नाना पाटेकर यांचा मुलगा देखील आहे प्रसिद्ध अभिनेता..या चित्रपटात निभावली भूमिका…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो कलाविश्वातील एक आगळेवेगळे आणि प्रचंड लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर. त्यांच्या अनेक भूमिका आजवर भरपूर गाजल्या आहेत. कधी वडील म्हणून तर कधी मुलगा म्हणून, तर कधी रंगभूमीवर उभा असलेला नटसम्राट म्हणून पडद्यावर ते झळकले आहेत. अनेकांना त्यांच्या सर्व भूमिका खूप आवडतात, मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांच्या भन्नाट भूमिका पाहून अनेक लोक मोठे चाहते झाले आहेत. उत्तम संवाद कौशल्य आणि उत्कृष्ट अभिनय याच्या जोरावर त्यांनी आपले नाव लौकिक केले आहे.

मित्रहो आपण अभिनेते नाना पाटेकर यांना तर ओळखतोच, मात्र आज त्यांच्या मुलाबद्दल खास माहिती जाणून घेणार आहोत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने सुद्धा या चित्रपट सृष्टीत आपले नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच तो आता एका नवीन चित्रपटात झळकणार असल्याची खबर समोर येत आहे. नाना पाटेकर हे एक निर्माते आणि लेखक देखील आहेत. अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर झाले आहेत, नेहमीच साधे राहणीमान आणि गोड स्वभाव यामुळे अनेक रसिक मंडळी त्यांचा खूप आदर करतात.

See also  वयाच्या ४ थ्या वर्षापासून चित्रपटात काम करणारा हा मुलगा आहे आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता, नाव ऐकून थक्क व्हाल!

नाना पाटेकर हे सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय नसतात, मात्र तरीही त्यांच्या चाहत्यांच्या मध्ये त्यांची नेहमीच चर्चा रंगलेली असते. अनेक सोहळ्यात ते झळकताना दिसतात, अगदी साधे राहणीमान, उच्च विचारसरणी आणि चतुर बुद्धी आणि कलेचे वारसदार म्हणून त्यांची ओळख आहे. या सर्व गुणांमुळे अनेक लोक त्यांचा खूप आदर करतात, त्यांना पसंद करतात. सध्या सोशल मीडियावर नाना पाटेकर यांच्या लेकाची चर्चा सुरू आहे. लाईमलाईट पासून पाटेकर कुटुंब हल्ली दूर असते.

आपल्या आयुष्यात हे कुटुंब व्यस्त झाले असून सोशल मीडियावर देखील ते अधिक सक्रिय नसतात. दरम्यान नाना पाटेकर यांचा मुलगा विशेष चर्चेत आला आहे, तो देखील सोशल मीडियावर सक्रिय नसतो मात्र तरीही तो कलाविश्वात भरपूर सक्रिय आहे. त्यांच्या लेकाचे नाव मल्हार पाटेकर असे आहे. मल्हार अगदी हुबेहूब अभिनेते नाना पाटेकर यांच्या सारखा दिसतो. मुंबई मधील सरस्वती हायस्कूल मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. नंतर वाणिज्य शाखेतून त्याने आपली पदवी पूर्ण केली आहे.

See also  पाठकबाई परत येणार! होणार धमाकेदार एंट्री, साकारणार हि भूमिका, ऐकून थक्क व्हाल...

वडीलांप्रमाणे मल्हार देखील कलाप्रेमी आहे, त्याला अभिनयाची खूप आवड आहे. मल्हारने प्रकाश झा यांच्या सोबत काम करण्यास सुरुवात केली. पण नाना आणि प्रकाश यांच्यात काही कारणाने वाद झाला त्यामुळे मल्हारला हा प्रोजेक्ट सोडावा लागला. त्यानंतर मल्हारने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून “छब्बीस ग्यारा” या चित्रपटासाठी दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या सोबत काम केले. सध्या त्याचा एक प्रोडक्शन हाऊस आहे.त्याच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment