भारतीय मसाल्यांचे हे अद्भुत फायदे वाचून थक्क व्हाल, या मसाल्यात तर आहेत औषधी गुणधर्म…
भारतीय लोकांना मसाले प्रत्येक पदार्थात लागतातच. केवळ चटणी-मिठावर ते समाधानी होत नाही. जर योग्य प्रमाणात ह्याचे सेवन केले तर आरोग्यासाठी फायदे होतात परंतु कोणत्याही मसाल्याचे अति प्रमाणात सेवन केल्यास अपचन किंवा अल्सर देखील होऊ शकते. चला तर जाणून घेऊया तुमच्या घरातील मसाल्याचा डबा तुमच्यासाठी किती आरोग्यदायी आहे.
जिरे: जिरे-मोहरीशिवाय फोडणी जणू अपुरी असते. अपचनासाठी जिरे फायदेशीर आहेतच शिवाय अनेमिया, सर्दी ह्यावरदेखील गुणकारी आहेत. ह्यासोबतच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि मूळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
काळी मिरी: पचनास उपयुक्त असणारे ऍसिडचे प्रमाण वाढवण्याची क्षमता काळी मिरी मध्ये असते. पचनसमस्या, बद्धकोष्ठता, रक्तदाब कमी करण्यासाठी ह्याचा फायदा होतो. शिवाय ह्यात अँटी-बॅक्टेरिअल गुण देखील असतात.
दालचिनी: आमटी, पुलाव ह्यात वापरल्या जाणाऱ्या सुगंधी दालचिनीचा उपयोग अपचन, सर्दी, अतिसार, कमी रक्ताभिसरण आणि मासिक पाळी दरम्यान येणारा तणाव कमी करण्यासाठी होतो. ह्यात असणारे अँटी-इन्फ्लामेट्री गुणधर्म पेशी आणि मज्जासंस्थेस हानी पोहोचविणार्या फ्री रॅडिकल्स तयार होऊ देत नाही आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करतात.
धने: ह्यात अँटीमाइक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्म असल्याचा दावा केला जातो. हे रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.
जायफळ: लवंगा प्रमाणेच जायफळमध्येही अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. हे दात किडण्यावर उपयुक्त आहे. याशिवाय स्मरणशक्ती व भूक वाढवण्यास देखील गुणकारी आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.