मराठी सिनेसृष्टीतील अचानक ध’क्का देऊन जाणारे रिलेशनशिप ब्रेकअप, या मराठी अभिनेत्रीचे तर…

Advertisement

मराठी सिनेसृष्टी सध्या विविधतेने बहरत असलेली आपल्याला पहायला मिळते आहे. याखेरीज मराठी सिनेसृष्टीत भरपूर गोष्टी होत असतात, कधी सिनेमांच्या आशय विषयाला घेऊन, कधी मालिकांबाबत तर कधी मालिका व सिनेमात काम करणाऱ्या कलाकारांबाबत.

मराठी सिनेसृष्टीतले कलाकार हिंदी सिनेसृष्टीच्या तुलनेत फारशे झगमगाटापासून दुरच होते परंतु नवी पिढी, नवे विचार, नवे कलाकार जसेजसे यात रस घेऊन उतरले तशीतशी त्यांची सोशल मीडियामधून प्रेक्षकांसोबत संवाद साधण्याची आसही वाढली. तर सध्या मुद्दा आहे अशाच काही खास खबरांमधला.

Advertisement

ज्यामुळे कदाचित तुम्हाला वाटेल की, ह्या मराठी कलाकारांच्या जोड्या टिकल्या असत्या तर आज सिनेसृष्टीतली गणितं काहीशी वेगळी असली असती. अनिकेत विश्वासराव, सुयश टिळक, अक्षया देवधर, पुष्कर जोग ह्या अशा तब्बल ६ जोड्या आहेत ज्यांची नाती पूर्णत्वाला जाण्याआधीच वेगवेगळी झाली.

66633671

Advertisement

अक्षया देवधर म्हणजे सर्वांची लाडकी अंजलीबाई व का रे दुरावामधून घराघरात गेलेला सुयश टिळक ह्या दोघांच्या नात्याचही ब्रेकअप झालं. प्रेक्षकांना गोड, क्युट वाटणाऱ्या या कपलच्या विभक्त होण्याने अतिशय वाईट धक्का बसला होता, चाहत्यांच्या मनात ही ऑफस्क्रीनसाठी जोडी निश्चितच मेड फाॅर इच ऑदर होती.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेयर केले सासरच्या घरच्यांचे फोटो, पाहून थक्क व्हाल!

सध्या शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतून सुयश प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. अक्षया व सुयश या जोडीची मराठी सिनेसृष्टीत बरीच तारीफ व चर्चा रंगली जायची. परंतु आपापल्या कामामधे बिझी असल्याने दोघांच्याही रिलेशनशिपच रूपांतर लाॅन्ग डिस्टन्स रिलेशनशीपमधे झालं व त्यानंतर हे नातं हळूहळू थेट संपुष्टात आलं.

Advertisement

80433888

यानंतर येते ती जोडी म्हणजे नुकतच लग्न झालेली मिताली आणि श्रेयस राजे. मिताली आधी मराठी नाटकांचा हिस्सा होती, ती थिएटर आवर्जून करायची. याच दरम्यान ती श्रेयस राजे या अभिनेत्याला डेट करत असायची. परंतु काही काळानंतर अचानक दोघांचही ब्रेकअप झाल्याच समोर आलं. दोघांनीही एकमेकांना सोशल प्लॅटफॉर्मवरून अनफॉलो केलं, आणि आपापले मार्ग स्विकारले.

Advertisement

18207440

आता आणखी एक महत्त्वाची जोडी म्हणजे, अनिकेत विश्वासराव व पल्लवी सुभाष. या दोघांच्या नात्याची विशेषता म्हणजे दोघे चक्क आठ वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशीपमधे राहिले, त्या दोघांनीही एकमेकांपासून वेगळे झाल्याची बातमी सांगितली होती. त्या दरम्यान या दोघांच्या जोडीने इतरांसाठी एक आदर्श सेट करेपर्यंत नातं निभावलं होतं; परंतु काही वेळा प्रत्येक चांगली गोष्ट पुर्णत्वास जातेच असं म्हणता येणार नाही.

See also  स्वतःचं लग्न बाजूला ठेवून हा प्रसिद्ध मराठी अभिनेता होणाऱ्या पत्नीसह करतोय कोरोना रुग्णांची सेवा...
Advertisement

67328758 1067449040131433 2626239357517824000 n

काल परवाच विवाह पार पडलेला सिद्धार्थ चांदेकर व मुग्धा परांजपे यांची जोडीही छान असल्याच मानल्या जात होतं, तसं एका बाबतीत सांगायच म्हटलं तर सिद्धार्थचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडल्या गेलं आहे. पण प्रत्यक्ष डेट करताना मात्र त्यावेळी मुग्धा परांजपे हीच अभिनेत्री त्यासोबत होती. खरतरं या दोघांच नात काही वैयक्तिक कारणांमुळे तुटल्याच नंतर समजलं. सिद्धार्थ आधी सोशल मीडियावर मुग्धाबाबत स्पष्टता ठेवायचा हेही तितकचं खरयं.

Advertisement

17626382

यानंतर गाजलेली आणि कारणास्तव एकमेकांपासून वेगळी झालेली जोडी म्हणजे, रोमा अभ्यंकर आणि पुष्कर जोग. त्यावेळी दोघांच्या नात्याला असा बहर आला होता की आता फक्त लग्नाची दोघांच्या अनाउन्समेंट बाकी होती. आणि अचानक पुष्कर जोग याने एयर होस्टेस जास्मिन हिच्याशी लग्न करणार असल्याची खबर अचानकपणे सांगून सगळीकडे गोंधळ निर्माण करून दिला. हे मराठी सिनेसृष्टीतलं अचानक घडलेल्या सर्वात मोठ्या ब्रेकअप्सपैकी एक समजलं जातं.

See also  मराठी अभिनेता भरत जाधवने केले भावनिक आवाहन म्हणाला, 'हि वेळ तर एकमेकांना आधार देण्याची पण तुम्ही तर...'
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Advertisement

Leave a Comment

close