डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा करतोय शेतीतून लाखोंची कमाई, शेतीची प्रगती पाहून थक्क व्हाल!

.

“नोकरी करणारा दुसऱ्यांसाठी कठोर परिश्रम करून कमावतो, पण शेतकरी स्वतःसाठी कठोर परिश्रम करून स्वतःसोबत बरोबरच्या सगळ्यांनाच समृद्ध करतो. ” – जैमीन पटेल

गुजरातमधील भरुच येथे राहणारे जैमीन पटेल यांनी शिक्षण घेतले संगणक विषयात, नोकरी मिळाली फायनान्स च्या क्षेत्रात पण, आता तो सर्व काही सोडून झाला आहे शेतकरी.

जैमीनला वयाच्या २८ व्या वर्षी प्रथम त्याच्या वडिलोपार्जित शेतीबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी शेती करुन आपले जीवन जगण्याचा निर्णय घेतला.

खास गोष्ट म्हणजे त्याच्या आठ एकर शेतात पूर्वी रासायनिक शेती होती, त्यापैकी त्यांनी साडेचार एकर जैविक शेती केली असून आता तेथे सेंद्रिय शेती केली जाते. उरलेली साडेतीन एकर पण सेंद्रिय करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

जैमीन सांगतो की त्याच्या मित्राला आधुनिक तंत्रज्ञानाने शेतीचा एक सेटअप तयार करायचा होता. त्याला पॉलीहाऊस शेती करायची होती. जैमीन ने त्यांना प्रत्येक प्रकारे मदत केली, परंतु जेव्हा सेटअप तयार झाला तेव्हा काही कारणास्तव मित्राने माघार घेतली. पण जैमीनने तर सेटअप सेट केला होता, मागे हटण्याऐवजी मग त्याने आधुनिक शेतीच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला.

जैमीन म्हणतो, “मी पाटीदार, म्हणजेच शेतकऱ्याचा मुलगा आहे.” आजकाल तो आपल्या शेतात ऊस, तूर डाळ, कापूस, मूग, टरबूज, टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी कांदा, पालक, कोथिंबीर इत्यादी पिकवत आहे. त्याचा पुरवठा राज्यातील जिल्ह्यांबरोबरच बाहेरही आहे.

त्याचे शेतीतून मिळणारे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत आहे. शेतीला तो एक फायदेशीर व्यवसाय मानतो. शेतकऱ्यांना आता फक्त योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. तथापि, हेच सर्वात कठीण कार्य आहे. परंतु चांगला मार्गदर्शक सापडल्यास शेतीत नफच नफा होतो.

जैमीन पटेलचे पालक वैद्यकीय क्षेत्रात काम करायचे, त्यामुळे त्यांची बदली गुजरातच्या वेगवेगळ्या भागात झाली. यामुळे त्यांना फिरायला खूप संधी मिळाली आणि अशा प्रकारे त्यांनी गुजरातविषयी बरीच माहिती गोळा केली, ज्याचा त्यांना आता शेतीत फायदा होत आहे.

सुरुवातीला जैमीनने काकांकडे शेतीकामे शिकून मग वडिलोपार्जित जमिनीवर शेती करण्यास सुरवात केली.

जैमीनचे काका गावात राहून शेती करतात. जैमीनने आपल्या शेतीची कल्पना काकांशी शेअर केली. त्याला काकांचा पूर्ण पाठिंबा मिळाला, त्यानंतर त्याने काकाबरोबर शेती करण्यास सुरवात केली. काकांकडून तो शेतीच्या बारीकसारीक गोष्टी शिकला. काकांच्या सल्ल्यानुसार हे शेत सेंद्रिय शेतीसाठी तयार केले.

प्रथम माती परीक्षण करणे आवश्यक आहे, जे कोणत्याही कृषी विद्यापीठात किंवा खासगी प्रयोगशाळेत सहज केले जाते. हे मातीच्या आरोग्याबद्दल अचूक माहिती प्रदान करते. यामध्ये सेंद्रिय खताचा वापर केल्यामुळे चांगले उत्पादन शक्य झाले. शेणखत, हिरवे खत, गांडूळखत इत्यादी अनेक प्रकारचे सेंद्रिय खत आहेत. हे ९० ते १८० दिवसात तयार होते. त्याचा वापर केल्याने उत्तम उत्पादन शक्य होते.

जैमीन इतर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीविषयी जागरूक करण्याचे काम देखील करतो. सेंद्रिय खताने मातीचे जैविक गुणधर्म आणि उत्पादन क्षमता देखील वाढविली जाऊ शकते. सेंद्रिय खत व सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करून शेतकरी उत्तम पीक घेऊ शकतो.

जैमीन हा ‘भाईचारा नेटवर्क’ या शेतकरी जागरूकता संस्थेशी संबंधित आहे. या संस्थेत शेतकरी सेंद्रिय शेतीशी संबंधित त्यांच्या समस्या मांडतात. संघटनेशी संबंधित तज्ञ शेतकरी त्यांचे प्रश्न सोडवतात. विशिष्ट पिकांशी संबंधित माहिती तसेच योग्य वेळ, पेरणी, सिंचन, उत्पादन इत्यादी संबंधी सूचना केल्या जातात.

जैमीन पटेल यांनीही या व्यासपीठावरून शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले. जैमीन यांचा असा विश्वास आहे की संघटनेत शक्ती आहे. शेतकरी संघटित आणि कोणत्याही समस्येपासून मुक्त होण्यासाठी सक्षम आहे. जैमीन अन्य राज्यात जातो तसेच ऑनलाईन वेबिनार घेतो. पंजाब, हिमाचल, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र इत्यादी राज्यांतील शेतकऱ्यां कडून सेंद्रिय शेतीशी संबंधित तांत्रिक माहितीची देवाणघेवाण सुरूच असते.

जैमीन त्याच्या आतापर्यंतच्या यशाचे श्रेय योग्य दिशेने केलेल्या प्रयत्न आणि परिश्रमाला देतो. तो सांगतो की, ध्येय व कष्टाचे हे सूत्र इतर क्षेत्रांप्रमाणेच कृषी क्षेत्रातही पूर्णपणे लागू आहे. सर्व प्रथम, आपण आपले ध्येय निश्चित करा आणि त्या नंतर, त्या दिशेने आपले प्रयत्न केंद्रित करा. आपण यशस्वी होतोच. प्रयत्न सोडू नका. सतत प्रयत्न हीच यशाची गुरुकिल्ली आहे. “

Leave a Comment