जर हि घटना घडली नसती तर या बॉलीवूड अभिनेत्याची पत्नी असती अभिनेत्री माधुरी दीक्षित…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुडची धकधक गर्ल, मनमोहनी अभिनेत्री माधुरी दीक्षित ही फक्त आपल्या देशातील लोकांच्याच नव्हे तर जगभरातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनलेली आहे. माधुरीने मागील दोन वर्षांपेक्षाही जास्त काळ आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले. तुम्हांला ठाऊक आहे का, त्या काळात माधुरीची एवढी क्रेझ होती की तिचे सौंदर्य लक्षात घेऊनच चित्रपटांच्या स्टोरी लिहिल्या जात असत.

अभिनेत्री माधुरी दीक्षित ही आपल्या कारकीर्दीत स्वतःचे करियर वगळता अफेयर्स मुळे सुद्धा प्रसिद्धीत होती. मुन्नाभाई फेम अभिनेता संजय दत्त सोबत माधुरीचे अफेयर प्रचंड गाजले होते. 1991 मध्ये तिचा “साजन” हा चित्रपट गाजला होता. त्यानंतर 1993 मध्ये “खलनायक” हा चित्रपट तर अगदी सुपरङुपरहिट झाला होता. त्यामुळे संजय व माधुरीची “ऑनस्क्रीन जोडी” चाहत्यांना तेव्हा भन्नाट आवडायची.

See also  रणवीर सिंहला कं'डोमच्या जाहिरातीत पाहून त्याचे वडील खूपच भ'डकले होते, अशी होती त्यांची रिएक्शन...

“खलनायक” या चित्रपटाच्या दरम्यान संजय दत्त व माधुरी दीक्षित यांच्यात प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाली होती. परंतु त्या दोघांच्याही घरच्यांना त्यांचे नाते मान्य नव्हते. संजय आणि माधुरी यांच्या घरच्यांचा स्पष्ट नकार होता. महत्त्वाचे म्हणजे माधुरी सोबत अफेयर सुरू असताना संजय दत्त आधीच विवाहित होता. म्हणून कुटुंबियांनी या दोघांवरही एकमेकांना भेटण्यासाठी पाबंदी लावली होती. तरीसुद्धा या दोघांच्याही एकमेकांसोबत भेटीगाठी सुरू होत्या.

त्यानंतर अभिनेता संजय दत्त हा एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात गेला असता, त्याची बहीण प्रिया दत्त हिने त्याला फोनवर अशी बातमी दिली की, त्यामुळे संजय पासून सगळी नाती दुरावली गेली. प्रिया दत्त ने त्याला सांगितले होते की, टाङा अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संजय दत्त जेव्हा घरी परतला, तेव्हा कुटुंबियांऐवजी पोलीस त्याची वाट पाहत होते. त्यानंतर लगेचच त्याला अटक करण्यात आली. टाङा अंतर्गत गुन्हा नोंद होणे म्हणजे संपूर्ण आयुष्य जेलमध्ये जगण्यासारखे होते.

See also  अखेर कतरिना-विक्की यांच्या लग्नाची तारीख ठरली! राजस्थानमध्ये संपन्न होणार यांचा विवाहसोहळा...

संजय दत्त च्या या कारणामुळेच संपूर्ण बॉलीवुड विश्वाला सुद्धा खूप मोठा धक्का बसला. कारण त्याच्यावर बरेच आरोप लावण्यात आले होते. संजय वरील या आरोपांनी तर माधुरी दीक्षित ला तर जबरदस्त धक्का बसला होता. तेव्हापासूनच माधुरीने संजय दत्त चा विषय कायमचा सोडला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्याने सुपरस्टार राजेश खन्नाच्या लगावली होती कानशिलात, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही!
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment