म्हणून एक नाही, दोन नाही तर तब्बल 21 सिनेमात अमिताभ बच्चन यांचे नाव विजय होते…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अनेकांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की एखादा अभिनेता यशाच्या शिखरावर गेल्यानंतर त्यांच्या प्रत्येक चित्रपटात भूमिकेचं नाव हे, ” विजय ” का असतं ? तर तेच आज आपण जाणून घेणार आहोत. चला सविस्तर जाणून. बॉलिवूडचे सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन यांचा काल वाढदिवस होता. ते काल 79 वर्षांचे झाले होते. कवी डॉ हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन यांचे पुत्र असलेले अमिताभ यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 रोजी उत्तर प्रदेशात झाला होता.

एक काळ असा होता जेव्हा त्यांना अभिनेता नाहीतर अभियंता व्हायचे होते किंवा हवाई दलात सामील व्हायचे होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्यांनी अखेर मुंबई गाठली आणि स्वतःहून चित्रपटसृष्टीत मोठे स्थान मिळवले आहे. आतापर्यंत त्यांनी या सिने उद्योगात 50 वर्षांहून अधिक काळ जोमाने लोकप्रिय, जगप्रसिद्ध असं काम केलेलं आहे, तसेच आजही ते नेहमीप्रमाणेच असलेल्या उत्साहाने सक्रिय असतात.

See also  जेव्हा गुपचूप या प्रसिद्ध अभिनेत्याने मंदिरात केलं होतं लग्न, पत्नीची कुंकूच्या ऐवजी चक्क लिपस्टीकने भरली होती मांग!

अमिताभ यांनी आतापर्यंत 205 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यापैकी 22 चित्रपटांमध्ये त्याचे नाव विजय होते. चित्रपटांमध्ये विजय हे नाव ठेवण्यामागचे कारण फार कमी लोकांना माहीत आहे. वास्तविक अमिताभ बच्चन यांनी सात हिंदुस्तानी या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

त्यांचा हा चित्रपट खराब फ्लॉप झाला. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि सलग 12 चित्रपट फ्लॉप ठरले. अनेक फ्लॉप चित्रपटांमुळे ते खूप निराश झाले होते. यानंतर, 1973 साली त्यांना प्रकाश मेहरा यांचा जंजीर चित्रपट मिळाला. यापूर्वी अनेक कलाकारांनी हा चित्रपट नाकारला होता.

कारण त्या वेळी कोणत्याही अभिनेत्याला रोमँटिक हिरोची प्रतिमा सोडून नाराज तरुण बनण्याची इच्छा नव्हती. प्रकाश मेहरा यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की जंजीरच्या शूटिंग दरम्यान अमिताभ खूप चिंताग्रस्त असायचे. शूटिंग वेळी सीन मध्ये गोळी लागल्यानंतर ते एकटे बसून कोकाकोला प्यायचे. पुढे प्रकाश जी म्हणाले, ” अमिताभ यांनी चित्रपटात त्यांचे शंभर टक्के योगदान दिले आहे. अमिताभ यांनी चित्रपटात निरीक्षक विजय खन्ना यांची भूमिका साकारली होती.

See also  प्रसिद्ध बॉलीवूड सिंगर नेहा कक्करने केली या प्रसिद्ध बॉलिवूडच्या म्हाताऱ्या गीतकाराला एवढ्या लाखांची मदत...

जंजीर चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटात त्यांच्यासोबत जया भादुरी मुख्य भूमिकेत होत्या. जंजीर चित्रपट हिट झाल्यानंतर ते सुमारे 21 चित्रपटांमध्ये विजयच्या भूमिकेत दिसले.

याबद्दल बोलताना, ते एकदा म्हणाले होते की, ” मनोरंजक उद्योगात एक अशी प्रथा आहे, ज्या नावाने एखाद्या स्टारचा चित्रपट यशस्वी होतो. आगामी चित्रपटांमध्येही त्यांचे तेच नाव ठेवले जाते. मी एकदा जावेद अख्तर यांना हीच गोष्ट विचारली होती, तेव्हा ते म्हणाले होते की विजय नाव असणारा सर्वकाही जिंकत असे, कदाचित म्हणूनच बहुतांश चित्रपटांमध्ये त्याचे नाव विजय होते. किंवा ठेवत असावे.

Leave a Comment