इंदुरीकर महाराजांनी केलं ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य, गुन्हा दाखल होण्याची शक्यता!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ओझर येथे झालेल्या किर्तनात ” सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” असे वक्तव्य केलं होते. गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात करून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22चे उल्लंघन केल्याप्रकरणी इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

यानुसार PCPNDT च्या सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना नोटीस पाठवली आहे. इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी खुलासा मागितला आहे. नोटीस बजावल्यानंतर जर पुरावे आढळले तर गुन्हा दाखल करण्यात येईल असंही PCPNDT च्या सदस्यांनी म्हटलं आहे.

See also  मराठमोळ्या श्रेयस तळपदेने चक्क केले "पुष्पा" चित्रपटाचे ङबिंग, आजपर्यंतचे अनेक कटु अनुभव मांडत त्याने केला आपला ङबिंग प्रवास

0indurikarmaharaj 20gunha

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या झालेल्या प्रत्येक कीर्तनाचा व्हिडिओ हा ‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या यूट्यूब चॅनेलद्वारे ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येतात. ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होतात, असे विधान इंदुरीकर यांनी एका ४ जानेवारीला यूट्युब चॅनेलवर अपलोड केलेल्या त्यांच्या कीर्तनाच्या व्हिडिओमध्ये केले होते.

या संदर्भात एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दाखल घेत अहमदनगर मधील पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आली. हे वक्तव्य म्हणजे PCPNDT कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन असल्याचा आरोप या समितीच्या सदस्यांनी केला.

1644719920548866

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी त्यांच्या किर्तनातून अनेकदा सामाजिक, राजकीय क्षेत्रांमधील ज्वलंत विषयावर कीर्तन करुन अनेकांची मनं जिंकली आहेत. मात्र आता गर्भलिंग निदानाबाबत वक्तव्य केल्या प्रकरणी इंदोरीकर यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

See also  चक्क हॉलिवुडच्या या सुपरहिरोने आपल्या मुलीचे नाव ठेवले आहे 'इंडिया' !

यानंतर आता त्यांना PCPNDT ने या प्रकरणात नोटीस बजावली आहे. नोटीस बजावल्यानंतर याप्रकरणी त्यांनी स्पष्टीकरण द्यावं असंही PCPNDT ने म्हटलं आहे. इंदोरीकर महाराज हे त्यांच्या किर्तनातून विविध विषयांवर भाष्य करत असतात. त्यांची ही किर्तनं यू ट्युबसह सोशल मीडियावर चांगलीच व्हायरलही होतात. मात्र यावेळी त्यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांच्या अडचणी वाढवणारं ठरण्याची शक्यता आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment