“रंग माझा वेगळा” मालिकेतील अभिनेत्री हर्षदा खानविलकरची बहीण सुद्धा आहे ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री…
सध्या मराठी मालिका या चांगल्याच लोकप्रिय होत आहेत. मग त्या कोणत्याही चॅनेल्स च्या असो. सध्या स्टार प्रवाह जोरात आहे टीआरपी च्या बाबत ही. तर चाहत्यांचं असतं की ज्या अभिनेते अभिनेत्री या आवडतात त्यांच्या खऱ्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. जी आता संपणार आहे. चला
तर आज आपण रंग माझा वेगळा मधील एका प्रसिद्ध अभिनेत्री च्या बहिणी बद्दल जाणून घेणार आहोत. जी स्वतः एक आहे प्रसिद्ध अभिनेत्री.
स्टार प्रवाह ( star pravah )वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील कार्तिक, दीपा, सौंदर्या अशा सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेत सौंदर्याची भूमिका साकारक आहे अभिनेत्री हर्षदा खानविलकर.
हर्षदा खानविलकर (harshda khanvilkar) बऱ्याच वर्षांपासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करत आहेत. पण हर्षदा खानविलकर ही एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीची बहिण आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. चला तर जाणून घेऊया हर्षदा खानविलकर हिच्या बहिणीबद्दल.
अभिनेत्री हर्षदा खानविलकर सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल देशपांडेची ( mrunal deshpande ) बहिण आहे. तसेच अभिनेत्री मृणाल देशपांडे अभिनेत्री समिधा गुरूची ( samidha guru ) थोरली बहिण आहे हे देखील लोकांना माहित नाही. समिधा गुरू सध्या कलर्स मराठीवरील ‘शुभमंगल ऑनलाइन’ ( shubhmangal online ) मालिकेत ऐश्वर्याची भूनमिका साकारते आहे.
या दोघीही सख्ख्या बहिणी आहेत. मग, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की मृणाल देशपांडे आणि समिधा गुरू या सख्ख्या बहिणी आहेत तर मग हर्षदा खानविलकर कोण? तर हर्षदा खानविलकर मृणाल देशपांडेची मानलेली बहिण आहे. काही दिवसांपूर्वीच मृणाल देशपांडेने सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोत ती बहिण हर्षदा खानविलकरसोबत दिसून आली.
अभिनेत्री हर्षदा खानविलकरचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. हर्षदाचा यंदाचा वाढदिवस दोघी बहिणींनी एकत्रित साजरा केला. या दोघींनी यापूर्वी ‘पुढचे पाऊल’ या मालिकेत एकत्र काम केले आहे.
या मालिकेच्या दरम्यान हर्षदा आणि मृणाल या दोघींमध्ये अगदी स्पेशल नाते बनत गेले. हे नाते पुढे आणखी घट्ट होत गेले की त्याचे रूपांतर मानलेल्या बहिणीच्या नात्यात झाले.
तर आलं का लक्ष्यात कसं नातं आहे. जे इंडस्ट्रीतच काम करी आहे. या दोन्ही अभिनेत्री आज आघाडीवर आहेत. आपलं काम चोख वाजवत आहेत. सोशल मीडियावर ही सतत कार्यरत असतात. त्यांना त्यांच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.