यंदाची हरतालिका आहे खूपच विशेष, या मुहूर्तावर पूजा केल्यास मिळेल भरपूर लाभ; जाणून घ्या पूजेची वेळ…

.

२१ ऑगस्ट २०२० शुक्रवारच्या हरतालिका तृतीयेच्या मुहूर्तावर जुळून येत आहेत अद्भुत शुभ योगायोग, यावेळी महिलांच्या उपासनेला मिळतील अनेक फायदे.

जर महिला वर्गाने आम्ही या लेखात सांगितलेल्या या शुभ मुहूर्तावर हरतालिका तृतीया पूजन केले तर तुम्हाला पतींच्या दीर्घायुष्याचे वरदान तर मिळेलच पण त्या सोबतच तुम्हाला जीवनातील सर्व सुख, समाधान, इच्छित फलप्राप्ती सुदधा मिळण्याचे शुभ संकेत दिसत आहेत. तर जाणून घेऊयात या वर्षीच्या हरतालिका तृतीयेचे शुभ योग…

या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. हरतालिका तृतीयेची पूजा अतिशय विशेष मानली जाते कारण या दिवशी देवी पार्वतीने तिला भगवान शिवशंकर पतीच्या रूपाने प्राप्त व्हावेत म्हणून भगवान शिव शंकराची पूजा केली होती.

आमच्या माता भगिनींनी हरतालिका तृतीया पूजन शुभयोगावर केले तर आपल्या या पूजनाचे आपल्याला अनेक फायदे मिळू शकतील. तर मग जाणून घ्या हरतालिका तृतीयाचे हे शुभ योगायोग कोणत्या वेळी घडत आहेत ते…
हरतालिका तृतीया योग सर्व तृतीयांमध्ये महत्वाचा आणि सर्वात मोठा शुभ संयोग मानला जातो.

या दिवशी सुवासिनी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात, तर कुमारी मुली या दिवशी सुयोग्य वरासाठी व्रत करतात. यावेळी हरतालिका तृतीयेच्या मुहूर्तावर असे अनेक शुभ योगायोग बनत आहेत. ज्यामध्ये आपल्याला हरतालिका पूजेचे अनेक फायदे मिळू शकतात.

यावर्षी २१ ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी सकाळी हरितालिका पूजा शुभ मुहूर्त पहाटे ५ वा. ५४ मि. पासून सुरू होऊन सकाळी ८. ३० मि. पर्यंत आहे.

जर कुणा माता-भगिनींना कोणत्याही कारणास्तव या मुहूर्तामध्ये पूजा करण्यास असमर्थता असल्यास आपण अभिजित मुहूर्तामध्येही पूजा करू शकता. जो सकाळी ११ वा. ५८ मि. पासून ते दुपारी १२ वा. ५० मि. या वेळेत जुळून येत आहे.

सिद्ध योग दुपारी २ वा. ०२ मि. पर्यंत असेल.

या दिवशीच्या अमृत काळ मुहूर्ता विषयी सांगायचे झाल्यास हा मुहूर्त दुपारी ३ वा. पासून ते संध्याकाळी ४ वा. २६ मि. या वेळेत असेल.

प्रदोष काळात हरतालिका तृतीयेची संध्याकाळची पूजा केली जाते. ज्याची शुभ वेळ संध्याकाळी ६ वा. ते ५४ मि. पासून सुरू होऊन रात्री ९ वा. ०६ मि. या वेळेत असेल.

हरतालिका तृतीयेचा, अंतिम शुभ योग म्हणजेच रवि योग हा रात्री ९ वा. २९ मि. ते दुसऱ्या दिवशी दिवशी पहाटे ५ वा. ते ५४ मि. पर्यंत आहे.

आमच्या सर्व माता भगिनी या सर्व योगांमध्ये हरतालिका तृतीयेची पूजा करू शकतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीला प्रसन्न करण्यस्तव मनोभावे प्रार्थना करू शकता.

हरतालिका तृतीयेच्या दिवशी ग्रह स्थाना विषयी सांगायचे झाल्यास, या दिवशी चंद्र ग्रह कन्या राशी आणि हस्त नक्षत्रात असेल. सूर्य आणि बुध हे ग्रह सिंह राशीत, शुक्र व राहु हे मिथुन राशीत असतील, धनु राशीत असतील गुरु व केतू, आणि मेष राशीत मंगळ असून मकर राशीत शनि महाराज विराजमान असतील. गुरू, शनि, सूर्य आणि मंगळ हे सर्व ग्रह त्यांच्या स्वत: च्या राशीत असल्यामुळे मुळे शुभ फळे प्रदान करतील. ज्यायोगे समस्त महिला वर्गाला हरतालिका तृतीयेच्या पूजनाचे अनेक विशेष फायदे मिळू शकतात.
शुभं भवतु:!

Leave a Comment