लक्ष्मीकांत बेर्डेची लेक स्वानंदी गुंतलीय मोदीच्या प्रेममध्ये…? नेमका आहे कोण हा तिचा मिस्टर परफेक्ट?

प्रिय वाचकहो! काय?, वाचून आश्चर्यचकित झालात वाचून… होय, सध्या स्वानंदीची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वानंदीने शेअर केलेल्या या फोटोच्या कॅप्शनने तिच्या चाहत्यांच्या आणि मराठी रसिकांचे लक्ष नजरा वेधून घेतले आहे.

होय, स्वानंदी बेर्डेची ही पोस्ट आणि फोटो पाहून आपला सर्वांचा लाडका मराठी सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे चक्क प्रेमात? आणि मग कोण आहे तिचा आयुष्यातील हा मि. परफेक्ट? असे प्रश्नं रसिकांना पडणे साहजिकच आहे, याचे मुख्य कारण म्हणजे, आता आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वानंदी सुद्धा अभिनयाच्या दुनियेत येण्यासाठी सज्ज आहे.

actress swanandi berde images

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे ही नेहमीच सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती तिच्या फोटोशूटचे आणि इतरही काही फोटो ती कायमच शेअर करत असते. अनेकदा ती तिने अपलोड केलेल्या फोटोंमुळेच चर्चेत येत असते. सध्या स्वानंदीची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. होय, ही पोस्ट पाहिल्यानंतर स्वानंदीला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळाला, असे मानले जात आहे. फोटोच्या कॅप्शनने चाहत्यांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत.

READ  'टाईमपास’ चित्रपटातील प्राजु आता दिसते खूपच ग्लॅमरस, तिचे फोटो सोशल मीडियावर होतायत प्रचंड व्हायरल...

स्वानंदीने एका मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. “प्रेम मोदी” असे या फोटोतील तरूणाचे नाव आहे. तरूणासोबत स्वानंदीने अतिशय स्टाईलिश पोज दिल्या आहेत. कॅप्शन तर असे की, सध्या त्याचीच चर्चा आहे.

instapst

“तुझ्य चेह-यावरचे हास्य पाहण्यासाठी मी काहीही करु शकते. आयुष्यातील कठीण काळात आपण अधिक जवळ आलो आहोत. आता तुझी इतकी सवय झाली आहे की, एकटीला भिती वाटते आहे. खुप प्रेम…,” असे या पोस्टसोबत स्वानंदीने लिहिले आहे.

आणि विशेष म्हणजे तिच्या या पोस्टला प्रेम मोदीनेही अगदी प्रेमभरे साजेसे असेच उत्तर दिले आहे. त्यानेही स्वानंदीसोबतचा सेम फोटो शेअर करत, आपले प्रेम व्यक्त केले आहे. प्रेम मोदी म्हणतो.

maharashtra times

“हा फोटो आपल्या मैत्रीचे दर्शक आहे. आयुष्याच्या कठीण काळात तू माझा हात धरलास, माझ्या विनोदांवर खळखळून हसलीस. ही वेडी मुलगी माझ्या आयुष्याची ताकद आहे. तुला वाटते, त्यापेक्षा अधिक मी तुझ्यावर प्रेम करतो. माझ्या डबल मिनींग जोक्सवर हसण्यासाठी आणि माझ्यावर निस्सीम प्रेम करण्यासाठी तुझे आभार…”

READ  हाॅ'ट अदांसाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का? ट्रेलर पाहून थक्क व्हाल!

एकेकाळी आपली मराठी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या आपल्या आई वडिलांच्या तसेच नुकतेच अभिनयाच्या क्षेत्रांत आपले पाय रोवू पाहणाऱ्या आपला भाऊ अभिनय बेर्डे याच्या पावलावर पाऊल ठेवत स्वानंदी सुद्धा अभिनयाच्या दुनियेत येण्यासाठी सज्ज आहे. ‘रिस्पेक्ट’ या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. स्वानंदीला तिच्या भावी चित्रपट कारकिर्दीसाठी स्टार मराठी टीम तर्फे हार्दिक शुभेच्छा!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे नव्या चित्रपटाच्या लूकमधील फोटो झाले व्हायरल, चित्रपटचं नाव ऐकून थक्क व्हाल..

Leave a Comment