सुप्रसिद्ध पत्रकार हर्षदा स्वकुळ ने का सोडलं एबीपी माझा? जाणून घ्या काय होते कारण…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी इथं लोकांसमोर मांडल्या जातात. माहितीचा पुरवठा करणारं जलद माध्यम असंही याकडे पाहिलं जातं.

Advertisement

आज देशभरात प्रत्येक भाषेत त्यांचे न्यूज चॅनेल आणि न्यूज पेपर आहेत. अनेक लोक तिथे पत्रकार म्हणून काम करत आहेत. पण यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच फक्त आपल्याला माहीत असतात. कारण ते त्यांच्या कामामुळे प्रसिध्द होतात. आज आपण अशीच एबीपी माझाची एक प्रसिध्द न्यूज अँकर चा प्रवास जाणून घेणार आहोत. तिचं नाव आहे हर्षदा स्वकुळ.

103251879 4115922905136097 1213453990769405879 o

हर्षदा ही मूळची पुण्याची. पुण्यातल्या फर्ग्युसन रोड वर असणाऱ्या त्यांच्या एका वाड्यात तिचं बालपण ते मोठेपण गेलं. तिनं माध्यमिक शिक्षण तिथल्याच एका शाळेतून घेतलं. पुढे महाविद्यालयीन वयात आल्यावर तिला कथक आणि नाटकाची आवड निर्माण झाली. पुरुषोत्तम करंडक सारख्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धामध्ये तिनं सहभाग नोंदवला.

See also  गायक नेहा कक्करच्या हनिमून हॉटेलचं एका दिवसाचं भाडं ऐकून थक्क व्हाल...
Advertisement

आपण पुढे जाऊन मोठी अभिनेत्री व्हावं असं स्वप्न ती पाहत होती. ती अश्विनी साठे यांच्याकडे कथक शिकत होती. पण इंडियन एस्प्रेस सोबत मार्केटिंग टीम मध्ये काम करताना पत्रकारिता बद्दल ओळख निर्माण झाली. आणि हे काम आपण खूप उत्तम रित्या चालू करतो हे तिच्या ध्यानी आलं. मग पुढे पदवीधर झाल्यानंतर तिनं रानडे इन्स्टिट्यूट मधून पत्रकार होण्याचं शिक्षण घेतलं. तिथं तिनं चौथा नंबर ही पटकावला.

106369363 561816764694127 4818808614541956345 n 1

मग पुढे ती पुण्यातून एबीपी माझा साठी २०१३ पासून एक रिपोर्टर म्हणून काम करू लागली. पुढे हळूहळू कामाच्या उत्तम प्रदर्शनात तिनं मुंबई ऑफिस मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून झेप घेतली. मग तिथून ती परिश्रमाने न्यूज अँकर म्हणून काम करू लागली.

Advertisement

प्रत्येकाची सकाळ ही रोज उठलं की बातम्यांचा आढावा घेऊन होत असते. अनेकजण असे म्हणतात की हर्षदा स्वकुळ च्या हास्य चेहऱ्यावर आत्मविश्वासाने बातमी पाहिली की दिवस चांगला जातो. तिचे दिवसेंदिवस अनेक चाहते महाराष्ट्रात तयार झाले आहेत. ती एक प्रसिद्ध न्यूज अँकर बनली होती.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीने मोराच्या जवळ जाऊन फोटो काढण्याचा केला प्रयत्न तर मोराने केलं असं काही कि...

101037661 2565502890377700 8572953545160249732 n 1

महाविद्यालयात शिकत असताना ऑरकुट या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची गौरव या तरुणाशी ओळख झाली. हीच ओळख पुढे मैत्रीत बदलली आणि मैत्री लग्नात. दोघांचही प्रोफेशनल आयुष्य वेगळं होतं. हर्षदा पुढे न्यूज अँकर पत्रकार बनली. आणि गौरव इंजिनिअरिंग पूर्ण करून नोकरी साठी ऑस्ट्रेलियात गेला.

Advertisement

मग तिथून पुढे तिचं लॉंग दिसटन्स रिलेशनशिप सुरू झाली. पण पुढे काय होईल याचा कसलाच नेम नसतो. करोना आला आणि सगळं जग विस्कळीत झालं. न्यूज चॅनेल ही बंद म्हणजे घरून शक्य तेवढी कामे होऊ लागली. अनेक लोकं आपापल्या कुटुंबा सोबत राहू लागले. एकमेकांना साथ देऊ लागली. पण हर्षदा आणि गौरव दोघेही इकडे आड आणि तिकडे विहीर अश्या परिस्थितीत दोन देशात दोन.

See also  या बॉलिवूड अभिनेत्रीच्या वडिलांनी कर्ज काडून घेतले होते घर, आज ती आहे बॉलिवूडमधील सर्वात यशश्वी अभिनेत्री...

101467631 2943684335679518 4710666709449572352 n

हर्षदा ने खुप विचार करून शेवटी ऑस्ट्रेलिया ला कायमस्वरूपी राहायला जाऊन आपल्या नवऱ्याला साथ द्यायची ठरवली. आणि काही दिवसांपूर्वी तिनं एबीपी माझा चॅनेल सोडलं. आज ती ऑस्ट्रेलिया मधल्या सिडनीत एका हॉटेल मध्ये विलगीकरण मध्ये आहे. चौदा दिवसांनी ती गौरव कडे मेलबर्न ला जाणार आहे.

Advertisement

Posted by Harshada Sahasrabudhe – Swakul on Tuesday, 16 June 2020

आज खरचं अनेक तिचे एबीपी चे चाहते तिला मिस करत आहेत. पण काही दिवसांपूर्वी तिनं एक व्हिडिओ बनवला होता. त्यात ती असं म्हणतेय की मी एबीपी माझा सोडलं आहे ; पण पत्रकारिता नाही. तिनं एक युट्युब चॅनेल सुरू केलेलं आहे. त्या माध्यमातून ती बातम्या, कला, किंवा इतर सर्व गोष्टी मराठीतूनच घेऊन येणार आहे. ऑस्ट्रेलियन जीवनप्रवास भेटीला आणणार आहे. हर्षदा ला तिच्या नव्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा !…

Leave a Comment

close