यंदाची होळी आहे खूपच विशेष, जाणून घ्या शास्त्रानुसार होलिका दहन नियम, कथा, शुभ मुहूर्त व पूजन करण्याची पद्धत…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो !, होळी हा तसा रंगांचा उत्सव… होळी हा उत्सव जगभरात कोणत्या ना कोणत्या रूपात साजरा केलाच जातो परंतु, कदाचित जगभरात फक्त आपल्या भारतातच होलिका द’ह’नची परंपरा असावी. होळी हे एक प्रकारे, हे वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक आहे. रंगाच्या होळीच्या म्हणजेच धुळवडीच्या आदल्या दिवशी, फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी आपल्याकडे होलिका द’ह’न केले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळण्याची परंपरा आहे, ज्यास धुळवड, धुराडी, धुळवंडी इ. नावांनी देखील ओळखले जाते.

होलिका द’ह’ना’चे नियम : सन २०२१ मध्ये फाल्गुन पौर्णिमेच्या वेळी म्हणजेच २८ मार्चच्या प्रदोष काळ दरम्यान होलिका द’ह’न असेल. २८ मार्च रोजी भद्रापुच्छ १०.१३ ते ११.१६ आणि भद्रामुख ११.१६ ते १.०० पर्यंत असतील. यामुळे, होलिका द’ह’नाची शुभवेळ सायंकाळी ६.३६ ते ८.५६ पर्यंत असेल.

शास्त्रानुसार होलाष्टक शुभ मानले जात नाही. होळीच्या ८ दिवस अगोदर शुभविधी किंवा मंगलकार्य करणे निषिद्ध मानले जाते. या ८ दिवसात लग्न, गृहप्रवेश इत्यादी शुभ कामे केली जात नाहीत. यंदाच्या वर्ष २२ मार्च ते २८ मार्च दरम्यान हे होलाष्टक असेल.

See also  घरात पैसा टिकत नसेल तर करा हा रामबाण उपाय, नक्की आजमावून पहा...

होलिका द’ह’न पौर्णिमेच्या दिवशी केले जाते. त्या वेळी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्या दिवशी “भद्रा” येऊ नये अर्थात पौर्णिमा ही प्रदोषकाल-व्यापीनी असावी. सोप्या शब्दात सांगावयाचे तर, पौर्णिमेची तिथी ही त्या दिवशी सूर्यास्तानंतरच्या तीन मुहूर्तांमध्येच असावी.

होलिका द’ह’नची कथा: हिंदू पौराणिक मान्यतानुसार, राक्षस राजा हिरण्यकश्यप स्वत:ला देव मानत होता, परंतु त्याचा मुलगा प्रल्हादाने भगवान विष्णूशिवाय इतर कोणाची उपासना केली नाही. हे पाहून हिरण्यकश्यप खूप संतापला आणि शेवटी त्याने आपली बहीण होलिकाला प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत बसायला सांगितले. होलिकाला वरदान होते की तिला आगीत नुकसान होणार नाही.परंतु भगवान विष्णू कृपेने प्रल्हाद अग्नीतून वाचला, तर होलिका मात्र आगीत जळून खाक झाली. त्या दिवशी फाल्गुन पौर्णिमा होती. म्हणून या घटनेच्या स्मरणार्थ होलिका द’ह’न करण्याची परंपरा आहे. नंतर भगवान विष्णूने लोकांना या राक्षसी जुलूमातून बाहेर काढण्यासाठी नरसिंह अवतार देऊन हिरण्यकश्यपाचा वध केला.

See also  वॅलेंटाईन्स डे निमित्ताने एक खास लेख: प्रेम, जगातली एक सुंदर आणि तितकीच नाजूक भावना..!!

होलिका द’ह’न इतिहास: होळीच्या सणाविषयी अनेक प्राचीन ऐतिहासिक ग्रंथात माहिती आहे. प्राचीन विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपी येथे सापडलेल्या सोळाव्या शतकातील पुरातन चित्रांमध्ये होळीच्या सणाचा उल्लेख आहे. एवढेच नव्हे तर विंध्य पर्वताजवळ रामगडमध्ये सापडलेल्या ३०० वर्ष जुन्या शिलालेखातही होळीचा उल्लेख आहे. असा विश्वास आहे की या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पुतना रा’क्ष’सी’चा व’ध केला. या आनंदात गोपींनी गोकुळात कृष्णाबरोबर होळी खेळली होती.

होळीमध्ये काय अर्पण कराल?: होलिका द’ह’नाच्या दरम्यान कच्चे आंबे, नारळ, मक्याची कणसे, सप्तधान्य, साखरेपासून बनविलेली खेळणी, प्रतीकात्मकपणे नवीन पिकाचा काही भाग होळीत अर्पण करण्यात येतो.

होलिका द’ह’न पूजा:

 • द’ह’नच्या आधी होलिकाची पूजा केली जाते.
 • या वेळी, होलिकेसमोर पूर्व किंवा उत्तर दिशेला बसून उपासना करावी.
 • कच्चा धागा तीन ते सात मंडळ फिरत होलिके भोवती गुंडाळावा लागतो.
 • शुद्ध जल आणि इतर पूजा सामग्री एक-एक करून होलिकेला अर्पण केली जाते.
 • पूजन झाल्यानंतर होलिकेला जल अर्ध्य दिले जाते.
 • एक तांब्या पाणी, हार फुले, नैवैद्य, तांदूळ, गंध, कच्चा सुतीधागा, गूळ, हळकुंड, मूग, बत्ताशे, गुलाल, नारळ इ. अर्पण करतात.
 • पिकलेल्या हरभरा आणि गव्हाच्या लोम्ब्या अशा नवीन पिकाचे काही भागदेखील होळीला अर्पण करतात.
See also  अजिंक्य रहाणेला घडवणारा गुरू आहे एक मराठी क्रिकेटपटू...

होळीची मान्यता :

 • असे मानले जाते की होळीच्या अ’ग्नी’त शेकलेले धान्य खाल्ल्याने माणूस निरोगी राहतो.
 • दुसर्‍या दिवशी सकाळी होळीची उर्वरित थोडा अग्नि आणि राख घरात आणल्यास, घरातून नकारात्मक, वाईटशक्ती दूर होतात.

होलिका द’ह’न:

 • होलिकाची पूजा केल्यानंतर होलिका जाळली जाते.
 • होलिका द’ह’न नेहमीच भद्रा नंतर केले पाहिजे.
 • होलिका द’ह’न चतुर्दशी तिथी किंवा प्रतिपदामध्ये केले जात नाही.
 • होलिका द’ह’न सूर्यास्तापूर्वी कधीही करु नये.

२०२१ होलिका द’ह’न’चा शुभ काळ :

होलिका द’ह’न मुहूर्त सायंकाळी ६.३६ ते ८:५६ कालावधीः २ तास २० मिनिटे
पौर्णिमेची तारीख प्रारंभः २८ मार्च२०२१ रोजी ३.२७. वा
पौर्णिमा समाप्ती : २९ मार्च २०२१ रोजी १२.१७
रंगांची होळी (धुळवड): २९ मार्च २०२१

चला तर मग!, यंदा होलिका द’ह’न करुन घरासोबतच विचारांमधील नकारात्मकता सुद्धा दूर करु या.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment