जेठालालच्या “गडा इलेक्ट्रॉनिक्स” या दुकानाचे खरे मालक आहेत “ही” व्यक्ती, नाव ऐकून थक्क व्हाल!
‘तारक मेहता’ (Tarak Mehta ka ulta chasmah) या लोकप्रिय टेलिव्हिजन शोमध्ये दिसणारे ‘गडा इलेक्ट्रॉनिक्स’ (Gada Electronics) चे दुकान हे आता एखाद्या पर्यटनस्थळासारखेच प्रसिद्ध बनले आहे. चला तर मित्रांनो अधिक जाणून घेऊ या शोरूम विषयी.
‘तारक मेहता का उलटा चश्मा’ हा हिंदी टेलिव्हिजन वरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. जेठालाल चंपकलाल गडा. (Jethalal) राहणार गोकुळधाम सोसायटी, पावडर गली, गोरेगाव येथील ए विंग मधील एक सर्वसामान्य रहिवासी. जिलेबी-फाफडा आणि बबिताजी (Babitaji) हे त्याचे विक पॉईंट. बबिताजी नुसते म्हणाल्या तरी गोकुळधामच्या विसाव्या मजल्यावरून खाली उडी टाकायला पण कमी करणार नाही, असा हा जेठालाल अतिशय अप्रतिमपणे साकारलाय सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते श्री. दिलीप जोशींनी. (Actor Dilip Joshi)
जुलै २००८ मध्ये सुरू झालेला ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या तुफान लोकप्रिय शो चे सध्या हे १३ वे यशस्वी वर्ष सुरू आहे. आणि या तेरा वर्षांत हा कार्यक्रम टीआरपी चार्टवर फारच क्वचितपणे खाली आला असेल. भारतातील अर्ध्या लोकांना आता ही मालिका इतकी सवयीची झाली आहे की ते जेवतांना एकवेळ चटणी, लोणचे वगैरे घेणार नाहीत परंतु जेवतांना ते तारक मेहता ही मालिका लावणारच.
जनतेच्या मते या शो च्या गुणवत्तेत गेल्या काही वर्षांत काही प्रमाणात घट झाली आहे. परंतु त्याच्या जुन्या भागांची पुनरावृत्ती/पुनःप्रसारण रेटिंगसुद्धा काहीवेळा नवीन शोपेक्षा अधिक असते.
गडा इलेक्ट्रॉनिक्स (Gada Electronics) : या शोमध्ये जेठालाल यांचे दुकान आहे. गडा इलेक्ट्रॉनिक्स. प्रत्यक्षात हे कोणाचे दुकान आहे हे आपल्याला माहित आहे का? हरकत नाही, आम्ही आपणांस सांगतो. आपण टीव्हीवर पाहिलेल्या गडा इलेक्ट्रॉनिक्सचे वास्तविक मालक श्री. शेखर गाडियार हे आहेत.
खरंच हे दुकान मुंबईच्या खार भागात आहे. शेखर शूटिंगसाठी आपले दुकान भाड्याने देतात. त्यांच्या दुकानाचे पूर्वी नाव शेखर इलेक्ट्रॉनिक्स असे होते परंतु ‘तारक मेहता ..’ च्या तुफान लोकप्रियतेनंतर हे दुकान इतके फेमस झाले की शेखरने खरोखरच आपल्या दुकानाला ‘गडा इलेक्ट्रॉनिक्स’ असेच नाव दिले आहे.
दुकान मालक शेखर यांचे म्हणणे आहे की दुकान भाड्याने देण्यापूर्वी त्याला भीती होती की शूटिंगच्या वेळी त्याच्या इलेक्ट्रॉनिक्स मालातील एखादी काही नाजूक वस्तू वैगेरे तुटेल फुटेल, पण गेल्या १३ वर्षात त्याच्या कोणत्याही मौल्यवान इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर कधीच किंचितसाही ओरखडा सुद्धा उमटलेला नाही.
या शोच्या लोकप्रियतेमुळे आमचे हे दुकान आपल्या ग्राहकांपेक्षा रसिक प्रेक्षक व पर्यटकांनाच अधिक आकर्षित करते असे शेखर यांचे म्हणणे आहे. ते कधी काही विकत घेतात किंवा घेत नाहीतही, परंतु ते दुकानात फोटोज मात्र आवर्जून काढतातच. तसेच त्यांचे मित्र आणि नातेवाईकांना व्हिडिओ कॉल करुन ते येथे असल्याचा पुरावा देखील दर्शवितात.
मित्रांनो!, ज्याप्रमाणे ‘चक दे इंडिया’ नंतर हॉकीची लोकप्रियता वाढली किंवा हॉकी संबंधित वस्तूंची विक्री वाढली किंवा ‘3 इडियट्स’नंतर लडाखच्या पर्यटनामध्ये वाढ झाली होती त्याचप्रमाणे ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ मुळे आमच्या या दुकानाचीही लोकप्रियता नक्कीच वाढली आहे.
चित्रपट आणि टीव्हीवरील कार्यक्रमांची वास्तविक जीवनात प्रभाव पडण्याची अशी अनेक उदाहरणे आहेत. चला, या निमित्ताने का होईना परंतु, दुकानाची व आमची भरभराट होतेय ना… बस्स!, सब का भला हो… और क्या चाहीये???
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.