भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह अडकला लग्न बंधनात, जाणून घ्या बुमराहची पत्नी संजना आहे तरी कोण?
आपल्या भारतीय क्रिकेट टीम मध्ये हल्लीच एक गुङ न्यूज तुम्ही देखील ऐकलीच असेल. आपल्या भारताच्या टीममधील मुख्य जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि क्रीडा अँकर संजना गणेशन यांचा विवाह झाला. हो जसप्रीत बुमराह याने स्वतः आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या विवाहाविषयी आनंदी खबर सांगितली आहे. संजना व जसप्रीत यांनी एकमेकांसोबत 15 मार्च ला सोमवारी गोव्यामध्ये सात फेरे घेतले.
मित्रांनो मागील काही दिवसांपासूनच गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या विवाहाची चर्चा संपूर्ण देशभरात सुरू होती. इतकंच नव्हे तर आपल्या त्याने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातून स्वतःला निवळण्यात यावे, अशी विनंती देखील केली होती.
त्याचप्रमाणे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सुद्धा जसप्रीत बुमराह याने कसोटी सामन्यातून स्वतः काढते पाऊल घेण्यामागील कारण म्हणजे त्याचे लग्न असे आहे, हे सांगितले होते. त्यामुळे तेव्हापासूनच जसप्रीत व संजना यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते.
जसप्रीत ची ही सिक्रेट बातमी सर्वत्र पसरताच तो कुणाशी विवाहबद्ध होणार आहे, अशा चर्चा देखील सोशल मीडियावर खुलेआम पणे होत होत्या. तेव्हा सर्वप्रथम एका दक्षिण मधील साऊथ अभिनेत्रीचे नाव समोर आले होते. मात्र त्यानंतर पुणे येथील सांस्कृतिक शहरात जन्मलेली संजना गणेशन सोबत जसप्रीत विवाह करणार असल्याचे निश्चित झाले.
कोण आहे बरं संजना गणेशन ? संजना गणेशन ही एक सुशिक्षित व सुसंस्कृत घरातील सुशील व देखणी युवती आहे. ती एक मॉडेल आणि स्पोर्ट्स अँकर आहे. आतापर्यंत संजना गणेशन हिने खेळ विश्वातील क्रिकेट, बॅडमिंटन आणि फुटबॉल सारखे कित्येक इव्हेंटस् चे होस्टिंग केले आहे. 2019 मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप क्रिकेट मॅचची भारताकडून होस्टिंग संजना ने सांभाळली होती.
महाराष्ट्रातील पुणे शहरात संजना गणेशनचा जन्म 6 मे 1991 रोजी झाला होता. आयपीएल मधील कोलकाता नाइट रायडर्स शो नाईट क्लब ची देखील ती होस्ट होती. त्याशिवाय संजना गणेशन हिने आयपीएल लिलावाचे होस्ट म्हणून सुद्धा काम सांभाळले आहे. तिने पुणे येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधून ङिग्री घेतली आहे. त्यानंतर तिने मॉडेलिंगसाठी प्रवेश घेतला. 2014 च्या मिस इंडिया कॉन्टेस्ट मध्ये ती फायनल राऊंड पर्यंत पोहोचली होती.
जसप्रीत खेळणार आता थेट आयपीएल : आपल्या विवाहासाठी सुट्टी घेतलेल्या जसप्रीत बुमराह याचा टी- 20 आणि वनडे मालिकांसाठी सुद्धा विचार केला जाणार नाही. त्यामुळे आपला हा जलद गतीचा गोलंदाज थेट 9 एप्रिल पासून खेळण्यात येणाऱ्या आयपीएल मध्ये दिसणार आहे. तर मुंबई इंडियन्स कडून खेळण्यात येणाऱ्या जसप्रीत ला आता रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना आपल्याला पाहता येईल.
स्टार मराठी परिवारातर्फे आपल्या भारतीय क्रिकेट टीमचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि क्रीडा अँकर संजना गणेशन यांना त्यांच्या सुखी वैवाहिक नवजीवनासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा व खूप खूप अभिनंदन.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.