“या” बॉलीवूड स्टारला बॉसने दिला “असा” सल्ला की, नोकरी सोडून आज बनलाय अब्जाधीश फिल्म स्टार…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

होय मित्रांनो!, एक अभिनेता जो भारतातील सर्वात महागडा मॉडेल होता. खुद्द करण जोहर ‘कभी खुशी कभी गम’ द्वारे त्याला लॉन्च करणार होता. पण त्याने तो चित्रपट करण्यास चक्क नकार दिला. ‘रॉकस्टार’ चित्रपट, ज्यामुळे रणबीर कपूर स्टार झाला, त्या चित्रपटास यानेच यापूर्वी साइन केले होते. कधीकाळी एमबीए करून चाकरमानी नोकरी करणारा हा सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुलगा ते सुपरमॉडेल ते बॉलीवूड स्टार ते खाजगी प्रोडक्शन हाऊसचा मालक म्हणजेच जॉन अब्राहम … त्याच्या रंजक प्रवासाची सुरुवात झाली ती त्याला त्याच्या बॉस ने सहज बोलताना दिलेल्या बहुमूल्य सल्ल्यामुळे… जाणून घेऊयात.

6 121717124433 0.jpg?olOBg0

Advertisement

जॉन अब्राहमचा जन्म १७ डिसेंबर १९७२ रोजी मुंबई येथे झाला. त्याच्या वडिलांचे नाव अब्राहम जॉन आहे. मल्याळमहून आलेला हा सिनियर अब्राहम व्यवसायाने आर्किटेक्ट होता. जॉन आणि त्याच्या वडिलांचे नाव जवळजवळ सारखेच आहे. त्याचे कारण असे की, मल्याळममध्ये वडिलांचे नाव हेच आडनाव म्हणून लावले जाते. जेव्हा जॉन जन्मला, तेव्हा त्याचे नाव फरहान होते.

पण बाप्तिस्म्याच्या वेळी त्याचे नाव जॉन असे ठेवण्यात आले. जे त्याच्या आजोबांचे नाव होते. फरहानचा, जॉन अब्राहम अशा प्रकारे झाला. जॉनची आई फिरोजा इराणी ही गृहिणी आहे. जॉनने प्रारंभिक शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून केले. त्यानी मुंबईतील जय हिंद कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केलीय. जॉनला पुढील अभ्यासही करायचा होता, म्हणून त्याने नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून एमबीए केले.

See also  या बड्या नेत्यांनी केले आहे आपल्या पेक्षा कमी वयाच्या मुलीशी लग्न, या नेत्याने तर केले 20 वर्षीय मुलीशी लग्न!
Advertisement

ofpjl7bbnoa41

महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर त्यांनी मीडिया प्लॅनर म्हणून कंपन्यांमध्ये काम करण्यास सुरवात केली. या नोकरी दरम्यान, त्याच्या बॉसने त्याला एक असा सल्ला दिला, ज्याने त्याचे आयुष्य कायमचेच बदलले. जॉनची उंचीपूरी देहयष्टी व आकर्षक लुक्स पाहून बॉसने त्याला मॉडेलिंगमध्ये उतरण्यास सांगितले. या संभाषणामुळे प्रोत्साहित होऊन जॉनने दरम्यानच्या काळात एका प्रथितयश मॉडेलिंग स्पर्धेत नावही नोंदविले.

Advertisement

कारण जॉनला ही कल्पना आवडली होती. त्याने तातडीने स्पर्धेचा फॉर्म भरला आणि त्यामध्ये भाग घेतला. हा कार्यक्रम म्हणजे सुप्रसिद्ध ग्लेड्रॅग्स मॅनहंट स्पर्धा होता. जो भारतीय मॉडेलिंगच्या विश्वातील सर्वाधिक चर्चेचा विषय असायचा. आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की, स्पर्धा जिंकून जॉन ग्लेड्रॅग सुपर मॉडेल ऑफ द इयर ठरला. यानंतर, फिलिपाईन्समध्ये होणाऱ्या याच कार्यक्रमाच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीत भाग घेण्याची संधीही जॉनला मिळाली.जगभरातील सुप्रसिद्ध मॉडेल्सनी भरलेल्या या कार्यक्रमात जॉन अब्राहम चक्क फर्स्ट रनरअप ठरला.

