‘चलो नगर’ हि पोस्ट वायरल होत असताना इंदुरीकर महाराजांनी चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन!
पुत्रप्राप्तीच्या फॉर्म्युल्यावरुन वादाच्या भोवऱयात अडकलेल्या हभप. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या समर्थनार्थ आता मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर इंदुरीकर महाराजांनी एका पत्रकाद्वारे चाहत्यांना मोर्चे, आंदोलन किंवा रॅली न काढण्याचे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे.
इंदोरीकर महाराजांनी पत्रक प्रसिद्ध करुन, समर्थकांना आंदोलन न करण्याचं आवाहन केलं आहे. या पत्रकात इंदोरीकर महाराजा म्हणतात, “चलो नगर म्हणून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. आपण सगळे माझ्यावर प्रेम करणारी भक्त मंडळी आहात. वारकरी संप्रदाय हा शांतताप्रिय आहे. तरी आपणा नम्र विनंती करण्यात येत आहे की, आपण कोणीही, कुठेही, रॅली, मोर्चा, एकत्र जमने, आंदोलन करणे, निवेदन देणे असे काहीही करण्याचा प्रयत्न करु नये. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहोत. तरी आपण सर्वांनी शांतता राखून सहकार्य करावे ही विनंती”
‘सम तारखेला स्त्री संग केल्यास मुलगा होतो तर विषम तारखेला स्त्री संग केल्यास मुलगी होते.’ या कीर्तनातील वक्तव्याने इंदुरीकर मागील चार दिवस ट्रोल होत आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची मागणी काही संघटनांकडून होत आहे.
तर एकीकडे त्यांच्या समर्थनार्थ आता मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकाद्वारे चाहत्यांना शांततेचे आवाहन केले आहे. दरम्यान, हा वाद थांबला नाही तर कीर्तन सोडून शेती करण्याचे संकेतही त्यांनी दोन दिवसांपूर्वी दिले आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.