :- सकाळी हरितालिका पूजा मुहूर्ता – ८ वा. ३० मिनिटांपासून सायंकाळी ०५ वा. ५४ मिनिटांपर्यंत.

See also  या 7 राशी ची इच्छा पूर्ण करणार श्री स्वामी समर्थ या राशींना भरपूर पैसा आणि प्रतिष्ठा मिळणार…

प्रदोषकाल हरितालिका पूजा मुहूर्ता :- संध्याकाळी ६ वा.४५ मि. पासून ते रात्री ९ वा. ३० मि. पर्यंत.
शुभं भवतु:!

 

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment