कर्तव्यदक्ष IAS अधिकारी नवरा बायको महिलांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर फिरून राबवतायत “मिशन शक्ती” चं जागृती अभियान…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

नुकतेच झालेल्या उत्तरप्रदेश मधील हाथरस प्रकरणानंतर पुन्हा महिलांची सुरक्षाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. कारण अत्याचार वाढत चाललेले असताना त्यावि’रु’द्ध क’ड’क कायदा होणं खूप गरजेचं आहे. आता तो जर व्हायचा असेल तर त्याला खूप काळ लागेल. दोन संसदेत पास होणार आणि मग पुन्हा काही महिन्यांनी लागू होणार.

या सगळ्याची वाट न पाहता उत्तरप्रदेश मधील एका IAS नवरा बायकोने खूप उत्तम काम सुरू केलेलं आहे. त्याचा आदर्श साऱ्या देशानं घ्यायला हवं. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्या उपक्रमाची माहिती.

null

महिलांवर होणारे अ’त्या’चा’र रोखण्यासाठी या IAS नवरा बायकोच्या जोडीनं सरकारच्या मार्फत ” मिशन शक्ती ” हा उल्लेखनीय उपक्रम राबवलेला आहे. यातून महिला स्वतःची सुरक्षा आत्मनिर्भरतेनं सशक्त ताकतीने करू शकणार आहेत. मैनपुरीच्या रस्त्यावर उतरवून पायी घरोघरी, दारोदारी महिलांना, मुलींना जागृत करायचं काम हे IAS जोडी करत आहे.

See also  यंदाच्या वर्षी नवरात्री मध्ये अशाप्रकारे करा घटस्थापना, प्रसन्न होईल देवी दुर्गामाता, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजन विधी...

त्या दोन आयएएस नवरा बायको अधिकाऱ्यांचे नाव आहे, इशा प्रिया आणि ऋषीराज. इशा प्रिया या २०१६ च्या बॅच च्या अधिकारी आहेत. त्या सध्या मैनपुरीच्या भागात सीडीओ पदावर कार्यरत आहेत. त्या खूप कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.

bxxxx jpg

तर ऋषीराज हे २०१७ च्या बॅच मधील IAS अधिकारी आहेत. ते सध्या मैनपुरी जिल्ह्याच्या जॉईंट मॅजिस्ट्रेट पदावर कार्यरत आहेत. दोन्ही युवा IAS अधिकारी सध्या मिशन शक्ती हा उल्लेखनीय उपक्रम राबवत आहेत.

तेही रस्त्यावर उतरून. नाहीतर सध्या काही अधिकारी, मंत्री असे आहेत की रस्त्यावर तर जनतेच्या सेवेत उतरायलाचं तयार नाहीत. या दोघांनी महिलांच्या सुरक्षेबाबत जागृत करण्याचा उचलेला विडा खूप मोलाचा ठरणार आहे.

bxxx jpg

प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन तिथल्या महिलांना सांगतायत, की घाबरून जाऊ नका. लढा. आणि कसलीही अडचण आली तर आम्ही आहोतच. बाजारात खरेदी साठी आलेल्या महिलांना सुद्धा अशीच महत्वपूर्ण माहिती सांगून दोघे नवरा बायको, महिलांना सशक्त बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.

See also  या पाच वा'ईट सवयी आत्ताच सोडा नाहीतर, घरामध्ये टिकणारच नाही पैसा...

” तुम्हाला कुणी छेडलं तर नाही ना ? काही अ’प’श’ब्द नाही वापरले ना ? आता बिनधास्त पुढे या आणि सांगा. आपण त्यांना योग्य ती शिक्षा करू. तुम्ही असं आत्मनिर्भर व्हा की कुणाची हिंमत होणार नाही हात लावायची.

” मिशन शक्ती ” हा उपक्रम आधी फक्त नवरात्रीच्या आधारे नऊ दिवसांचाचं असणार होता. पण आता याच मिशनला सहा महिने चालवलं जाणार आहे. इशा प्रिया आणि ऋषीराज या दोन्हीही आयएएस अधिकाऱ्यांच्या या उपक्रमात अनेक जण सामील ही झालेले आहेत.

ज्यांना माहिती झाली ते सर्व त्यांचं कौतुक ही करत आहेत. कारण काम खूप अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. प्रामाणिक आहे. त्यांच्या या सकारात्मकतेनं महिलांच्या सुरक्षा दृष्टीने उचललेल्या पावलांना कडक सलाम !…

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment