‘तारक मेहता…’ मधील जेठालाल आणि बबिता खऱ्या जीवनात आहेत खूपच श्रीमंत, बबिताजीची संपत्ती ऐकून थक्क व्हाल!
सोनी सब टेलिव्हिजन वरील फुल टू धम्माल आणि मनोरंजनाचा निखळ खजिना असलेला शो “तारक मेहता का उल्टा चश्मा” हा जगभरातील प्रसिद्ध शो आहे. तशी याची खासियत पण आहे की, सर्व कलाकारांचे उत्कृष्ट अभिनय कौशल्य, समाजातील चालू घटनांवर आधारित नवनवीन एपिसोड या सर्व गोष्टींमुळे लहानांपासून ते अगदी थोरामोठयांपर्यंत सर्वजण हा शो उत्सुकतेने पाहतात.
एवढ्या फेमस शो मध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे लाईफस्टाइल देखील खूप सुंदर व आलिशान असते, हे तर आपण नेहमीच ऐकतो. परंतु आपल्याला देखील कित्येकदा हा प्रश्न सतावतो की, “तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो च्या कलाकारांची सॅलरी किती असेल बरं? तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला हेच आमच्या या आर्टिकलमधून सांगणार आहोत.
या फेमस शो मधील सर्व कलाकार हे आपल्या ओळखीचे तर आहेत. पण त्यांचे ङायलॉग आणि त्यांची अभिनयाची कला ही देखील आपणां सर्वांना खूप चांगल्या प्रकारे माहित आहे. शो मधील पॉप्युलर कॅरेक्टर “जेठालाल गङा” हे तर तुमचे- आमचे सर्वांचे आवडते आहेत.
कारण त्यांच्या अभिनयाची छाप सर्वांच्या मनात उमटलेली आहे. तसेच जेठालाल हे नेहमीच शो मध्ये “बबिताजींना” आपल्याकडे आकर्षित करण्याच्या प्रयत्नात असतात. त्यातून निर्माण होणारे तुफानी हास्यमय विनोदांचा तर लोटपोट होऊन आपण सारे आनंद घेतो.
“तारक मेहता का उल्टा चश्मा” या शो मध्ये “जेठालाल” ची भूमिका दिलीप जोशी साकारत आहेत. तुम्हांला माहित आहे का? दिलीप जोशी यांची नेटवर्थ 37 करोड रुपए एवढी आहे. तसेच “दयाबेन” ची भूमिका करणारी दिशा वकानी हिची प्रॉपर्टी ही तितकीच आहे.
शो मध्ये “बबिता” ची भूमिका करणारी मुनमुन दत्ता ही तब्बल 7 करोङोंची मालकीण आहे. त्याचबरोबर “तारक मेहता” बनलेले शैलेश लोढा यांची देखील प्रॉपर्टी एवढी आहे. त्याचप्रमाणे या शो ची पूर्ण स्टार कास्ट नेटवर्थ 88 करोड आहे, असे म्हणतात. सोनी सब टेलिव्हिजन वरील “तारक मेहता का उल्टा चश्मा” हा शो 2008 मध्ये सुरू झाला होता. तरीदेखील इतर सर्व शोज् पेक्षा याच शोचा टीआरपी सर्वांत जास्त आहे.
“नेपोटिज्म” वर जेठालाल ने कोणते उत्तर दिले बरं? काही दिवसांपूर्वीच दिलीप जोशी यांना “नेपोटिज्म” संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हा त्यांनी सांगितले की, ही आपली संस्कृती आहे.
समजा, एखाद्या व्यापाऱ्याने आपला उद्योगधंदा चांगल्याप्रकारे मजबूत बनवला आहे आणि त्याचा मुलगा त्या उद्योगधंद्यात येऊ इच्छित असेल, तर तो आवर्जून त्यात सहभागी होऊ शकतो. त्याचप्रमाणे ते हे देखील म्हणाले की, ज्यांचे फिल्मी बॅकग्राऊंड सोबत चांगली ओळख असेल तर हुशार लोकांना खरंच संधी दिली गेली पाहिजे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.