मृ’त्यूच्या काही तासां अगोदर अभिनेत्री दिव्या भारतीने केले होते असे काम, जे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

दिव्या भारती हि ९० च्या दशकातील खूप प्रसिद्ध अभिनेत्री होती. अगदी लहान वयातच दिव्या भारती ने बरेच यश आणि लोकप्रियता मिळविली होती. आजही बरेच लोक असे म्हणतात की, दिव्या भारती ही बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होती. जे यश दिव्या भारतीने मिळवले ते प्रत्येकालाच मिळत नाही.

त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. दिव्या भारती यांनी वयाच्या 16 व्या वर्षी म्हणजे 1990 मध्ये ‘बोब्बिली राजा’ या तेलगू चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. 1992 ते 1993 या काळात त्यांनी 14 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. जो हिंदी चित्रपटसृष्टीतला विक्रम आहे.

divya bharti 1594720815

जानेवारी 1992 मध्ये दिव्या भारती यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘वि’श्वा’त्मा’ प्रदर्शित झाला होता. त्यानंतरच्या महिन्यातच दिव्या भारती यांचा गोविंदा सोबतचा ‘शोला और शबनम’ हा चित्रपट देखील रिलीज झाला होता. जुलै महिन्यात दिव्या भारती यांनी शाहरुख खान आणि ऋषी कपूर यांच्यासोबत ‘दिवाना’ चित्रपटात काम केले होते. अशाप्रकारे, दिव्या भारती यांनी 1992 या एकाच वर्षात तीन सुपरहिट चित्रपट दिले होते.

एका वर्षाच्या आतच दिव्या भारती यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. दिव्या भारती या अगदी लहान वयातच खूप सुंदर दिसत होत्या आणि त्या या कारणामुळे देखील खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. दिव्या भारती यांनी दीवाना, बलवान, दिल आशना है, दिल ही तो है यासारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केले.

See also  बाहुबली फेम प्रभासने या कारणांमुळे मोडलं होतं देवसेनाचं खऱ्या आयुष्यातलं लग्न ! कारण आहे हैराण करणारं...

divya 1 1

दिव्या भारती या जेव्हा 16 वर्षांच्या होत्या तेव्हा त्या बॉलिवूडचा सुप्रसिद्ध प्रोड्युसर आणि डायरेक्टर साजिद नाडियाडवाला यांना भेटल्या. दिव्या भारती आणि साजिद नाडियाडवाला यांची भेट फिल्म सिटीमध्ये दिव्या आणि गोविंदा यांचा ‘शोला और शबनम’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली होती. जेव्हा साजिद गोविंदाला भेटायला आला होता, तेव्हा गोविंदाने साजिद आणि दिव्याची भेट करवून दिली होती.

त्यानंतर साजिदने 15 जानेवारी 1992 रोजी दिव्या भारतीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नंतर दिव्या भारती आणि साजिद नाडियाडवाला यांचे 20 मे 1992 रोजी लग्न झाले होते. विशेष म्हणजे या लग्नासाठी दिव्या भारती यांनी इस्लाम स्वीकारला होता आणि त्यांचे नाव बदलून सना नाडियाडवाला ठेवले होते.

1554354899

दिव्या भारती यांनी अगदी लहान वयातच हे जग सोडले. 5 एप्रिल 1993 रोजी फ्लॅटच्या खिडकीतून घसरल्यानंतर दिव्या यांचा र’ह’स्य’म’यी मृ’त्यू झाला होता. दिव्या भारती यांचे नि’धन हे आता पर्यंत एक र’ह’स्य’च राहिले आहे. जेंव्हा त्यांचा मृ’त्यू झाला, तेव्हा त्या फक्त २२ वर्ष्यांच्या होत्या.

See also  "शोले" मधील जबरदस्त कव्वाली, जी कायमच रसिकांसाठी अज्ञात राहिली, रेकॉर्डिंग होऊनही, केवळ या कारणामुळे नाही होऊ शकली चित्रीत...

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वर्सोवा भागातील पाच मजली इमारतीतून प’ड’ल्या’ने दिव्या यांचा मृ’त्यू झाला. यावेळी काहींनी याला आ’त्म’ह’त्या म्हटले तर काही लोक या मृ’त्यूमागे क’ट’का’रस्थान असल्याचे म्हणत होते. 1998 मध्ये मुंबई पो’लिसांनीही या प्रकरणाची फाईल बंद केली होती.

bharti 5821544 835x547 m

असं म्हणतात की ज्या रात्री ही घटना घडली त्यादिवशी दिव्याने स्वत: साठी ४ बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. याची माहिती दिव्या भारती यांनी त्यांचा भाऊ कुणाल यालाही दिली होती. 5 एप्रिल रोजी दिव्याच्या चित्रपटाचे हैद्राबादमध्ये शूटिंग देखील होणार होती, परंतु फ्लॅट खरेदी करायचा असल्यामुळे दिव्याने तिचे शूटिंग रद्द केले आणि शूटिंगसाठी दुसर्‍या दिवसाची तारीख दिली होती. माहिती नुसार, दिव्या त्यांच्या मृ’त्यूच्या दिवशी त्यांच्या वर्सोवा येथील फ्लॅटमध्ये डिझायनर नीता लुल्ला आणि तिच्या पतीला भेटणार होती.

रात्री दहा वाजता दिव्या भारती या त्यांच्या मुंबईच्या पश्चिम अंधेरी येथील वर्सोवातील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचल्या. रात्री 10 वाजता नीता लुल्ला देखील त्यांच्या पतीसमवेत दिव्याच्या फ्लॅटवर पोहचल्या. तिघेही ड्रॉइंग रूम मध्ये एकत्र बोलत बसले होते. तिघेही रात्री खूप आनंदी होते आणि मजा करत होते.

See also  "शेरशाह' चित्रपटात विक्रम बत्रा यांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्यातील घर आहे खूपच आलिशान...

365660 divya bharti

मग काही वेळाने दिव्या काही कामासाठी किचनमध्ये गेली. येथे नीता आणि तिचा नवरा टीव्ही पाहण्यात मग्न होते. दिव्या यांच्या ड्रॉइंग रूम मध्ये एक मोठी खिडकी होती. स्वयंपाक घरातून परत आल्यावर दिव्या भारती त्यांच्या ड्रॉइंग रूम मध्ये असलेल्या खिडकीच्या भिंतीवर बसल्या होत्या.

पण दिव्या भारती त्यांच्या ड्रॉइंग रूम मधल्या ज्या खिडकीच्या भिंतीवर बसल्या होत्या त्या खिडकीला ग्रील नव्हती. आणि त्याच वेळी खिडकीत बसून बोलत असताना दिव्या भारती यांचा कल गेल्याने त्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडल्या. आणि पाच माजली इमारतीवरून खाली पडल्यामुळे दिव्या भारती यांचा मृ’त्यू झाला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment