ज्येवं हट्टाला पेटतो त्येवचं मराठा असतो ! पहा बाजीप्रभूंच्या पराक्रमाच्या “जंगजौहर” या मराठी चित्रपटाचा टिझर..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

.

छत्रपती शिवाजी महाराज की जय असं जरी नुसतं म्हटलं तरी अंगावर शहारे येतात. त्यांच्या पराक्रमाच्या इतिहासाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. राजे इतके बलाढ्य, ताकतवान, हुशार किंवा अश्या अनेक उपाध्या कमी पडतील असे होते.

त्यांचा प्रेरणादायी इतिहास आजही खुप लढायचं बळ देतो. जर राजे इतके शुर होते तर त्यांचे मावळेही शूरवीर होते. शेवटी आपण सगळे राजेंची मावळे. एक एक हिरा त्यांच्याकडे होता. त्यात बाजीप्रभू देशपांडे तर आपल्याला सर्वांना माहीतच आहेत. ज्यांनी राजेंना पुढं पाठवुन शत्रूला खिंडीत अडकवुन युद्ध केलं होतं. रोखुन धरलं होतं शत्रूंना तलवारीच्या धारीने.

१३ जुलै १९६० चा तो दिवस होता. मराठेशाहीत रक्तरंजित इतिहास याच घोड खिंडीत लिहिला गेला. रक्ताच्या थारोळ्यात शत्रू मरून पडला होता. त्याच्या छाताडावर पाय देऊन स्वराज्याच्या मावळ्यांनी इतिहास लिहिला होता.

JungJauhar | जंगजौहर | Official Teaser

१३ जुलै १६६०… ३६० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पावनखिंडीमध्ये वीरांचा रणआक्रोश गुंजला होता… स्वराज्य वाचवण्यासाठी…. आपला लाडका राजा सुरक्षित ठिकाणी पोचवण्यासाठी माणसं हाडामांसाची तटबंदी उभारू शकतात हे आमच्या पूर्वजांनी जगाला दाखवून दिलं होतं….
पावनखिंड.. हीच ती जागा जिथे ६०० धारकऱ्यांची महान दिंडी गेली.. हीच ती जागा जिथे ३०० वीरांचे पुण्यात्मे धारातीर्थी पडले…
हीच ती जागा जिथे “तोफे आधी मरे न बाजी सांगा मृत्यूला” असं म्हणत एका काळभैरवानं बाजीप्रभूंच्या रूपानं प्रलयंकर तांडव केलं होतं.
रायाजी बांदल, फुलाजीप्रभू आणि बांदल सेनेतल्या ३०० शिवगणांनी पराक्रमाचं विराट रूप दर्शन घडवलं होतं.
या बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा पावन दिवस. या दिवशी या वीरांच्या उपकारांनी उपकृत होऊन त्यांना कलारूपी श्रद्धांजली देण्याचे भाग्य मिळवीत आहोत आणि शिवछत्रपती, जिजाऊसाहेब, आदिशक्ती तुळजाभवानी आणि अवघ्या महाराष्ट्राच्या चरणी जंगजौहर या चित्रपटाचा टिझर अर्पण करीत आहोत.
जय भवानी..जय शिवराय..
हर हर महादेव..

“असंल तो सिद्दी तर आम्हीबी हाय जिद्दी
स्वराज्यासाठी वार झेलू निधड्या छातीवरती !!”
स्वराज्याच्या इतिहासातल्या दैदीप्यमान त्याग आणि बलिदान पर्वाची ही झलक, महाराष्ट्रचरणी अर्पित करीत आहोत ‘जंगजौहर’चा टीझर…
#जंगजौहर #JungJauhar #JungJauharTeaser
#AAFilms In Association with Almonds Creations
Written and Directed By : Digpal Lanjekar
Produced By : Ajay Arekar #AniruddhaArekar
Satyasheelraje Dabhade Karansinh Naik-Baandal Itbar Rao @Siddharth Sanjay Kank Indrajeet Jedhe
आजन्म ऋणी – Hemant Dhome #KshiteeJog

Posted by Digpal Lanjekar on Sunday, 12 July 2020

बाजीप्रभू देशपांडे यांनी सर्व ताकत पणाला लावुन खिंड लढवली होती. त्यांच्या सोबत बांधल सेना ही होती. त्यांचा इतिहास आपल्याला अनेक पुस्तकात पाहायला मिळतो. पण तो वाचुन अनुभव घ्यावा लागतो. आता तो आपल्याला पाहून अनुभवता येणार आहे.

See also  पेगासस स्पायवेअर नेमकं काय आहे, ते कसे कार्य करते, त्याच्या पासून बचाव कसा करावा? जाणून घ्या एक क्लिकवर

दिगपाल लांजेकर दिग्दर्शित ” जंगजौहर ” या मराठी चित्रपटात तो थरारक अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे. याआधी दिगपाल ने फर्जंद या यशस्वी चित्रपट साकारलेला आहे. शिवराय व त्यांच्या मावळ्यांचा स्वराज्य इतिहास खुप प्रेरणादायी आहे. तो मी लवकर एकानंतर एक असा रसिकांन समोर घेऊन येणार आहे.

असं दिग्दर्शकाचं म्हणणं आहे. त्या चित्रपटाचा टिझर त्या दिनाचं औचित्य साधुन प्रदर्शित केला आहे. तो जेव्हा सोशल मीडियावर आला तेव्हा पासुन आत्तापर्यंत खुप लोकांनी शेयर केला आहे. प्रचंड प्रमाणत प्रतिसाद मिळत आहे.

पावन झालेली घोडखिंडीत नेमकं काय झालं ? कशी बाजीप्रभूंनी आपल्या आयुष्याची बाजी पणाला लावुन शत्रूला सळो की पळो केलं हा रक्तरंजित इतिहास आहे. विशाळगडाच्या घोडखिंडीत शिवरायांच्या मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताने घोडखिंड पावन झाली.

See also  पाकिस्तानच्या या खेळाडूला झाली कोरोनाची लागण !

या टीझरमध्ये पन्हाळ्याचा वेढा ते विशाळगडावर झालेलं पावनखिंडीतलं ते भीषण युद्ध साकारलेलं दाखवलं आहे. हट्टाला पेटतो त्यालाच मरहट्टा म्हनत्यात असे दमदार संवादही कानावर पडतात. या टीझरमुळे चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागून राहिली आहे.

साडे तीनशे वर्षं उलटले आहेत. तो काळ आज दाखवणं अवघड आहे पण छत्रपती शिवाजी महाराज सोबत असल्यावर अशक्य ते शक्य आहे असं दिग्दर्शक यांचं मत आहे. फर्जंद, फतेशीकस्त या शिवचरित्रवर आधारित चित्रपट मालिकेमध्ये आता हा चित्रपट ही असणार आहे. अजय आणि अनिरुद्ध आरेकर यांच्या ‘आलमंड्स क्रिएशन्स’ने या भव्य चित्रपटाची निर्मिती केली आहे

या तिन्हींही चित्रपट मधील भूमिका करणारे अनेक कलावंत सारखे आहेत. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, सारखी तगडी स्टार कास्ट आहे. आधीच्या भव्य दिव्य चित्रपटाच्या यशानंतर आता या कडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे. प्रेक्षकांनमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांनच्या भेटीस येणार आहे.

See also  आत्ताच या शेअर्समध्ये गुंतवणूक करा आणि व्हा लखपती ! मिळवा 15 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न ! 

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment