अभिनेता जितेंद्र जोशी याने बो’ल्ड सीन विषयी व्यक्त केले स्वतःचे मत, म्हणाला, “माझे बो’ल्ड सीन आहेत पण…”
मराठी सिनेसृष्टीतील आपला लाडका जितूभाई म्हणजेच अभिनेता जितेंद्र जोशी याने अनेक नवनवीन भूमिका साकारून आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य केले. हल्लीच त्याची कार्टेल ही हिंदी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीस आली. यामध्ये त्याने मधुकर म्हात्रे उर्फ मधुभाईची भूमिका अतिशय उत्कृष्टपणे साकारली आहे.
कार्टेल या वेबसिरीज बद्धल अभिनेता जितेंद्र जोशी याने सांगितले की, या वेबसिरीज मध्ये मुंबईतील वेगवेगळ्या गँग्स दाखवल्या आहेत. त्यातील एक गँग आहे, आंग्रे गँग. या आंग्रे गँग मध्ये राणी माई असते. तिला अभय नावाचा एक मुलगा असतो. त्याचप्रमाणे तिच्या बहिणीच्या नि’धनानंतर तिच्या दोन मुलांचा म्हणजे मेजर आणि मधुकर यांचा सांभाळ सुद्धा राणी माईनेच केला आहे. राणी माई काळा बाजार सांभाळते.
या तीन भावंडांमध्ये मधुकर हा अस्सल मराठमोळा असतो. स्वतःच्या कामाला तो प्रथम महत्त्व देणारा असतो. एकीकडे तो खूप अक्राळ विक्राळ रूप धारण करणारा असतो. तर दुसरीकडे तो आई व पत्नी समोर अतिशय शांत व सन्मानाने वागतो. असं काहीसं हे वेगळंच पात्र आहे.
मुलाखती दरम्यान अभिनेता जितेंद्र जोशी याला वेबसिरीज आणि वेबफिल्म मधील बो’ल्ड सीन विषयी विचारले असता, तो म्हणाला की, “एक कलाकार म्हणून सांगायचे झाले, तर कलाकार म्हणून एखादा सीन देताना हा सीन का बरं आहे? असे विचारू शकतो. मला हे आवडले नाही व मी करणार नाही, असे सांगण्याची परवानगी कलाकारांना असते. जे कलाकार बो’ल्ड सीन करतात. ते आपल्या आवडीने करतात. कारण बो’ल्ड सीन करण्यासाठी कुणीच जबरदस्ती करत नाही. मला कुणी जबरदस्ती केली, तर मी ते करत सुद्धा नाही. मी सांगतो की मला ते आवडले नाही आणि मी करणार सुद्धा नाही. ”
जितेंद्र पुढे म्हणाला की,”मला बॉलीवुड मधील दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. परंतु मला त्या भूमिका आवडल्या नाहीत, म्हणून मी त्या करण्यास नकार दिला. या वेबसिरीज मध्ये माझे बो’ल्ड सीन आहेत. परंतु ते कोणत्या स्टेप पर्यंत करायचे, हा सर्वस्वी निर्णय माझा आहे. करारानुसार आपण काम करतो. ते कुणाला पाहायचे किंवा पाहायचे नाही, हा सर्वस्वी निर्णय तुमचा असतो.”
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.