“जीव झाला येडा पिसा” मधील सोनी पडली या अभिनेत्याच्या प्रेमात, सोशल मीडियावर कबुली…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी मनोरंजन इंडस्ट्रीत सुद्धा असे अनेक अभिनेते अभिनेत्री आहेत की ज्या एकमेकांना डेट करतात. सुरुवातीला मैत्री होते. मग ही मैत्री घट्ट प्रेमात बदलते. प्रेम कबुली देतं आणि मग काय आयुष्यात सात फेरे का काय ते घेतले जातात.

आणि चाहत्यांना सुद्धा हे जाणून घ्यायला उत्सुकता असते की आता कोण कुणाला डेट करतय ? किंवा कोण कुणाच्या प्रेमात आहे. आज आपण मराठी टेलिव्हिजन क्षेत्रात असणाऱ्या दोन तरुण तरुणी अभिनेता अभिनेत्री यांच्या जोडी बद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी एकमेकांच्या प्रेमाची आता सोशल मीडियावर जाहीर कबुली दिली आहे.

अभिनेत्री शर्वरी जोग हिला कोण नसेल ओळखत ? अहो जीव झाला येडा पिसा नाही का ? हां तर त्यामधील शिवाची बहीण सोनीची भूमिका उत्तम प्रकारे साकारलेली अभिनेत्री. आता ओळखलं असेल. तर तिने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. शर्वरी ही मूळची कोल्हापूर. तिला लहानपणी पासून नाटकाची आवड होती. बालनाट्य पासूनच तिने या मनोरंजन इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं. आज तिचा चांगला चाहता वर्ग तयार झाला आहे. घरोघरी तिला सोनी म्हणून ओळखतात.

See also  प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता रितिक रोशनवर फिदा झालीये ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

तर या शर्वरी जोग या अभिनेत्री ने तिच्या समवयस्क अभिनेत्याला कबुली दिली आहे, प्रेमाची. मालिकेत काम करण्यापूर्वी शर्वरी ही व्यावसायिक नाटक आणि प्रायोगिक नाटक करत असायची. तिथेही तिने अनेक नाटक, एकांकिका यामध्ये खूप उत्तम अश्या भूमिका साकारलेल्या आहेत. ज्या नेहमी चर्चेला येत होत्या.

शर्वरी जोग ही गौरव मालवणकर या अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे. ज्या अभिनेत्याला आपण अनेक इतर चांगल्या रोल मध्ये पाहतच आलेलो आहोत. त्याने एकांकिका, नाटक मध्ये खूप काम केलं आहे. अनेक स्पर्धेत त्याला पारितोषिके मिळालेले आहेत.

त्याचा सुद्धा सोशल मीडियावर एक चांगलाच चाहता वर्ग आहे. तो एक उत्तम अभिनेता आहे. दोघांच्या ही सोशल मीडियावर एकमेकांचे सोबतचे फोटो नेहमी दिसायचे; पण आता तर जाहीर पणे एकमेकांनी आपल्या प्रेमाची कबुली दिलेली आहे.

See also  रणवीर सिंहला कं'डोमच्या जाहिरातीत पाहून त्याचे वडील खूपच भ'डकले होते, अशी होती त्यांची रिएक्शन...

गौरव मालवणकर या अभिनेत्याने युथ फेस्टिव्हल खूप गाजवलेलं आहे. त्याच्या घरून मात्र या क्षेत्रात येण्यास खूप विरो’ध होता. जो आता कुठंतरी कमी झाला असेल. त्याने इंजिनिअरिंग चं शिक्षण घेतलेले आहे. शर्वरी ने बीएस्सी ची पदवी घेतली आहे. तसेच कला निकेतन इथून शिक्षण सुद्धा. तर अश्या प्रकारे आता ही जोडी लवकरच एकमेकांच्या आयुष्य भराच्या साथीला सोबत दिसू शकते.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment