देवमाणूस मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये हा अभिनेता साकारणार डॉ. अजितकुमारची भूमिका…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

झी मराठी वाहिनीवरील प्रत्येक मालिका ह्या प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरतात. अशाच प्रकारे “देवमाणूस” या मालिकेने देखील रसिकांच्या मनात घर केले होते. ह्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावरही या मालिकेतील पात्रं ही रसिकांच्या मनात घर करुन आहेत. या मालिकेची लोकप्रियता पाहता दुसरा सीझन हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

जेव्हापासून दुसर्या सीझनची घोषणा झाली, तेव्हापासून या मालिकेविषयी माहीत करून घेण्यासाठी प्रेक्षक वर्ग खूप उत्सुक आहे. देवमाणूस 2 ची घोषणा झाल्यापासून निरनिराळ्या चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान, या मालिकेत ङॉ. अजित कुमारची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड दिसणार नसल्याच्या अनेक चर्चा ऐकायला मिळत होत्या.

See also  या मराठमोळ्या अभिनेत्रीने उचलले पाऊल, तिच्या या कार्याला कराल तुम्हीपण सलाम, जाणून घ्या तिच्या कार्याची गाथा...

सोशल मीडियावर सुद्धा अनेकांनी किरण ही भूमिका आता साकारणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र या सर्व बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही. त्यामुळे ङॉ. अजित कुमारची भूमिका अभिनेता किरण गायकवाड साकारणार आहे. त्याचप्रमाणे या मालिकेतील बज्याची भूमिका साकारणारा अभिनेता किरण ङांगे हा सुद्धा दुसर्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे.

अभिनेता किरण गायकवाडने 2017 साली “लागीरं झालं जी” या मालिकेत भैय्यासाहेबाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने 2020 मध्ये देवमाणूस मालिकेत अजितकुमारची भूमिका साकारली. मात्र या मालिकेत त्याने अतिशय नकारात्मक भूमिका साकारली. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम लाभले. तर आता दुसर्या सीझनमध्ये चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  निलेश साबळे यांनी नारायण राणेंच्या घरी जाऊन मागितली माफी, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment