या प्रसिद्ध अभिनेत्रीने चित्रपटाला नकार दिल्यामुळे धक धक गर्ल बनली माधुरी दीक्षित, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

90 च्या दशकात बॉलिवूड मध्ये एक अभिनेत्री अशी आली की जिने सर्वांच्या च मनाचा ठाव घेतला. आजही ती लोकांना किंवा तिच्या चाहत्यांना खूप आवडते. जरी आज तिने पन्नाशी ओलांडली असेल तरी.

1553004686

काय होतं ना की सर्वसामान्य व्यक्तीने म्हणजे स्त्री ने किंवा पुरुषाने पन्नाशी ओलांडली की आपल्याला ती खूप थकलेली वगैरे दिसू शकते. पण जर कुणी अभिनेत्री ने ओलांडली तर ? अजून तितकीच स्लिम आणि फिट. कारण ते स्वतःला तेवढं मेंटेन करतात.

बॉलिवूड मध्ये जी धक धक गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे आजही खूप लोकप्रिय आहे ती म्हणजे माधुरी दीक्षित. होय तिचा आज वाढदिवस आहे. पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे का ? की ती माधुरी पासून धक धक गर्ल कशी झाली ते. चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

See also  या बॉलीवूड खलनायकांच्या पत्नी आहेत खूपच सुंदर, या खलनायकाची पत्नी तर आहे ही तरुण मुलगी, नाव ऐकून थक्क व्हाल!

e12c7215a76ee48aad6a90f6d909c17f

माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. 90 च्या दशकांत तरुणांमध्ये तिची प्रचंड क्रेझ होती. केवळ तिची एक झलक पाहण्यासाठी चाहतावर्ग सिनेमागृहांमध्ये गर्दी करत असे. अशा या नामांकित अभिनेत्रीचा आज (15 May) वाढदिवस आहे. 54 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

एवढंच नव्हे तर तिच्या सोबत काम केलेल्या अनेक कलाकार अभिनेते अभिनेत्री यांनीही तिला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. कारण तिचं ग्लॅमर अजूनही टिकून आहे. 90 च्या दशकात लोकप्रिय झालेली नि आजही चर्चेत असलेली ती एकमेव अभिनेत्री असेल.

freepressjournal%2Fimport%2F2019%2F05%2Fmd

माधुरीला बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ म्हणून ओळखतात. खरं तर धक धक या गाण्यामुळं तिला ही ओळख मिळाली. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल हे गाणं तिच्यासाठी लिहिलेलंच नव्हतं. दुसऱ्या एका अभिनेत्रीनं या चित्रपटात काम करण्यास नकार दिला परिणामी त्याठिकाणी माधुरीची वर्णी लागली. अन् या गाण्यानं तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवलं…

See also  मुकेश अंबानीची छोटी सून आहे खूपच सुंदर, करोडोंची मालकीण असूनही जगते साधे जीवन...

अनेक कलाकारांचं भविष्य कुणीतरी नाही म्हंटल आणि मग त्यांना मिळालेल्या सिनेमा ने उजवल झालेलं आहे. त्यात धक धक गर्ल ही एक आहे.

Madhuri Dixit Became The Dhak Dhak Girl Because Of Sridevi

1991 साली बेटा या चित्रपटाची निर्मिती केली जात होती. या चित्रपटात अनिल कपूर-श्री देवी यांची सुपरहिट जोडी झळकावी अशी दिग्दर्शक इंद्रकुमार यांची इच्छा होती. पण श्रीदेवीनं या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कारण सतत ती अनिल कपूर यांच्यासोबतच काम करत होती.

आता तिला दुसऱ्या कलाकारांसोबत काम करायचं होतं. इंद्रकुमार यांनी कित्येकदा विनंती करुनही ती ऐकली नाही. परिणामी त्या ठिकाणी माधुरी दीक्षितची वर्णी लागली. माधुरीने इंद्रकुमार यांची ऑफर स्वीकारली. ‘बेटा’ चित्रपट सुपरहिट झाला आणि यासोबतच माधुरीचं ‘धक धक’ गाणंही सुपरहिट ठरलं.

See also  या अभिनेत्रीसोबत लग्न करण्यासाठी अभिनेता गोविंदाने पत्नीला देखील सोडले होते, परंतु शेवटी लग्नाच्या वेळी...

WhatsApp Image 2021 03 23 at 12.47.45

हे गाणं अत्यंत बोल्ड असल्याचं त्यावेळी म्हणण्यात आलं होतं. सेन्सॉर बोर्डानेही गाण्यावर आक्षेप घेतला होता. गाणं शूट करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ ठेवण्यात आला होता, पण फक्त तीन दिवसांत गाण्याचं शूटिंग पूर्ण झालं. सरोज खान यांच्या दिग्दर्शनाखाली हे गाणं शूट करण्यात आलं.

माधुरीला ‘बेटा’ चित्रपटासाठी त्यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. अन् तिथूनच चित्रपटात काम मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेली माधुरी एकाएकी सुपरस्टार झाली. तिची तुलना थेट श्री देवीशी केली जाऊ लागली.

Madhuri

तर अशी आहे धकधक गर्ल माधुरी ची एक यशाची स्टोरी. जी आज अनेक अभिनेत्री ना प्रेरणादायी ठरत असणार यात तिळमात्र शंका नाही. त्याच सोबत माधुरीला आज वाढदिवसा निमित्त स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment