तुम्हाला माहित आहे का ? असे एक झाड त्या झाडाला स्पर्श होताच जळतं शरीर !

सध्यातरी लाॅकडाऊन, कोरोना, अनेकांचे फेसबुक लाईव्हज् आणि सोबतचं अर्थतज्ज्ञांचे विविध दिवसाला विविधांगी अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे विचार; अशा पद्धतीचं एकूणचं वातावरण या भयंकर विषाणूने सर्वस्त्र जगभर करून ठेवलं असताना एक “वृक्ष” अर्थात एक झाड चर्चेत येतयं. या झाडाची खासीयत ऐकताक्षणी अगदीचं माणूस जरासा धसका घेऊन घाबरल्याशिवाय राहत नाही. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या झाडांचे माणसाच्या अंगाच्या संपर्कात येण्याने किंवा स्पर्शाने किती गंभीर परिणाम होऊ शकतात, हे आजवर काहीवेळा विज्ञानातून सिद्ध झालेलं आहे.

पण इथे ब्रिटनमधल्या या झाडाची किमया थोडीशी वेगळी आणि सरस ठरणारी आहे. ती किमया अगदी धांदलीत पाडते.
अर्थात राॅयल हाॅर्टीकल्चर येथे कार्यरत असलेल्या तज्ञांनी सध्या सांगितलं आहे की, या उल्लेखलेल्या झाडांची वाढ अचानक गेल्या काही दिवसांपासून अनेक देशांमधे होतं आहे. केवळ एवढचं नसून या झाडांमुळे अनेक लोकांना इजाही झाल्याच्या घटना घडत आहेत. “जायंट हाॅगवीड” अर्थात हेराक्लेम मेंटेगेजियम या बाॅटनीकल नावाने ओळखलं जाणारं हे ते झाड आहे.

फुलांचा रंग मोहक पांढरा आणि गोराकारशा आकाराने बहरलेलं हे झाड पाहताक्षणी कोणालाही मोहात टाकून स्वत:कडे लक्ष वेधून घ्यायला लावतं, पण सावधानता बाळगली जावी कारण हे झाड खूप घातक आहे. लोक जेव्हा केव्हा या झाडाला स्पर्श करायला जातात हे झाड तेव्हा त्यांना स्पर्शातून घातक जखमा करतं.

या झाडामधे अनेक हानीकारक केमिकल्सचा समावेश आहे, प्रामुख्याने “फोटोसेंसिटीसींग फाॅरनान्कोमेरियन” या रसायनाच्या असण्याने झाडाचा स्पर्श तुमच्या हातांवर अथवा संपर्कात आलेल्या भागावर अगदी आगीने जळल्यासारखे व्रण त्या भागावर निर्माण करतो. अनेकवेळा यामुळे मानवाच्या शरीरात आतवर परिणाम होणाऱ्या त्वचेच्या संपर्कातातील पेशी मरण पावतात.

त्यामुळे त्वचेच अफाट नुकसान होतं. मुळात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटेनमधे अनेक तक्रारी याबद्दल लोकांच्या समोर येऊ लागल्या आहेत. यावर अजून उपचारासंबंधी पुरेशा गोष्टी नजरेत आलेल्या नाही आहेत.

Leave a Comment