चक्क हॉलिवुडच्या या सुपरहिरोने आपल्या मुलीचे नाव ठेवले आहे ‘इंडिया’ !

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

नुकताच बॉलिवूड अभिनेता रणदीप हूडासोबत “एक्स्ट्रक्शन” या चित्रपटात दिसणारा हॉलिवूड अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ यांचे भारताशी जुने नाते आहे. ख्रिसचे “थॉर” हे पात्र भारतीय प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे त्याच्या मुलीचे नावही ‘इंडिया’ आहे. काय आहे या नावामागील रहस्य? चला, जाणून घेऊ या…

नुकताच ११ ऑगस्टला ख्रिस हेम्सवर्थने आपला ३७ वा वाढदिवस साजरा केला . आय ए एन एसला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्याने आपल्या मुलीच्या “इंडिया” नावामागील कारण स्पष्ट केले.

WhatsApp Image 2020 08 15 at 11.15.06 AM 1

ख्रिसला स्वतःला भारत खूप आवडतो. त्याने इथल्या काही शहरांमध्ये वेळ घालवला आहे. एक्सट्रॅक्शन चित्रपटाच्या शूटिंगवेळी ख्रिसही अहमदाबाद आणि मुंबईला आला होता. भारतातील चित्रपट प्रेमी लोक आणि नयनरम्य लोकेशन्स यांच्या तर तो प्रेमातच पडला. तो म्हणाला- ‘मला इथल्या प्रेक्षकांची आणि लोकेशन्सची आवड निर्माण झाली आहे. भारतात शूटिंग पहायला रस्त्यावर रोज शेकडो लोक येत असत आणि मला आमच्याकडे सेटवर असा अनुभव कधीच आला नव्हता. बरेच लोक आल्यामुळे खूप गोंधळ व्हायचा, पण त्यातही वेगळीच गंमत होती.

See also  सुंदर अभिनेत्री गायिका आर्या आंबेकर बद्दल तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का ?

WhatsApp Image 2020 08 15 at 11.15.06 AM

या व्यतिरिक्त ख्रिस असेही देखील म्हणाला की, भारतात मला चांगल्या आठवणी, लोकांशी झालेल्या संभाषणातुन सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे. भारतात शूटिंग करतांना खरंच खूप मजा आली. आम्ही यापूर्वी तिथे शूटिंग केलेले नाही. येथील क्रू मेंबर्सला पाहून असं वाटलं की, हॉलिवूडच्या पद्धतीने जास्त चित्रपट इथे चित्रित झालेले नाहीत, त्यामुळे या चित्रीकरणाचे एक खास महत्व होते.

WhatsApp Image 2020 08 15 at 11.15.05 AM

ख्रिस हेम्सवर्थ त्याच्या मार्वल कॅरेक्टर थॉर मुळे भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. थॉरच्या व्यक्तिरेखेचे ​​भारतात खरोखर खूप कौतुक झाले. ख्रिसने हे देखील नमूद केले की, ऍव्हेंजर्स: एंडगेम चे दिग्दर्शक जो आणि अँथनी रुसो यांनी मला सांगितले की, हा चित्रपट पाहतांना भारतातील चित्रपटगृहात थॉर च्या एन्ट्रीला भारतीय चाहत्यांचा अगदी जल्लोष व्हायचा.

See also  'हे' आहेत पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेट मधील सर्वात श्रीमंत मंत्री, नारायण राणे आहेत तिसर्‍या क्रमांकावर

सन २०१९ मध्ये त्यांच्या मेन इन ब्लॅक: इंटरनॅशनल या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान ख्रिसने सांगितले होते की त्याची पत्नी एल्सा पेटेकी ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. एल्साला भारत देश खूप आवडतो. तिनेही भारतात बराच काळ व्यतीत केलेला आहे. आणि याच कारणास्तव, त्यांनी आपल्या मुलीचे नावही “इंडिया” असेच ठेवले आहे. या इंडिया व्यतिरिक्त ख्रिस आणि एल्साला साशा आणि त्रिस्टान या आणखी दोन मुलीही आहेत.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment