विक्की कौशलचा हा १३ वर्ष जुना व्हिडिओ तुम्ही पाहिलात का? पाहून तुम्हांला देखील येईल खूप हसू
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील फेवरेट कपल कतरिना कैफ आणि विक्की कौशल हे कपल नुकतेच विवाहबद्ध झाले. अभिनेता विक्की कौशल याने आपल्या स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये आपलं एक आगळं वेगळं स्थान निर्माण केलं. याच दरम्यान विकीचा 13 वर्षांपूर्वीचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवङ असल्याचे आपल्याला दिसून येते.
विक्की कौशलच्या एका मैत्रिणीने त्याला टॅग करत हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेयर केला आहे. मात्र यामध्ये विक्की अंगाने खूपच किरकोळ दिसत आहे. यामध्ये त्याने निळ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर स्कार्फ घेतला आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहते तर त्याच्या प्रेमात पडत आहेत. विक्की आपल्या मैत्रीणीसोबत रोमॅन्टिक ङायलॉग्ज म्हणताना दिसत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेयर करत विक्की कौशलच्या मैत्रिणीने “जुने गोड दिवस” असे कॅप्शन सुद्धा दिले आहे. त्यापुढे तिने विक्की कौशलची माफी सुद्धा मागितली आहे. या पोस्टसाठी अगोदरच हात जोडून माफी मागते, असे तिने विकीला म्हटले आहे. विक्की ने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आणि म्हटले आहे की, “अभिनयाचे जुने ते शाळेतील दिवस”.
विक्की कौशल सध्या इंदूर मध्ये सारा अली खान सोबत लक्ष्मण उटेरियाच्या सिनेमाचे शूटिंग पूर्ण करत आहे. या दोघांचेही सेटवरील अनेक फोटोज् समोर आलेले आहेत. कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांच्या “लुका छुपी” या सिनेमाचा हा सिक्वल असल्याचे म्हटले जात आहे. परंतु या सिनेमाविषयी फारशी माहिती समोर आलेली नाही.
तुम्हांला ठाऊक आहे का, अभिनेता विक्की कौशल हा आपल्या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून पत्नी कतरिना कैफ सोबत पुरेसा वेळ घालवत असतो. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याने इंदूर मध्येच त्या दोघांनीही सेलिब्रेशन केले होते. एकत्रितपणे त्यांनी आपली पहिली लोहरी साजरी केली होती. तर आता कतरिना मुंबईत पुन्हा परतली आहे. नुकतेच तिला विमानतळावर पाहण्यात आले होते. यादरम्यान विक्की कौशलच्या सिनेमांबद्दल म्हणायचे झाले तर “गोविंदा मेरा नाम”,”सॅम बहादूर” आणि “तख्त” यांसारख्या सिनेमांमध्ये तो आपल्याला दिसणार आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.