मराठी मालिकेचा येणार हिंदी रिमेक.ही मालिका पुन्हा एकदा झळकणार हिंदीतून…जाणून घ्या कोणती आहे..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो मराठी मालिकांनी गेली अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या अप्रतिम कथानकाचे इथे नेहमीच विशेष कौतुक होत असते. या मालिकांनी अगदी वेड लावले आहे, यांचे भाग कधी पाहण्यात वेळ झाला किंवा कधी नाही पाहिला तर प्रेक्षकांना खूपसे चुकल्याचुकल्या सारखे वाटते. अगदी घरच्या कथा पडद्यावर झळकत आहेत का असे वाटते, त्यामुळे या मालिकेतील सर्व कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या घरचे होऊन जातात. त्यांचे नाते त्यामुळे अतिशय घट्ट बनून जाते.

मित्रहो हल्ली अनेक हिंदी मालिकांचे रिमेक मराठी मालिकेत पाहायला मिळतात, अनेक चॅनेल वर हिंदि,बंगाली मालिकांचे मराठी रिमेक पाहायला मिळत आहेत. “गुम है किसी के प्यार में” मालिकेतून “लग्नाची बेडी” , “कुल्फी कुमार बाजेवाला” मधून “तुझेच मी गीत गात आहे” या मालिका रिमेक झाल्या आहेत. मंडळी इतकेच नव्हे तर मराठी मालिका क्षेत्रात अगदी सर्वात टॉप असलेली मालिका “आई कुठे काय करते” या मालिकेचा हिंदी रिमेक बनवून “अनुपमा” प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या दोन्ही मालिका आपापल्या क्षेत्रात प्रचंड सक्रिय झाल्या आहेत.

See also  प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या रोमॅन्टिक पोजवर सेलीब्रेटींची प्रतिक्रिया, पहा काय म्हणतायेतं हे सेलीब्रेटी!

मित्रहो पुन्हा एकदा अशाच एका लोकप्रिय मराठी मालिकेचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कलर्स मराठी वरील “जीव माझा गुंतला” मालिकेने प्रचंड प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली आहे. फार कमी काळात या मालिकेने भरपूर लोकप्रियता मिळवली आहे. ही मालिका कन्नड मधील “मिथुना राशी” याचा मराठी रिमेक आहे. तसेच आता लवकरच या मालिकेचा हिंदी रिमेक देखील पाहायला मिळणार आहे. हा रिमेक “सावी की सवारी” म्हणून पडद्यावर येणार आहे.

या हिंदी मालिकेचे नाव आधी “अदिती ऑटोवाली” असे ठेवण्यात आले होते मात्र नंतर ते नाव बदलून “सावी की सवारी” असे ठेवण्यात आले आहे. ही मालिका अगदी हुबेहूब “जीव माझा गुंतला” सारखी असणार आहे, विशेष म्हणजे या मालिकेत सुद्धा अंतराची जशी हमसफर नावाची रिक्षा होती तसेच “सावी की सवारी” मध्ये सावीच्या सवारीचे नाव छत्रीप्रसाद असे असणार आहे. या मालिकेची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे, यामध्ये अंतरा आणि मल्हारच्या भूमिकेला कोण निभावणार आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

See also  "माहेरची साडी" फेम अलका कुबल यांच्या मुली अभिनय नव्हे तर या क्षेत्रात कमवत आहे नाव...

लोकमत फिल्मीला मिळालेल्या माहितीनुसार सावीच्या भूमिकेत अभिनेत्री समृद्धी शुक्ला असेल तर मल्हारच्या भूमिकेत अभिनेता फर्मान हैदर असण्याची चर्चा होत आहे. “जीव माझा गुंतला” मालिका आता एका खास वळणावर आहे, यामध्ये सध्या अंतरा आणि मल्हार यांचा रोमँटिक ट्रॅक सुरू आहे. त्यांची केमिस्ट्री कोल्हापूरकरांना खूपच भावली आहे. आता “सावी की सवारी” ही मालिका सुद्धा अशीच भुरळ पाडेल का हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment