श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने चालत्या गाडीमध्ये बदलले कपडे, कारण…
1970 – 80 च्या काळातील मोहक सौंदर्याची क्वीन अभिनेत्री श्रीदेवी हिची मोठी मुलगी जान्हवी कपूर ही हुबेहुब आपल्या आईसारखीच दिसते. सोशल मीडियावर आपल्या बोल्ड फोटोज् मुळे नेहमीच प्रसिद्धीत झळकत असते. त्याचप्रमाणे स्टार किङ असल्याने जान्हवी चर्चेत देखील असते. तसेच आता पुन्हा एकदा ती अशीच चर्चेत आली आहे. तुम्हांला माहित आहे का, जान्हवी ही सध्या इतकी व्यस्त असते की, तिला कपडे चेंज करण्यासाठी वेळ सुद्धा मिळत नाही. त्यामुळे तिला आपला ङ्रेस चेंज करण्यासाठी योग्य जागा देखील मिळत नाही.
हल्ली अभिनेत्री जान्हवी कपूर ही आपली नवी फिल्म “रुही” चे प्रमोशन खूप जबरदस्त स्वरूपात करत आहे. 11 मार्च ला ही फिल्म सिनेमागृहात रिलीज झाली. तर या चित्रपटात जान्हवी सोबत अभिनेता राजकुमार राव आणि वरुण धवन हे सोबत दिसतील. मागील काही दिवसांत हे तीनही मुख्य कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त असल्याचे दिसते. जान्हवी तर बिचारी आपल्या कामांचा पसारा आवरताना स्वतःच्या कारमध्येच कपङे बदलताना दिसली आहे.
जान्हवी कपूरने स्वतः हे सांगितले आहे की, तिला कारमध्येच कपङे बदलावे लागले आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्ट च्या माध्यमातून आपल्या फॅन्सना ही माहिती दिली आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटोज् शेयर केले होते. यामध्ये ती दोन वेगवेगळ्या कपड्यांमध्ये पाहायला दिसते. तर एका फोटोमध्ये तर ती कारच्या आतमध्ये कपडे चेंज करताना दिसत आहे. तसेच जान्हवी कपूरने शेयर केलेल्या या तिसऱ्या फोटोमध्ये दिसते की, स्कर्ट च्या ऐवजी ती जिन्स घालत आहे. तर पुढील फोटोमध्ये तिने आपला टॉप सुद्धा चेंज केलेला दिसतो.
परंतु काय तुम्हांला ठाऊक आहे का, जान्हवी कपूर ला हे सर्व का आणि कशासाठी करावे लागत आहे? तर खरं हे आहे की, ती आपल्या “रुही” या चित्रपटाच्या प्रमोशन नंतर फ्लाईट पकडण्यासाठी एअरपोर्टवर जात होती आणि तिच्याजवळ कपङे चेंज करण्यासाठी अजिबात वेळ नव्हता. त्यामुळे जान्हवी ने आपले कपडे कारमध्येच चेंज करणे, योग्य समजले.
असिस्टंटला सहपरिवार दाखवली फिल्म : मागील काही दिवसांपासून जान्हवी कपूर ही खूपच प्रसिद्धीत आहे. तिने आपला असिस्टंट अजीमला सहपरिवारासह आपली फिल्म “रुही” दाखवली. यावेळी अजीम सोबत त्याचा पूर्ण परिवार तेथे उपस्थित होता. त्या दरम्यान जान्हवी ने अजीम च्या लहान बाळाला उचलून घेतले होते. अजीम हा आपली पत्नी, दोन मुलं आणि एक मूलगी यांना घेऊन तेथे आला होता. जान्हवीच्या फॅन्सनी तिच्या या कामासाठी तिचे खूप कौतुक केले आहे.
जान्हवी कपूर चे हे फोटोज् वायरल होताच एका युजरने कमेंट लिहिली होती की, “ती किती मोठ्या मनाची आहे. मला वाईट वाटते की, मी तिला एवढे वाईट समजले, जान्हवी मी तुझी फॅन गर्ल बनली आहे.” तर दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, “ती महान सुपरस्टार आपली आई श्रीदेवी यांसारखी आहे.” हेच नव्हे तर बहुतेक लोकांनी म्हटले आहे की, “श्रीदेवीने खूप छान संस्कार दिले आहेत, तिच्या मेहनतीला फळ मिळाले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.