‘तब ये हरामजादा शरद पवार सीएम नही था’ वाचा, का आणि कसे झाले शरद पवार पाकिस्तानचे लक्ष्य…
शरद पवारांसाठी तो काळ मोठा कठीण होता. पवारांवर आधीच अनेक आ’रो’पां’च्या फैरी झ’ड’त होत्या. त्यांचे अगदी कुख्यात असणारा दाउद इब्राहीमसोबत संबंध होते, भूखंड प्रकरणातही त्यांच्यावर काही आ’रो’प केले जात होते.
समाजवादी कॉंग्रेसचं राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणाऱ्या पवारांना राजीव गांधींनी हक्काने आणि आग्रहाने मूळ कॉंग्रेसमध्ये आणले होते. अर्थात हायकमांड पवारांसोबत असल्याने पवारही खुश होते. अशातच पवार कॉंग्रेसमध्ये परतून मुख्यमंत्री झाले होते.
1990 दरम्यान पवार पक्षांतर्गत राजकारणालाही सामोरे जात होते. कारण त्यांचे पुन्हा मूळ कॉंग्रेस पक्षात येणे आणि मुख्यमंत्री होणे, हे अनेकांना पटलेले नव्हते. दरम्यान मुंबईत बॉ’म्ब’स्फो’ट झाले. सगळीकडे हा’हा’का’र उडाला. प्रचंड भयानक स्थिती उद्भवली होती.
मात्र पवारांची प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन कौशल्य इथे कामी आले. पवारांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली आणि सर्वांनी आश्चर्याने तोंडात बोट घातले कारण ब्ला’स्ट झाल्यावरपुढच्या 48 तासात मुंबईची परिस्थिती पूर्वपदावर आली होती.
या गोष्टीला उलटून काही तास उलटतात न उलटतात तोच पवारांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला. त्यातच स्वतः पंतप्रधान पवारांशी संवाद साधणार होते. त्यामुळे काहीतरी गंभीर विषय आहे, हे पवारांच्या लक्षात आले. तिकडून पंतप्रधान सांगत होते की, तुम्ही तुमच्या सुरक्षेची काळजी घ्या. मी इकडून एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याला पाठवतो आहे. त्यांच्याशी चर्चा करा. नंतर काही वेळातच हे अधिकारी हजर झाले. त्यांनी एक संभाषण पवारांना ऐकवलं.
पहिला माणूस :- हम लोगो ने इतना पैसा दिया, बहोत सारे लोगो को ट्रेनिंग दिया, प्लान के मुताबिक ब्लास्ट हुये, मगर बंबई पुरी तरह से शांत है, ऐसा हमे पता चला है. बंबई अपनी रफ्तार से चल रही है. हम लोग जो चाह रहे थे, वो कुछ हो नही पाया.
दुसरा व्यक्ती :- जब प्लान किया था. तो ये हरामजादा शरद पवार सीएम नही था. ये तो पिचले हफ्तेही सीएम बना. उसकी एडमिनस्ट्रेशन कॅपॅसिटी बहुत अच्छी है. अगर ये पवार न होता, तो सब प्लान के मुताबिक होता.
पहिला माणूस :- तो फिर उसको इलीमिनेट कर दो… (संभाषण समाप्त)
या वरिष्ठ अधिकाऱ्याने पवारांना सांगितले की, पाकिस्तानचा क’ट तुम्ही धुळीस मिळवला आहे. त्यामुळे आता तुम्हाला कडेकोट बं’दो’ब’स्ता’त राहावे लागेल. यानंतर पवारांच्या लक्षात आले की, आपण आता पाकिस्तानचे लक्ष्य झालेलो आहोत.
यानंतर सुरजकुंड येथे झालेल्या अधिवेशनात पवारांनी स्पष्ट केले की, या मुंबई बॉ’म्ब’स्फो’ट प्रकरणात पाकिस्तानचा हात होता. पवारांनी सर्व गोष्टी पुराव्यानिशी समोर आणल्या. तसेच काही प्रश्नही उपस्थित केले.
पवारांनी केलेल्या या आ’रो’पा’मुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा ब’द’ना’मी झाली होती. आता ट’र’क’ले’ल्या पाकिस्तानने ‘चोराच्या उलट्या बोंबा’ अशी आपली मानसिकता दाखवत मोठे का’र’स्था’न केले. पाकिस्तानी उच्चायुक्त म्हणाले की, ‘या मुख्यमंत्र्यांचे अं’ड’र’व’र्ल्ड’शी संबंध आहेत, त्यांनीच हा क’ट घडवून आणला आहे.’ याप्रकरणानंतर पवारांचे दाउदशी संबंध असल्याचा आ’रो’प सुरु झाला होता.
पवारांचे पक्षांतर्गत वि’रो’ध’क असलेल्या काँग्रेसी नेत्यांनी या आ’रो’पां’ना खतपाणी घालण्याचे काम केले, असेही पवार आपल्या राजकीय आत्मचरित्रात सांगतात.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.