t 01 1555328188

Advertisement

अशा रितीने जॉन आपल्या बॉसच्या सल्ल्यानुसार स्पर्धा जिंकून ग्लेड्रॅग सुपर मॉडेल ऑफ द इयर ठरला. मॉडेलिंगची जगप्रसिद्ध स्पर्धा जिंकल्यानंतर जॉनला मॉडेलिंगच्या असाइनमेंट्स मिळत राहिल्या. सिंगापूर, हाँगकाँग, लंडन आणि न्यूयॉर्कसह जगातील बर्‍याच शहरांमध्ये त्याने मॉडेलिंग केली. पण काही काळानंतर तो विचार करू लागला की, जगभरातील मॉडेलिंग विश्वात त्याची ओळख असली तरीही भारतात मात्र त्याला कोणी इतके ओळखत नाही.

See also  या मालिकेच्या शूटिंग दरम्यान सापडला एक को-रो-ना पॉझिटिव्ह, मालिकेच्या प्रोड्युसरवर...

मग तो आपले नाव भारतात प्रसिद्ध करण्याच्या कल्पनेने आपल्या देशात परत आला. त्यानंतर लवकरच तो भारताचा सर्वाधिक मानधन घेणारा मेल मॉडेल बनला. या क्षेत्रात त्याचे यश पाहून पंजाबी गायक जाझी-बीने त्यांना त्यांच्या ‘सूरमा’ गाण्याच्या म्युझिक व्हिडिओमध्ये त्याला कास्ट केले. दृकश्राव्य क्षेत्रामधील ही त्यांची पहिली आचिवमेंट होती. यानंतर तो पंकज उधास यांच्या चुपके चुपके या गाण्यात दिसला. हे गाणे भारतभर प्रचंड गाजले आणि यासाग गाण्याने त्याचे भारतात लोकप्रिय होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

Advertisement

000 Del69080

जॉनला ‘चुपके चुपके’ मध्ये पाहिल्यानंतर त्याला चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. करण जोहरला त्याची फिल्म ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाद्वारे लाँच करायची होती. पण जॉनने त्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. जर तुम्हाला वाटत असेल की हृतिकच्या भूमिकेत जॉनला कास्ट करण्याची चर्चा आहे, तर तुम्ही चुकीचे आहात.

Advertisement

करणला जॉनला ब्लिंक अँड मिस रोलमध्ये कास्ट करण्याची इच्छा होती. हे पात्र करीनाच्या मित्र रॉबीचे होते. रॉबी या चित्रपटाच्या तीन-चार दृश्यांमध्ये क्वचितच दिसतो. ज्या दृश्यांमध्ये पू ला रोहन जळवायचे असते. शेवटी जॉनने नकार दिल्यानंतर ही भूमिका विकास सेठीने साकारली होती.

See also  धडाकेबाज क्रिकेटर सुनील गावस्कर प्रेमात वेडी झाली होती ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

john

Advertisement

बरं, हे सर्व चालू असताना, जॉनने किशोर नमित कपूरचे अभिनय कोर्सेस जॉईन केले. चित्रपटांमध्ये काम मिळवण्यासाठी मॉडेलना जास्त संघर्ष करावा लागत नाही. जॉनच्या थोडे आधीच अर्जुन रामपाल आणि डीनो मोरिया सारख्या मॉडेल्सनी चित्रपटांमध्ये प्रवेश केला होता.

जॉनचा अभिनय अभ्यासक्रम पूर्ण होताच, तो महेश भट्टच्या जिस्म चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकला. या चित्रपटातील त्याची हिरोईन बिपाशा बासू होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारसे काही केले नाही, पण बोल्ड दृश्यांमुळे फिल्म खूप चर्चा झाली. या सिनेमातील कामांसाठी जॉनला सर्वोत्कृष्ट पुरुष डेब्यू कॅटेगरीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते.

Advertisement

71866616

अशा रितीने बॉसच्या एक चांगल्या सल्ल्याने जॉनचे संपूर्ण आयुष्यच पूर्णपणे बदलून टाकले. असो… तर मित्रांनो!, जॉनच्या आयुष्यातील इतर गमतीजमतीं विषयी सविस्तर पुन्हा कधीतरी…

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close