मराठमोळा अभिनेता मकरंद अनासपुरेच्या पत्नीला बघितलं का? आहे एक अभिनेत्री..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता मकरंद अनासपुरे प्रचंड लोकप्रिय आहे, मकरंदच्या अनेक भूमिका भरपूर गाजलेल्या आहेत.आजवर पडद्यावर विशेष आकर्षक कथानकाच्या माध्यमातून त्याने रसिकांशी मैत्री जपून ठेवली आहे. नवा नवा विषय आणि नवी नवी भूमिका नेहमीच लक्षवेधी ठरली असल्याने मकरंदची प्रसिद्धी आजही तग धरून आहे. सोशल मीडियावर तो खूप सक्रिय असतो, अनेक व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळत असतात. त्यामुळे त्याच्या आयुष्यात नेमके काय काय सुरू आहे हे त्याच्या चाहत्यांना सहज कळते.

मित्रहो आपण एक रसिक, प्रेक्षक या नात्याने मकरंदला चांगलेच ओळखतो, पण त्याच्या फॅमिली बद्दल कधी खास माहीत समोर येत नाही. तर आज आपण त्याच्या पत्नीबद्दल विशेष माहिती जाणून घेणार आहोत. आपल्या टॅलेंन्टच्या जोरावर अभिनेता मकरंद याने भरपूर लोकप्रियता आणि भूमिका मिळवल्या आहेत. अगदी तसच त्याची पत्नी देखील एक अभिनेत्री आहे, त्याच्या पत्नीचे नाव शिल्पा अनासपुरे असे असून अभिनयात ती विशेष पारंगत आहे. खूपच सुंदर आणि हुशार असे गुण असल्याने एक अभिनेत्री म्हणून तिला सहज यश मिळाले आहे.

See also  "माझं घर माझा संसार" चित्रपटातील या अभिनेत्रीला झाला होता हा घातक आजार, वयाच्या 31 व्या वर्षीच घेतला तिने जगाचा निरोप

अभिनेत्री शिल्पा अनासपुरे या हल्ली चित्रपट सृष्टीत अधिक सक्रिय नसते, लाईमलाईट पासून दूर राहून ती आपले कुटुंब आणि मुलांमध्ये सुखी जीवन जगत आहे. शिल्पा आणि मकरंद यांचा प्रेमविवाह आहे, शिल्पा ही मूळची मुंबईची असून तिने अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे. २००० साली “जाऊ बाई जोरात” यामध्ये काम करत असताना मकरंद आणि शिल्पाची भेट झाली होती. त्यावेळी मकरंदला शिल्पा खूप आवडली होती, त्याला अगदी पहिल्याच भेटीत प्रेम झाले होते.

शेवटी त्याने शिल्पाला लग्नाची मागणी घातली, शिल्पाने होकार देताच त्या दोघांनी घरात याबद्दल सांगितले. २००१ मध्ये त्या दोघांचे औरंगाबाद येथे लग्न झाले होते. या सुखी दांपत्याला एक मुलगा देखील आहे. लग्न झाल्यावर सुद्धा शिल्पाने मकरंद अनासपुरे सोबत जवळपास पाच चित्रपटात काम केले आहे. दोघांचाही अभिनय खूप छान असतो, एक कलाकार म्हणून त्यांची लोकप्रियता भरपूर आहे. पती पत्नी दोघेही आपल्या भूमिका अप्रतिम निभावतात आणि म्हणून तर आजसुद्धा त्यांना एकत्र पाहताना चाहते खूप खुश होतात.

See also  'माझा होशील ना' मालिकेतील लाडका आदित्य पडलाय या मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात, नाव ऐकून थक्क व्हाल!

शिल्पा नेहमीच आपल्या पतीला साथ देत असते, अगदी क्षणोक्षणी ती सोबत असते. पती पत्नीची ही जोडी खूपच गोड आहे. अनेक मुलाखती मध्ये अभिनेत्याने आपल्या जीवनातील काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. “गोष्ट कापूस कोंड्याची” चित्रपटात दोघेजण एकत्र झळकले होते. त्यांना या चित्रपटात एकत्र पाहून अनेकजण खुश झाले होते. ही जोडी नेहमी अशीच लोकप्रिय राहो ही सदिच्छा. त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment