‘त्या’ मुलीच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीत दोषी आढळलो तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, माजी मंत्री संजय राठोड यांचे वक्तव्य

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

औरंगाबाद: मागे काही महिन्यांपूर्वी पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केली होती. त्या तरुणीचा संबंध शिवसेना नेते संजय राठोड यांच्याशी आहे. असा आरोप विरोधकांनी केला होता. प्रकरण वाढल्याने माजी मंत्री संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याबाबत औरंगाबाद मध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, संजय राठोड म्हणाले की, “चौकशीत जर मी दोषी आढळलो तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्यावर कारवाई करतील.”

धनंजय मुंडेबद्दल झालेल्या वादापेक्षा भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी तुमच्या प्रकरणात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, असं का? पत्रकाराने विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देताना  चंद्रकांतदादा पाटील हे एक अभ्यासू नेते आहेत,  मी त्यांच्याबद्दल काय बोलणार म्हणत संजय राठोड यांनी हा प्रश्न टाळला.

 

See also  जेव्हा सोनिया गांधींनी नाकारले होते अमिताभ बच्चन यांचे आमंत्रण, त्यामागील कारण ऐकून थक्क व्हाल!

नेमकं काय आहे प्रकरण?

बीड जिल्हयातील एक तरुणी पुण्यात शिक्षणासाठी आली होती. तरुणी टिकटॉक स्टार होती सांगण्यात येते. त्या तरुणीचे माजी मंत्री संजय राठोड यांच्याशी ओळख होती. अनेक कार्यक्रमात तिने संजय राठोड यांच्यासोबत झालेल्या भेटीचे फोटो तिने तिच्या फेसबुक पेजवर टाकलेले होते.

नंतर तिने काही कारणास्तव आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. तिच्या आत्महत्येनंतर तिचा मोबाइल आणि लॅपटॉप जप्त करण्याच्या सूचना दिल्याची एक ध्वनीफीत समाज माध्यमांवर वायरल झाली. त्या ध्वनिफिती मधील आवाज माजी मंत्री संजय राठोड यांचा असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता. भाजपने हा मुद्दा उचलून धरल्यामुळे संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुलीच्या कुटुंबियांनी यात संजय राठोड यांचा काही संबंध नसल्याचे म्हटले होते.

See also  मंत्रिमंडळ विस्तार : ‘हे’ आहेत कॅबिनेट विस्तारातील मोठे बदल
Preetam Gaikwad

Preetam Gaikwad

Leave a Comment