अभिनेत्री क्रांती रेडकर हिचे आलिशान घर तुम्ही पाहिलेत का? खूपच सुंदर आहे तिचे हे घर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मागील कित्येक दिवसांपासून मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर हे नाव सदैव चर्चेत येत आहे. क्रांती रेडकर ही एक नावाजलेली लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपले शिक्षण तिने मुंबईतील रुईया महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. तिने 2000 साली “सून असावी अशी” या चित्रपटात अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले. यामध्ये ती अभिनेता अंकुश चौधरी सोबत दिसली होती.

kranti redkar1 1

क्रांतीने गंगाजल, फक्त लढ म्हणा, शहाणपण देगा देवा, जत्रा, श्रीमंत दामोदर पंत यांसारख्या अनेक मराठी तसेच बॉलीवुड चित्रपटांत काम केले आहे. “कोंबडी पळाली” हे तिचे गाणे सुप्रसिद्ध गाण्यांपैकी एक आहे. 20 14 मध्ये प्रदर्शित झालेल्या “द लेटर्स” हा मदर तेरेसा यांच्या आयुष्यावर आधारित असलेला चित्रपटात अप्रतिम भूमिका साकारली होती. तर 2015 मध्ये रिलीज झालेल्या “काकण” या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा क्रांती रेडकर ने केले होते.

See also  "आई कुठे काय करते" मधील अरुंधतीच्या आयुष्यात होणार 'या' अभिनेत्याची एंट्री, पाहा कोण असेल तिचा हा नवा मित्र...

kranti redkar20

2017 मध्ये क्रांतीने “आयआरएस” ऑफिसर समीर वानखेडे यांसोबत लग्न केले. क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांना आता दोन जुळ्या मूली आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकर हिचे घर किती सुंदर आहे. चला तर मग जाणून घेऊया क्रांती च्या आलिशान घराविषयी :

kranti redkar2 1

अभिनेत्री क्रांती रेडकर ही मुंबईतील आलिशान घरात राहते. तिच्या घराच्या भिंती ह्या पांढऱ्या रंगाच्या आहेत. बरेचदा ती सूर्यास्ताचे फोटोज् शेयर करत असते, यावरून तिला सूर्यास्त खूप आवडते, हे आपल्याला समजते. आपल्या गॅलरीत तिने लाकडी सोफा ठेवला आहे. तर दुसऱ्या बाजूला एक छोटासा सुंदर टेबल ठेवला आहे.

kranti redkar12

आपल्या गॅलरीत तिने बर्याचशा फोटोफ्रेम लावलेल्या आहेत. तसेच तिच्या गॅलरीत सुंदर फुलांची रोपे देखील आहेत. तिला आपल्या श्वानासोबत खेळायला भरपूर प्रमाणात आवडते. तिच्या घराचे दरवाजे तपकिरी रंगाचे आहेत. क्रांतीच्या घरातील फर्निचर सुद्धा तपकिरी रंगाचे आहेत. अभिनेत्री क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव असते. ती आपले लेटेस्ट फोटोज् आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेयर करते.

See also  खूपच रंजक आहे "चला हवा येऊ द्या" फेम अभिनेत्री श्रेया बुगडेची लव्हस्टोरी, वाचून थक्क व्हाल!

kranti redkar16

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment