कालपासून तिची खूपच आठवण येते, जितेंद्र जोशीने केल्या आठवणी शेयर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

यंदाच्या वर्षी दिवाळी सणाचा आनंद सर्वत्र ओसंडून वाहताना दिसत आहे. सर्वत्र घराघरांत स्वादिष्ट फराळाची मेजवानी, रंगीबेरंगी रांगोळी आणि फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळत आहे. कलाकार मंडळी देखील दिपावली सण मोठ्या आनंदात साजरा करत आहेत. सणासुदीच्या निमित्ताने ते आपापली आठवण सोशल मीडियावर शेयर करताना दिसत आहेत. मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याने देखील दिपावली सणाच्या निमित्ताने आपली एक जुनी आठवण शेयर केली आहे. रमा, मी आणि दिवाळी अशा नावाची त्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच वायरल होत आहे.

कालपासून मला रमाची खूप आठवण येते, असे म्हणत त्याने ही पोस्ट लिहिली आहे. परंतु आता ही रमा कोण बरं….असा प्रश्न तुम्हांला देखील पडलाच असेल. तर मित्रांनो “रमा” म्हणजे जितेंद्र जोशी ची आजी. यावर्षी 29 एप्रिलला त्याच्या आजीचे निधन झाले. त्यामुळे दिवाळी आल्यावर जितेंद्र च्या मनात आपल्या आजीच्या आठवणींचे काहूर माजले. याच आठवणी त्याच्या या पोस्टमध्ये आहेत.

जितेंद्र लिहितो,”रमा मी आणि दिवाळी”
आज दिवाळीचा दुसरा दिवस. खरं सांगायचं तर कालपासून मला माझ्या आजीची म्हणजेच रमाची खूप आठवण येते. दिवाळी येण्यापूर्वी रमा आणि तिच्या मुलांच्या मेहनतीने आमचं छोटसं घर दरवर्षी 4-5 वर्षांत घासून- पुसून, रंग देऊन अगदी लख्ख लख्ख व्हायचं आणि फराळाची तयारी सुरू व्हायची. त्या काळात बाहेरून दिवाळीचा फराळ विकत आणला जात नसे. चकल्या, लाङू, करंजी, शेव व अनारसे जे काही असतं, ते सगळं काही ती आणि माझी आई, मोठी मामी बनवायची.

See also  "येऊ कशी तशी मी नांदायला" मधील मोहित खऱ्या आयुष्यात आहे विवाहित, त्याची बायको आहे खूपच सुंदर...

त्यानंतर मग चिवडा बनवायला त्यांनी बाजूला काढलेले शेंगदाणे आणि खोबरं खाल्ले की मग तिचा मार मिळायचा. घरातील संपूर्ण फराळ तयार झाला की मग तो सर्वात आधी शेजारीपाजारी नेऊन द्यायचा. दिवाळीच्या दिवसांत दररोज घराबाहेर रांगोळी काढली जायची, म्हणून त्यासाठी शेण आणायची जबाबदारी माझी असायची. अख्ख्या वर्षात एक पँट मिळायची, ती घालून वाड्यात सर्वांना नमस्कार करायला जावे लागायचे.

माझी रमा आलेल्या- गेलेल्या सगळ्या पाहुण्यांची चांगलेच स्वागत करायची आणि मला सगळ्या पाहुण्यांकङे घेऊन जायची. पहिल्याच घरात एवढा फराळ खायचो की शेवटच्या घरात एखादा लाङू खायची सुद्धा भूक राहत नसे. आमच्या घराने लहानसहान अनेक उद्योग केले. होलसेल फटाके आणून ते सुटे विकणे, आकाशकंदील तयार करून ते विकणे या सगळ्या गोष्टींत रमा सुद्धा आम्हांला मदत करायची.

See also  'टाईमपास’ चित्रपटातील प्राजु आता दिसते खूपच ग्लॅमरस, तिचे फोटो सोशल मीडियावर होतायत प्रचंड व्हायरल...

स्वस्थ व शांत बसणं हे काही तिच्या स्वभावातच नव्हते. रसिक, हौशी आणि सदैव उत्साही अशी ती होती. 29 एप्रिल 2021 रोजी तिचे निधन झाले. तिने हाताने बनवलेल्या गोङ लापशीप्रमाणेच “जितू Happy Diwali” असे म्हणणारा तिचा फोन आता येणार नाही. माझी रेवा जन्माला आली, त्यानंतरच्या एका दिवाळीला ती माझ्याकडे होती. त्या वर्षी मी रेवा च्या पावलांना कुंकू लावून त्याचे ठसे घेऊन आपले लक्ष्मीपूजन केल्याचे तिला भारी कौतुक होई.”

दिवाळीच्या शुभेच्छांचे अनेक फोन, मेसेजेस आले. परंतु माझ्या आयुष्यातील सौम्य पाझरणारा दिवा मात्र विझला. त्यामुळे खूप सुनं सुनं वाटतयं. तिला दम्याचा त्रास असल्याने फटाक्यांचा वास घरात येऊ नये, म्हणून दरवर्षी खिडक्या बंद करून बसणारे आम्ही आज सर्व घरातील खिडक्या उघड्या ठेवून बाहेरील दिवे पाहत आहोत. ती माझ्यासाठी एक मारवाडी म्हण नेहमी म्हणायची की, “गेली सासरे जावे नई और जावे तो पाच्छी आवे नई”. म्हणजे वेडी मूलगी सासरी जात नाही आणि गेली तर माघारी येत नाही. हे सगळं आज मला समजतंय.

See also  या मराठी लोकप्रिय अभिनेत्रीचे बो'ल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment