फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर आहे पतीचे घर पण लग्नाला ४० वर्षे होऊनही ही बॉलीवूडची क्वीन तेथे आजही पोहचू शकलेली नाही

हेमा मालिनी… बॉलीवूडची ड्रीम गर्ल. जन्म १६ ऑक्टोबर १९४८ रोजी अम्मानकुडी तामिळनाडू येथे. आज त्यांचा वाढदिवस. आज हेमाजी ७२ वर्षाच्या झाल्यात. त्या निमित्ताने आमच्या वाचकांसाठी बऱ्याच जणांना अज्ञात असलेल्या काही खास गोष्टी…आपण जाणताच की, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्रशी लग्न केले होते, पण कित्येकांना हे माहितीही नसेल की, लग्नानंतर आजवर हेमा कधीही धर्मेंद्रच्या घरी गेली नाहीय. धर्मेंद्रच्या घरात जाणारी एकमेव सभासद त्यांची मुलगी ईशा आहे आणि तिलाही तीच्या जन्मानंतर तब्बल ३४ वर्षांनंतर तेथे जाण्याची संधी मिळाली होती. राम कमल मुखर्जी यांच्या ‘हेमा मालिनी: बियॉन्ड द ड्रीम गर्ल’ या पुस्तकात याचा उल्लेख आहे.

धर्मेंद्रचा भाऊ आणि अभय देओल यांचे वडील अजितसिंग देओल फार आ’जा’री होते, ते अंथरुणाला खिळून होते आणि ईशाला तिच्या काकाला बघायचे होते. ईशाला तिच्या लाडक्या काकांना शेवटचे भेटून तिचे प्रेम, आदर व्यक्त करावासा वाटला. तिचे आणि अहानाचे ते लाडके काकाजी होते. अभयच्या पण या दोन्ही बहिणी खूपच जवळच्या आहेत.

ईशाकडे त्याच्या घरी जाण्यावाचून दुसरा मार्गच नव्हता. काकांना भेटायला म्हणून तिने शेवटी सनीला (देओल) भैय्याला फोनवर विनंती केली आणि मग सनीने त्यांना भेटवण्याची पूर्ण व्यवस्था केली होती. २३ ऑक्टोबर २०१५ रोजी अजितसिंग देओल यांचे नि’ध’न झाले होते.

धर्मेंद्रच्या ११ व्या रोड हाऊसपासून हेमाचा बंगला “आदित्य” हा फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर आहे. तरीही हेमा धर्मेंद्रच्या वडिलोपार्जित घरी कधीच का गेली नाही? श्री. राम कमल मुखर्जी यांच्या पुस्तकानुसार हेमा यांनी धर्मेंद्रची हिरोईन म्हणून त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांची लग्नापूर्वी अनेक वेळा समारंभात वैगेरे भेट घेतली होती. पण लग्नानंतर ते दोघेही वेगळे झाले. हेमाला कुणालाही त्रास द्यायचा नव्हता. “धरम जी यांनी माझ्यासाठी व माझ्या मुलींसाठी जे केले त्याबद्दल मला आनंद आणि समाधान आहे. ते माझ्या मुलींची आणि माझी जीवापाड काळजी घेतात.” असे हेमाजी आवर्जून सांगतात. “आजही मी काम करतेय, माझे आरोग्य आणि तंदुरुस्ती राखून आहे आहे, कारण मी माझे जीवन कला आणि संस्कृतीशी जोडलेले आहे.

हेमाजी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की,”जरी मी कधी प्रकाशविषयी बोलत नाही, पण मी तिचा खूप आदर करते. माझ्या मुलींनाही धरमजींच्या कुटुंबाबद्दल पूर्ण आदर आहे. जगाला आमच्या आयुष्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असते पण आम्हीही सर्वसामान्य माणसेच आहोत, आम्हालाही आमची सुखदुःख असतातच. यात विशेष असं काहीच नसतं”

धर्मेंद्र व हेमाचे लग्न तिच्या भावाच्या घरी झाले होते. ते एक तमिळ पद्धतीचे लग्न होते. असे म्हणतात की धर्मेंद्र आणि हेमा दोघांनाही अशाच पद्धतीने लग्न करायचे होते. ‘हेमा मालिनीः द ब्रॉड द ड्रीम गर्ल’ च्या म्हणण्यानुसार धर्मेंद्रच्या वडिलांना केवल कृष्णासिंग देओल, हेमा आणि तिचे कुटुंबीय आवडले होते. या लग्नामुळे ते खुश होते.

हेमा यांनी पुस्तकात सांगितले आहे केवल कृष्णा सिंग देओल नेहमीच माझ्या वडील आणि भावाला भेटायचे. चहापाण्यादरम्यान त्यांनी भावा आणि वडिलांशी पंजेही लढवले आहेत आणि त्यांचा पराभव केल्यावर विनोदपणे म्हणायचे, तुम्ही लोक तूप, लोणी, लस्सी खा-प्या. इडली आणि सांबर शक्ती देत नाहीत. आणि यानंतर ते खूप हसायचे.

हेमाच्या पुस्तकात धर्मेंद्रची आई सतवंत कौर यांच्याशी तिच्या नात्याचा उल्लेखही आहे. हेमा यांच्या म्हणण्यानुसार – धरमजींची आई सतवंत कौर या खूप प्रेमळ होत्या. मला आठवते एकदा त्या जुहूच्या डबिंग स्टुडिओमध्ये मला भेटायला आल्या. त्यावेळी लहानगी ईशा सोबत होती. त्यांनी इशाला सांगितले की मी इथे आले हे कुणालाही बोलू नको. मी त्याच्या पायाला स्पर्श करून दर्शन घेतल्यावर त्यांनी मला सदा खुश राहा, नेहमी आनंदी राहा. असा आशीर्वाद दिलेला. त्यावेळी मला खूप आनंद झाला होता.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हेमाजी…!

Leave a Comment