कुमारिकांनी असे करावे हरतालिका व्रत, मिळेल मनोवांछित वरदान; जाणून घ्या शास्त्रोक्त व्रत पूजन संपूर्ण विधी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

.

२१ ऑगस्ट, शुक्रवारी, सुवासिनी महिलांनी शुक्रवारी निर्जला उपवास ठेवून भगवान शिवशंकर व माता पार्वती याचे भक्तिभावाने पूजन करावे.

असे मानले जाते की या दिवशी देवी पार्वतीने कठोर तपश्चर्ये करून भगवान शंकर यांना पतीच्या रूपाने प्राप्त केले. या दिवशी योग्य वर प्राप्तीची इच्छा असणाऱ्या कुमारिका हरतालिका तृतीयेची पूजा करतात आणि उपवास करतात जेणेकरुन त्यांनाही देवी पार्वतीसारखा इच्छित वर मिळू शकेल आणि जीवनात सुख , समाधान आणि आनंद मिळेल.

हरितालिकेच्या व्रताची कहाणी देखील माता पार्वती आणि शिव यांच्याशी संबंधित आहे. जेंव्हा पार्वतीच्या वडिलांनी केलेल्या यज्ञ समारंभात, जेव्हा पार्वतीला पती शिवशंकरांचा अपमान सहन केला नव्हता, तेव्हा त्याच यज्ञकुंडातील अग्नीत तिने आत्मसमर्पण केले.

See also  अनेक सुवर्ण संधी मिळणार या 8 राशींना, भगवान शिव शंकर देणार प्रभावी शक्ती, होणार धन लाभ…

मग पुढच्या जन्मामध्ये राजा हिमाचलची कन्या उमा म्हणून ती जन्मली आणि मग या जन्मात तिने भगवान शिव यांना आपला पती म्हणून स्वीकारले. भगवान शिव हे जावई म्हणून राजा हिमाचलला पसंत नव्हती. त्यांनी नारदांचा सल्ला घेतला असता नारदांनी त्यांना उमाचे विष्णूशी लग्न करण्याचा सल्ला दिला. उमेने विष्णूशी लग्न करण्यास नकार दिला.

भगवान शिवशंकरच वर म्हणून मिळावेत यासाठी तपश्चर्या सुरू केली. त्यानंतर शिवशंकरांनी तिला दर्शन दिले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले. या व्रतामुळेच उमा-शंकर विवाह झाला, अशी पौराणिक आख्यायिका आहे. यामुळे कुमारी मुली देखील शिवशंकरांसारखा योग्य वर मिळविण्यासाठी हे व्रत करतात.

हरतालिका तृतीयेच्या दिवशी महिलांनी सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नानादी देहधर्म उरकून साजेलासा साजशृंगार करावा. कुमारीकांनी आणि महिलांनी दिवसभर निर्जला उपवास ठेवावा. पूजेसाठी गौरी-शंकराची मातीची मूर्ती तयार करून तिची मनोभावे पूजाअर्चा करून आरती करावी.

See also  श्रीखंडेराया या 7 राशींच्या जीवनात आनंद भरणार, नशिब देणार साथ, लवकरच मिळणार आनंदाची बातमी …

व्रताच्या पूजेमध्ये शिव आणि पार्वतीसमवेत गणेशाचीही पूजा केली जाते. भांग, धतूरा, बेलपत्र, पांढरे चंदन, पांढरी फुले , फळे इ. यांना या पूजेमध्ये विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पूजेसाठी शक्यतो वरील वस्तू वापरल्यास चांगले.

पूजा करताना “ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप करावा.

पार्वती देवीला सुवासींनीच्या सौभाग्याच्या सर्व वस्तू जसे कुंकू, साडी चोळी, बांगड्या, मेहंदी, सौभाग्य अलंकार इ. मनोभावे अर्पण करावे.

सुवासिनींनी संध्याकाळी भगवान शिव आणि माता पार्वतीला वंदन केल्यानंतर पतीच्या हस्ते पाणी पिऊन या व्रताची सांगता करावी.

दुसऱ्या दिवशी हरतालिका तृतीया पूजनाची सर्व सामुग्री व्यवस्थित गोळा करून शक्यतो वाहत्या पाण्यात तिचे विसर्जन। करावे.

पूजा मुहूर्त:- दि. २१ ऑगस्ट २०२० शुक्रवार रोजीचा हरितालिका तृतीय मुहूर्त :- सकाळी हरितालिका पूजा मुहूर्ता – ८ वा. ३० मिनिटांपासून सायंकाळी ०५ वा. ५४ मिनिटांपर्यंत.

प्रदोषकाल हरितालिका पूजा मुहूर्ता :- संध्याकाळी ६ वा.४५ मि. पासून ते रात्री ९ वा. ३० मि. पर्यंत.
शुभं भवतु:!

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment