प्रेक्षकांना मिळणार मराठीतील पहिल्यावहिल्या ब्लॅक कॉमेडीचा “झटका – आत्ता सुरवात गोंधळाची “

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेमांमध्ये या वर्षाच्या सुरुवातीपासून वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला जातोय. या सर्व चित्रपटांना छेद देत दिग्दर्शक अजिंक्य उपासानी आपल्याला ‘झटका’ द्यायला सज्ज झालेत. नुकताच ‘झटका’ या चित्रपटाचा पोस्टर लाँच केल्यानंतर आता चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे . उत्तेजन स्टुडियोजची निर्मिती असलेला “झटका – आत्ता सुरवात गोंधळाची ” हा मराठी सिनेमाजगतातील पहिला ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे. ‘ झटका ‘ या चित्रपटाचं दिग्दर्शन अजिंक्य उपासानी यांनी केलंय तर डॉ पार्थ सारथी चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘झटका’ या चित्रपटात ‘तुला पाहते रे’ या झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिकेत झळकलेल्या पूर्णिमा डेला नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पूर्णिमासोबत अभिनेता गौरव उपासानी रुपेरी पडद्यावर पदार्पण करतोय.

See also  महाविकास आघाडी सरकारमध्ये विष कालवण्याचं काम करू नका, शिवसेनेचा राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याला सल्ला

गौरवने याअगोदर अनेक हिंदी शॉर्टफिल्म्समध्ये काम केले आहे. ‘चिअर्स टू लाइफ’ या नावाची मराठीतील शॉर्टफिल्म्समध्येही गौरव झळकला आहे. गौरवने ‘झटका’ या चित्रपटासाठी लेखनही केलं आहे. पोस्टरवरुनच गौरव आणि पूर्णिमा बंद कपाटालालागून घाबरुन उभे राहिल्याचे दिसताहेत. कपाटातील नेमकी कोणती गोष्ट पूर्णिमा आणि गौरव लपवताहेत ? पोस्टरमध्ये कपाटातून बाहेर येणारा ‘तो’ चेहरा कोण ? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुम्हांला आज अगदी थोडक्यात ‘झटका’ देत टिझरमध्ये पाहायला मिळतील. त्या कपाटामागील रहस्य पाहण्यासाठी तुम्हांला चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागेल.४ मार्च रोजी ‘झटका’ जवळच्या चित्रपटगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Datta Pawar

Datta Pawar

Leave a Comment