राजकारणात नसते तर ‘तिथे’ असते राज ठाकरे; वाचा, स्वतः राज ठाकरेंनीच सांगितलेली माहिती

ठाकरे कुटुंब आणि महाराष्ट्राचे राजकारण हे एकमेकांशी जोडलं गेलेलं समीकरण आहे. सुरुवातीला केशव सीताराम ठाकरे अर्थात प्रबोधनकार ठाकरे यांचा महाराष्ट्राची सामाजिक जडणघडण करण्यात मोठा वाटा होता. पूर्णवेळ समाजकारणासाठी वाहून घेतलेल्या प्रबोधनकार ठाकरेंच्या पोटी अशी मुले आले की, ज्याचं वर्णन आजही ‘बाप से बेटा सवाई’ असं करता येऊ शकतं.

860645 raj thackeray 1 dna

ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीलाही ‘पुत्र व्हावा ऐसा गुं’डा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’ असे वर्णन साजेसे ठरते. ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीतील उद्धव आणि राज ठाकरे सध्या राजकारणात आहेत. उद्धव आणि राज या भावांनी मराठी माणसासाठी एकत्र यावे, अशी आजही अनेक मराठी बांधवांची इच्छा आहे. अर्थात ते एकत्र येतील की नाही? हे येणारा काळ ठरवेल.

आक्रमक भाषा आणि भूमिका याच्या जीवावर बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. उद्धव अगदी बाळासाहेबांच्या विरुद्ध स्वभाव असलेले नेते आहेत. मात्र आजही अनेक जुन्या लोकांना राज यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसते. तोच आक्रमकपणा, तोच रांगडी आणि बेदरकार भाषा हे सगळं राज ठाकरेंना मिळालं असलं तरी राज ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला आजवर अपेक्षित यश मिळालेलं नाही.

See also  हरलीन देओलने पकडलेल्या कॅचचे पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक, पहा व्हिडीओ

71239912

आता राज यांच्या अपयशाची कारणे आपण  नंतर कधीतरी बोलूच. मात्र प्रसिद्ध संगीतकार आणि कलासक्त माणूस असलेल्या श्रीकांत ठाकरेंच्या पोटी आलेले राज ठाकरेंचे खरे नाव ‘स्वरराज’ आहे. राजही एकदम रसिक आणि कलासक्त व्यक्ती आहेत. त्यांना सिनेमा पाहायला प्रचंड आवडते.

मात्र काकांच्या प्रभावामुळे राज ठाकरे हे राजकारणात आले. एवढेच नाही तर व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे नावाजलेले आहेत. या क्षेत्रातही त्यांच्या काकांचा म्हणजेच बाळ ठाकरेंचा त्यांच्यावर प्रभाव होता.

raj

यापलीकडे जाऊन राज ठाकरे यांचा चित्रकला हा विषय आवडीचा आहे. त्यांनी या विषयात आवड असल्याने सर जेजे स्कूल ऑफ आर्ट येथून त्यांनी पुढील शिक्षण घेतलेले आहे.

अखेर कला हा प्रांत सोडून राजकारणाकडे वळलेल्या राज ठाकरेंनी शिवसेनेत संघटना बांधण्यास सुरुवात केली. आणि शिवसेनेत राज यांचाही शब्द काही ठिकाणी अंतिम मानला जाऊ लागला. नंतरच्या काळात काय झाले हे आपणास ठावूक आहेच.

See also  एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचा भाजपवर हल्ला, वाचा कोण काय म्हणाले ?

Raj Thakery

रोज एखादा तरी सिनेमा बघणारा, पुस्तक वाचण्याची आवड असणारा, साहित्याची जान असणारा आणि राजकारणात कुणालाही अंगावर घ्यायची धमक असणारा व्यक्ती म्हणजे राज ठाकरे होय. त्यांना एकदा कुठल्या तरी मुलाखतीत विचारले होते की, जर तुम्ही राजकारणात नसतात तर काय केलं असतं?

त्यावर राज ठाकरे म्हणाले होते की, मी व्यंगचित्र काढतो. मला चित्रकलेची आवड आहे. मी राजकारणात नसतो तर ‘वाल्ट डीस्नेच्या’ स्टुडिओमध्ये चित्र काढत असतो. कारण ते माझे प्रेरणास्थान आहे. ‘वाल्ट डीस्ने’ स्टुडिओ म्हणजे आपण लहानपणी जे मिकी माउस बघितले आहे. ज्यांनी मिकी माउसचा शोध लावला ते ‘वाल्ट डीस्ने’.

raj thackeray 1

लहानपणापासून चित्रकला, साहित्य आणि इतरही कलांशी जोडून राहिलेला माणूस हेच उत्तर देणार. राज ठाकरे आजही अनेकदा आपल्या ब्रशच्या फटकाऱ्याने अनेक व्यंगचित्र काढत टीका करत असतात. कलेच्या अधीन राहिलेल्या राज ठाकरेंना राजकारणात अद्याप तरी पुरेसे यश मिळाले नसले तरीही आजही राज्याच्या राजकारणात त्यांच्या नावाचा दबदबा खूपच मोठा आहे.

See also  दिलासदायक: ‘या’ भागात वीजबिल वसूल न करण्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांचे आदेश

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close