अभिनेत्री ऋता दुर्गुळे आहे “या” व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये? लवकरच लग्न करणार?
टेलिव्हिजनवरील छोट्या पडद्यावर काम करणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिला बहुतांश घराघरांत “फुलपाखरू फेम वैदेही” या नावानेच ओळखले जाते. झी युवा वाहिनीवरील फुलपाखरू या मालिकेतूनच ऋताने आपल्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीतील एक पॉप्युलर अभिनेत्री म्हणून तिची ओळख आहे. परंतु हल्ली आपली ऋता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ते म्हणजे तिचे “रिलेशनशिप”.
काय झालं हो….तुम्हांला सुद्धा ऐकून धक्का बसला ना…हे खरं आहे मित्रांनो.. अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही सध्या रिलेशनशिपमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावरून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्यानंतर ऋता सतत आपले फोटोज् आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेयर करत असते. हल्ली हे ब्युटीफूल कपल आपले एकमेकांसोबतचे फोटोज् शेयर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे.
हल्लीच हृताने एक पोस्ट शेयर केली आहे, त्यामध्ये तिने आपला प्रियकर प्रतीक सोबतचा एक फोटो शेयर केला आहे. यामध्ये तिने कॅप्शन दिले आहे की, “मी एवढी लकी कशी बरं? प्रतिक तुझे खूप खूप धन्यवाद. तुझे कधीही न संपणारे विनोद, बङबङ, आनंददायी लोभस मैत्री, व आयुष्यभरासाठीचे प्रेम हे आज, आता आणि यापुढे देखील असेच कायम असेल.” मात्र या फोटोसोबत तिने दिलेले हॅशटॅग मात्र चर्चेचा विषय ठरत आहेत.
कारण या फोटोला ऋताने #8daystogo #happiness #positovevibes #grateful #blessedandhow हे हॅशटॅग दिले आहेत. यामधील फक्त आठ दिवस बाकी हा हॅशटॅग सध्या खूप चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत नक्की काय आहे बरं?? असा प्रश्न सध्या ऋताचे चाहते विचारत आहेत.
त्यामुळे तिच्या या फोटोखाली चाहत्यांनी नेमके आठ दिवस कशासाठी बरं?? असे कमेंट्स मध्ये लिहिले आहे. तर काहीजण तिला तुम्ही आठ दिवसांनी लग्न करणार आहात का? असे सुद्धा विचारत आहेत. एका नेटकर्याने तर “24 ङिसेंबरला नक्की काय आहे बरं….आम्ही खूप उत्सुक आहोत बरं…” असे कमेंट मध्ये सांगितले आहे.
तर सध्या अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही झी मराठी वाहिनीवरील “मन उङु उङु झालं” या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तर प्रतिक ने देखील कित्येक मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. त्याने बेहद 2, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदङी या मालिकांसाठी काम केले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.