अवघ्या 22 दिवसांच्या मुलीला कुशीत घेऊन ऑफीसवर रुजू झालेल्या “या” महिला IAS अधिकाऱ्यावर होतोय कौतुकाचा वर्षांव…

संपूर्ण देश या काळात कोरोना महामारीपासून स्वतःला वाचवण्यासाठी काळजी घेऊन लढत आहे. त्यात अधिकाऱ्यां पासून डॉक्टर पर्यंत, प्रत्येकजण आपापल्या परीने जवाबदारी पेलवत आहे.

अश्यात एक महिला IAS ऑफिसर सध्या खुप प्रेरणादायी ठरत आहे. सोशल मीडियावर तिच्या या धाडसाचं आणि जवाबदारीच्या यशस्वी रित्या पालनाने कौतुक होत आहे. आपल्याला उत्सुकता लागली असेल की नेमकं काय घडलं ? तर चला सविस्तर जाणून घेऊयात.

काय झालं, की महिला IAS ऑफिसरने नुकतंच एका मुलीला जन्म दिला आहे; पण अश्यात सुट्टीवर न जाता अवघ्या 22 दिवसांच्या मुलीला कुशीत घेऊन, ती पद सांभाळत आहे.


आयएएस सौम्या पांडेय हे त्यांचं नाव आहे. त्यांनी डिलीवरी झाल्यानंतर काही महिने सुट्टीवर न जाता कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रेरणा दिली आहे. अश्या परिस्थितीत देश सेवा करणं, हे काही सोपं काम नाही.

सौम्या पांडेय या, ‘ प्रयागराज ‘ येथील आहेत. त्या 2017 च्या बॅच मधील IAS ऑफिसर आहेत. ज्या सध्या संकटाना न घाबरता ठामपणे लढण्याचा संदेश देत आहेत.

सध्या IAS सौम्या पांडेय, या गजियाबादच्या मोदीनगर मध्ये कार्यरत आहेत. सरकारी अधिकारी म्हणून जॉईनच त्या या शहरांपासून झाल्या आणि अजूनही इथेच लोकसेवा करत आहेत, पदाच्या मार्फत.

सौम्या पांडेय यांचं मत असं आहे, की माझी जवाबदारी आहे, की माझं काम प्रामाणिक पणे सांभाळावे. आणि त्याच पद्धतीने मी काम सुरू केलेलं आहे. आज जनता संकटात आहे. तर मला त्यांच्या सेवेत सतत असणं खूप गरजेचं आहे. मग भलेही मला 22 दिवसांच्या मुलीला का नाही घेऊन यायला लागलं. किती सकारात्मक विचार. याला खरी देशसेवा म्हणूत.

IAS अधिकारी सौम्या पांडेय यांचे वडील एके पांडेय हे बिझनेसमन आहेत. आणि आई साधना पांडेय डॉक्टर आहेत. मोतीलाल नेहरू नेशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मधून सौम्या यांनी बीटेक ची डिग्री घेतली.

आणि भारतातील सर्वांत मोठं सरकारी पद म्हणजे यूपीएससी चा अभ्यास सुरू केला. आणि 2017 साली त्यांनी देशात चौथ तर महिलांमधून दुसरं स्थान मिळवलं. यावरून आपल्या लक्ष्यात आलं असेल की किती हुशार आणि धाडसी अश्या आहेत, IAS सौम्या पांडेय.

सौम्या पांडेय या पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यावर फार प्रभावित आहेत. आज त्यांच्या धाडसी निर्णयामुळे देशभरातून कौतुकास्पद वर्षाव होत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment