या हॉलिवूड सुपरस्टारने आपल्या 14 मित्रांना प्रत्येकी रोख 7 कोटी रुपये वाटले, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

नातेसंबंध किंवा मैत्रीमध्ये पैसा मिठाच्या खड्याप्रमाणे काम करु शकतो हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. अगदी घट्ट विणीची नातीही थोड्याशा पैशाच्या कारणावरुन उसवून, फाटून जातात. कितीही जवळचा मित्र असला तरी त्याला खिशातल्या नोटांची बंडले काढून असू दे तुला असे म्हणत नाही (उसणे नव्हे भेट म्हणून)

परंतु या वैश्वीक वर्तन नियमाला काही वेळा अपवादही पहायला मिळतात. हॉलिवूडचा सुपरस्टार नायक जॉर्ज क्लुनी याने आपल्यातील दिलखुलास मैत्रीच्या भावनाचे असेच प्रदर्शन काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगाला घडवून दिले होते.

George Clooney

क्लूनीने दि. 27 सप्टेंबर 2013 रोजी बालपणीच्या तसेच करियरमध्ये संघर्ष करीत असताना सोबत असणार्‍या 14 मित्रांना लॉस एंजल्समधील घरात गेट टुगेदर पार्टीसाठी निमंत्रीत केले. खूप दिवस भेटू शकलो नाही म्हणून क्लुनीने भेटायला बोललो असेल असेच सगळ्यांना वाटत होते.

See also  'भावड्याची चावडी' या कार्यक्रमातून पार्थ पहिल्यांदाच झळकणार मराठी टेलिव्हिजनवर

ते सगळेजण क्लूनीच्या घरी पोहोचताच त्यांचे स्वागत करुन डिनर टेबलपर्यंत नेण्यात आले. त्यानंतर क्लूनीने प्रत्येकाच्या हातात एक सुटकेस सोपवली. या सुटकेसमध्ये शॅम्पेन बॉटल असेल असेच बहुतेकजणांना वाटले होते. मग क्लूनीने बोलायला सुरुवात केली.

‘मित्रांनो तुम्ही माझ्यासाठी किती महत्वाचे आहात याची जाणीव करुन देण्यासाठी मी तुम्हाला इथे बोलावले आहे. मी लॉस एंजल्समध्ये करियर घडवण्यासाठी आलो. खूप संघर्ष केला. त्यावेळी तुमच्यापैकी प्रत्येकाने मला कोणत्या ना कोणत्या स्वरुपात मदत केली. तुमच्या मदतीशिवाय आज मी जो कोण आहे, तो बनणे अशक्यच होते. तुमच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न म्हणून मी तुमच्यासाठी दिलेली छोटीसी भेट स्विकारा.”

George Clooney Amal Cannes film festival 2016

असे म्हणत त्याने सर्वांना सुटकेस उघडण्यास सांगितले. सुटकेस उघडल्यानंतर प्रत्येकाला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. त्यामध्ये शॅम्पेन नव्हे तर चक्क डॉलर्सची बंडले होती. प्रत्येक सुटकेसमधील नोटांची रक्कम थोडीसोडी नव्हे तर तब्बल 10 लाख डॉलर्स होती. (भारतीय चलनानुसार सुमारे 7 कोटी रुपये).

See also  गावरान मेवा वेबसिरीज मधला चंक्या विषयी काही गोष्टी जाणून घेऊ...

क्लूनीने त्याच्या कठिण प्रसंगांमध्ये केलेल्या मदतींची परतफेड अशा छप्परफाड स्वरुपात केली होती. काही मित्रांनी आपण ती भेट स्विकारु शकणार नाही, असे सांगितल्यावर क्लूनीने पुन्हा आग्रह करताना सांगितले.

‘मला पैशांअभावी जो त्रास सहन करावा लागला तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुबियांना करावा लागू नये यासाठी ही भेट आहे. हे पैसे देउन मी तुमच्यावर उपकार करीत नाही तर तुम्ही मला जी मदत केली होती तिची माझ्यापरीने केलेली ही परतफेड आहे.”

विशेष म्हणजे मित्रांना कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम भेट देणार्‍या क्लूनीने ही घटना 2017 पर्यंत गोपनीय ठेवली होती. शेवटी हे पैसे मिळालेल्यापैकीच एकाने 4 वर्षांनंतर क्लूनीची दिलदारी जगासमोर आणली.

– Deepak Patil

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment