खुपच बदलली आहे “तारक मेहता…” मधील दयाबेन, अभिनेत्रीला ओळखणं ही झालं कठीण…
“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा शो मागील 13 वर्षांपासून रसिकांचे मनोरंजन करत आहे. या शो मधील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या मनात घर निर्माण केले आहे. सर्वांत लोकप्रिय म्हणजे गरबा क्वीन दयाबेन ह्या या शो मधील एक महत्त्वपूर्ण पात्र आहेत. अभिनेत्री दिशा वकानी ही भूमिका साकारत आहे. काही वर्षांपूर्वीच दिशा ने हा शो सोडला असला तरीही आजही ती खूप फेमस आहे.
अभिनेत्री दिशा वकानी हिने हा शो सोडल्यावर तिचे अनेक फोटोज वायरल होत असतात. ती सध्या कुठे आहे? काय करते? याचा शोध तिचे फॅन्स नेहमीच घेत असतात. नुकताच दिशाचा एक फोटो वायरल झाला आहे. यामध्ये ती आपल्या बाळासोबत दिसत आहे. तिचा हा फोटो अजिबात मेकअप न केलेला आहे. हा फोटो पाहून तिचे वजन काही प्रमाणात वाढलेले दिसत आहे. त्याचप्रमाणे तिच्या चेहऱ्यावर सुद्धा काहीशा प्रमाणात थकवा जाणवत आहे.
अभिनेत्री दिशा वकानी च्या या लुकमध्ये खूप फरक पाहायला मिळत आहे. खरंतर तिला ओळखणे देखील कठीण होऊन बसत आहे. दिशाचा हा फोटो तिच्या एका फॅन क्लबने पोस्ट केलेला आहे. त्यामुळे दिशा प्रत्यक्षात कशी दिसते, हे मात्र अजूनतरी समोर आलेले नाही.
“तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मध्ये अभिनेत्री दिशा वकानी ने दयाबेन ची भूमिका साकारली आहे. परंतु मागील तीन वर्षांपासून ती या शो मध्ये दिसत नाही. त्यामुळे दयाबेनला पुन्हा या शो मध्ये पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. ती पुन्हा केव्हा शो मध्ये दिसणार, याविषयी तिचे चाहते कित्येकदा सोशल मीडियावर विचारताना दिसतात.
अभिनेत्री दिशा वकानी 2017 मध्ये मॅटरनिटी लिव्हवर गेली होती. तेव्हापासून ती “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो पासून लांब गेल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर काही महिन्यांनीच तिने या शो चा निरोप घेतला.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.