या मुस्लिम देशात हजारो लोक एकत्रित येऊन करतात श्रीगणेशाची भक्तीभावाने पूजा, वाचून तुम्हांला सुद्धा आश्चर्य वाटेल…
गणेशोत्सव हा आपल्या देशातील सर्वांत मोठा सण आहे. हा सण गणेशभक्त अतिशय आनंदाने साजरा करतात. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा असणारा एक मुस्लिम देश इंडोनेशियामध्ये कित्येक शतकांपासून होणारा कसदा यज्ञ नावाचा धार्मिक सोहळा तेथे शनिवारी पार पडला.
त्यामध्ये इंडोनेशियामध्ये राहणारे टेंगर जमातीतील लोक या उत्सवात फार मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या उत्सवात देवतांचा उत्सव साजरा करण्यासाठी प्रोबोलिंगगो येथे असलेल्या ज्वा’ला’मु’खीच्या खङङ्यात धान्य, भाज्या व इतर पदार्थ ठेवतात आणि पूजा करतात.
विशेष म्हणजे ही आदिवासी जमात स्वतःला हिंदू समजते आणि श्रीगणेशाची पूजा करतात. एवढंच नव्हे तर या खङङ्यातून प्रसाद मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा करतात. असे म्हणतात की, या ठिकाणी असलेल्या गणेशाची पूजाअर्चा केल्याने आणि ज्वा’ला’मु’खी’ला फळे आणि भाज्या अर्पण केल्याने त्या ज्वा’ला’मु’खीचा स्फो’ट होत नाही व त्यामुळेच ते हिंदू आदिवासी सुरक्षित राहतात.
इंडोनेशियामध्ये राहणारे हे आदिवासी लोक हिंदू परंपरेशी खूप संबंधित असल्याचे म्हटले जाते. ते सर्वजण माऊंट ब्रोमोमार्गे आपल्या पूर्वजांची उपासना करतात. यामध्ये खेड्यांची स्थापना करणारे, खेड्यांचे संरक्षण करणारे आणि त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या आत्म्यांना संतुष्ट करण्यासाठी ते विधिवत पूजा करतात.
मागील काही दशकांत टेंगर जमातीतील लोकांचे खूप शोषण होऊ लागले आहे. त्यामुळे इतर भागातील लोकांच्या क्षेत्रात वाढत्या घुसखोरीमुळे लोकसंख्येचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्याचप्रमाणे टेंगर समाजातील सुमारे दहा हजार लोकांचेही इस्लाम धर्मात रुपांतर झाले आहे.
इस्लामिक मिशनरी कारभारामुळे येथील टेंगर जमातीच्या लोकांनीही संस्कृती आणि धर्म वाचवण्यासाठी बालिनी हिंदूंची मदत घेतली आहे. इंडोनेशियामधील सरकारने टेंगर पर्वत ब्रोमो- टेंजर- सेमेरू राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले. तसेच बाहेरील लोकांना आता इथे स्थायिक होण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.