फुलपाखरू फेम वैदही म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या ट्याटूची गुपित गोष्ट तुम्हाला माहितेय?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

.

दोन वर्षांपूर्वी झी युवा वाहिनीवर फुलपाखरू ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. त्या मालिकेने तरुण – तरुणी असणाऱ्या रसिकांच्या मनावर राज्य केलं होतं. आजकालची माणसं चित्रपट आणि सिरीयल मध्ये दाखवल्या जाणाऱ्या प्रेमाकडे खुप आकर्षित होत असतात.

त्यामुळे अश्या मालिका पाहण्याकडे त्यांचा जास्त कल असतो. प्रेमाची व्याख्या आपल्या कथेतून व्यक्त करणाऱ्या फुलपाखरू या मालिकेतील वैदही – मानस ची जोडी खुप कमी वेळात घराघरात पोहचली होती.

6fdace647614bfe21808a3280b1bbfa2

त्यातील वैदहीची भूमिका करणारी अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या करियरचा हा अत्यंत महत्वाचा टप्पा होता. कारण तिची ही दुसरीच मालिका होती. पहिली तिची दुर्वा मालिका होती. त्या मालिकेमुळे तिला प्रचंड ग्ल्यामर मिळालं होतं. त्यामुळं तिच्या आयुष्यात नेमकं काय घडतं ? हे जाणुन घेण्याची प्रेक्षकांना खुप उत्सुकता असते.

तिचा जन्म १२ सप्टेंबर १९९३ ला मुंबईत झाला. तिचं शालेय शिक्षण दादरच्या एका इंग्रजी शाळेत झालं. पुढं मास कम्युनिकेशन विभागात तिनं रुपारेल कॉलेजमध्ये पदवी पुर्ण केली. याचं काळात तिची ओळख झाली ती दोन जिवलग तरुणींशी.

See also  सोनम कपूरच्या घरात आला नवा पाहुणा, अनिल कपूर बनले आजोबा...पहा व्हायरल फोटो....!

त्यांचं नातं इतकं घट्ट झालं की आजही तिघी एकमेकांच्या जवळच्या मैत्रीण बनून राहिलेल्या आहेत. दोन मैत्रिणी आणि ऋता यांची केमिस्ट्री नेमकं काय ? हे ही तुम्हाला पुढे वाचायला मिळेलच. मास मिडिया शिकताना तिला अभिनयाची खुप आवड निर्माण झाली. नाटक, सिनेमा आणि त्यातल्या अभिनयाच्या अभ्यासाचं काम सुरु झालं.

jpg

याच काळात तिला फुलपाखरू ह्या मालिकेत प्रमुख भूमिका करायची संधी मिळाली. अंत्यत कमी वेळात वैदही महाराष्ट्रात गावाशहरात फेमस झाली. मग अनेक चाहते तिला तिच्या पर्सनल जीवनाबद्दल विचारू लागले. त्यात सगळ्यात जास्त वेळा विचारण्यात आलेला प्रश्न होता हातावर असलेल्या एचडीपी नावाच्या ट्याटू बद्दल. काही दिवसापुर्वी तिनं सोशल मिडीयावर काही फोटोशूट अपलोड केलं होतं. त्यात काढलेला ट्याटू हा चाहत्यांचा चर्चेचा विषय बनला.

एका मराठी युट्युब वाहिनीवरच्या मुलाखतीत तिनं त्या ट्याटूचं गुपित सांगितलं आहे. रुपारेल मध्ये शिकताना आम्ही तिघी खुप जवळच्या मैत्रिणी बनून गेलो होतो. एकमेकांच्या सुखदुखात हक्कानं सामील होत होतो.

See also  शाहरुख खानने ऐश्वर्या रायला बऱ्याच चित्रपटांमधून जबरदस्तीने बाहेर काढले होते, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

त्या दोघींना मला वाढदिवसाला वेगळं काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं. तेव्हा ११ सप्टेंबर २०१६ मध्ये एचडीपी म्हणजेच ऋता, द्रुवा आणि पूर्वी असा हातावर तिघींनीही ट्याटू काढला. आम्ही तिघीही वेगवेगळ्या फिल्ड मध्ये काम करतो. महिन्यातुन जमलं तर कधीतरी भेटतो.

फोनवर वेळ मिळाला तर बोलतो. पण एवढं असूनही आमच्यातील मैत्री थोडीसुद्धा कमी झालेली नाहीये. आम्ही वेळ काढून हॉटेल मध्ये जेवायला जात असतो. काही वेळेस त्या दोघीच जातात. पण तिथं गेल्यावर अनेक चाहते “ तुम्ही ऋता म्याम च्या फ्रेंड्स आहात ना ” असं म्हणतात. तेव्हा आम्हा तिघींनाही खुप वाटतो. या सगळ्याचं निमित्त आहे हातावर काढलेला हा ट्याटू.

एवढंच नव्हे तर अनेक मराठी अभिनेत्री ने आपल्या हातावर, मानेवर ट्याटू काढलेले आहेत. दिल , दोस्ती, दुनियादारी या मालिकेतील लोकप्रिय झालेली अभिनेत्री सखी गोखले ही मूळची पुण्याची. ती सध्या लंडन मध्ये शिकत आहे. तिने एकुण तीन ट्याटू काढलेले आहेत. हातावर दोन आहेत.

See also  लग्न केल्यानंतर सुद्धा 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने का घेतला आई न होण्याचा निर्णय? कारण ऐकून थक्क व्हाल!

एक फुलपाखरू आणि दुसरं आईचं नाव. फुलपाखरु तिला खुप आवडतं. तर आई नेहमी सोबत असावी म्हणून तिच्या वाढदिवसाला तिने हे गिफ्ट ट्याटू काढुन आईला दिलं आहे. तिसरं आहे मानेवर पक्षी. आपण आयुष्यात नेहमी उंच उंच भरारी घेऊन उडवून आयुष्य घडवावं असं तिला वाटतं म्हणून तिनं हा ट्याटू काढलेला आहे.

रेशीमगाठी पासुन आज प्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिनं हातावर एक ट्याटू काढलेला आहे. तिचं असं म्हणणं आहे की मी ओशो ची भक्त आहे म्हणुन प्रभावित होऊन मी त्यांच्या नावाचा ट्याटू काढला आहे.

नेहा जोशी मेरी स्ट्री या हॉलिवूड अभिनेत्रीची प्रचंड फॅन आहे. ती असं म्हणते की ती माझ्यासाठी सर्व काही आहे. म्हणून ती नेहमी सोबत राहावी म्हणुन मी हा ट्याटू काढला आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment