या गोष्टीवर चिडून अमरीशपुरींनी गोविंदाच्या कनशिलात लगवली होती, कारण ऐकून थक्क व्हाल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो बॉलिवूड मध्ये अनेक कलाकार होऊन गेले आहेत, काहीजण नायक म्हणून गाजले तर काहीजण खलनायक म्हणून गाजले. त्यांच्या पैकी आज आपण प्रसिद्ध खलनायक अमरीश पुरी यांच्या आयुष्यातील एक किस्सा जाणून घ्यायचा आहे. मित्रहो अमरीश पुरी हे खलनायक म्हणून भरपूर गाजले, त्यांनी आजवर अनेक चित्रपटात अति उत्कृष्ट काम केले आहे. लोक त्यांना आजही खूप घाबरतात हा त्यांचा चांगला अभिनयाचा एक पुरावाच आहे. भरपूर चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली होती, त्यामुळे त्यांची ओळख देखील अशीच निर्माण झाली आहे.

त्यांनी फिल्म रेशमा आणि शेरा या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती, त्यांची प्रोफेशनल लाईफ नेहमीच सक्रिय आणि प्रसिद्ध राहिली आहे. तसेच त्यांची पर्सनल लाईफ देखील अनेक किस्यातून चर्चेत राहिली आहे. पडद्याआड खूपशा घटना अशा घडल्या होत्या, ज्या सांगताना अनेक आठवणी ताज्या होत असतात. अमरीश पुरी यांनी पडद्यावर असताना अनेक चित्रपटात फिल्म मधील नायकाशी पंगा घेतला होता. त्यांचे खूप खूप हाल केले होते, मात्र आजचा हा किस्सा त्यांच्या खऱ्या जीवनातील असून एका अभिनेत्याला त्यांनी खूप सुनावले होते.

See also  खुपच बदलली आहे "तारक मेहता..." मधील दयाबेन, अभिनेत्रीला ओळखणं ही झालं कठीण...

मीडिया रिपोर्ट्स नुसार अमरीश पुरी यांचा राग आणखी कोणावर निघाला नसून सुपरस्टार गोविंदा याच्यावर निघाला होता. रागात येऊन त्यांनी गोविंदाला “घाणेरड्या नाली मधील किडा..” असे म्हणले होते. इतकेच बोलून न थांबता त्यांनी गोविंदाला खानाखाली देखील वाजवली होती. हे सगळं घडण्या मागील कारण असे होते की गोविंदा एके दिवशी संध्याकाळच्या वेळी शूटिंगसाठी सेटवर पोहचला होता, पण शूटिंगची वेळ सकाळची ठरलेली. याच कारणामुळे अमरीश पुरी खूप नाराज झाले होते.

जेव्हा गोविंदा उशिराने संध्याकाळी पोहचला तेव्हा त्याला पाहून अमरीश पुरी यांचा राग अनावर झाला. त्यांनी गोविंदाला खूप काही सुनावले. एवढेच करून न थांबता त्यांनी रागात येऊन गोविंदावर हाथ देखील उचलला. मात्र त्यावेळी गोविंदाने नमतापणा घेतला व आपले सिनियर कलाकार आहेत म्हणून त्याने काहीच प्रतित्त्युर दिले नाही. त्याने त्यांचा सगळा राग गप सहन केला व त्यावेळी शांत राहिला. पण अनेक कलाकार अमरीश पुरी यांच्या बद्दल बोलताना खूप छान किस्से सांगत असतात.

See also  प्रसिद्ध अभिनेत्रीनी लग्नानंतर सोडले बॉलीवूड आणि झाल्या परदेशात स्थायिक, 3 नंबरची ने तर...

त्यांनी वयाच्या ३५ वर्षात ४०० फिल्म पूर्ण केल्या होत्या, अनेक सहायक कलाकारांसोबत त्यांचे संबंध खूप चांगले होते. आपल्या यशावर त्यांना कधीच गर्व झाला नाही, अनेक चित्रपटात त्यांच्या अतरंगी भूमिका भेटीस आल्या आहेत. त्यांच्या सारखा उत्कृष्ट खलनायक आजवर पडद्यावर झळकला नाही.त्यांच्या अभिनयाची झलक पाहताना आजही त्यांच्या अनेक आठवणी ताज्या होतात. त्या नेहमी अशाच ताज्या राहून त्यांची लोकप्रियता वाढत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा तसेच जर लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment