रेल्वेखाली जीव द्यायला गेलेला मुलगा, रस्त्यावर पेन विकून, लेबरकाम करुन बनला बॉलीवूडचा महान विनोदवीर…

होय मित्रांनो!, एकेकाळी वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी रेल्वे रुळावर आ’त्म’ह’त्या करण्यासाठी झोपलेला मुलगा… रस्त्यावर पेन विकणारा मुलगा… कंपनीत लेबरचे काम करणारा मुलगा… की जो नंतर बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीचा महान विनोदवीर झाला. त्याचे खरे नाव आहे जॉन राव, परंतु फिल्मी जगतात त्याला जॉनी लीव्हर म्हणून ओळखले जाते.

असे नेमके काय घडले की वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी जॉनी रेल्वे रुळावर आ’त्म’ह’त्या करण्यासाठी झोपला? जॉनी पेन विक्रेता कसा काय बनला? आपल्या जॉनी लीव्हरच्या संबंधातील या दोन विशेष गोष्टी तपशीलवार… खास आमच्या वाचकांसाठी.

EiL71GQU8AE Osh

जॉनी लीव्हरचा जन्म १४ ऑगस्ट १९५७ रोजी मुंबई येथे झाला होता. त्यानंतर त्याचे नाव जॉन राव असे ठेवले गेले. त्याच्या जन्माच्या वेळी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. संपूर्ण कुटुंब चाळीमध्ये राहत होते. कालांतराने, त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस वा’ई’ट होत गेली. इतकी की, शेवटी त्याच्या कुटुंबीयांना वास्तव्यासाठी धारावी झोपडपट्टीमध्ये जावे लागले. जॉनचे वडील प्रकाश राव हिंदुस्तान लीव्हर लिमिटेड नावाच्या कंपनीत काम करत होते.

READ  दिव्या भारती सोबत केले होते या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने लग्न, पण काहीच दिवसांत...

जॉन आंध्र एज्युकेशन सोसायटी नावाच्या शाळेत शिकत असे. घरात चूल पेटती राहण्यासाठी, जॉन शाळेतून आल्यानंतरही लहान सहान नोकरी करून पैसे कमवत असे. कारण त्याचे वडील दा’रू पिण्यातच खूप पैसे खर्च करायचे. घरी येऊन शि’वी’गा’ळ आणि मा’र’हा’ण करायचे. परिसरातील कोणाशी तरी ते भां’ड’ण करायचेच. या गोष्टी जॉनला खूप त्रा’स देऊ लागल्या.

johnny Lever

जेव्हा त्याला हे सर्व स’ह’न होईना… अगदीच असह्य झाले, तेव्हा लहानगा जॉनी आ’त्म’ह’त्या करण्याच्या उद्देशाने जवळच्या रेल्वे रु’ळा’वर जाऊन झो’प’ला. पण नंतर त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या कुटूंबातील चेहरे एक-एक करून दिसू लागले.

भ’र’घा’व येणारी ट्रेन अगदी काही अंतरावर होती आणि… शेवटी त्याच्यावर घरच्यांच्या जबाबदारीच्या, कर्तव्याच्या भावनेचा विजय झाला. आ’त्म’ह’त्ये’चा विचार मनातून कायमचा ह’द्द’पा’र केल्यानंतर जॉनी एका नव्या निश्चयाने आणि जिद्दीने घरी परतला… त्यावेळी जॉनी साधारण १३ वर्षांचा असावा.

johnny lever

सातवीनंतर जॉनने शाळेत जाणे बंद केले. त्याला कुटुंबासाठी पैसे कमवायचे होते. जॉनी उत्तम नृत्य-नकला, विनोद वगैरे करायचा. विनोद करतांना तो हिंदी फिल्म स्टार्सची जबरदस्त मिमिक्री करायचा. झोपडपट्टीत काही घरगुती शुभकार्य, उत्सव इ. असल्यास लोकं जॉनला मनोरंजनासाठी तिकडे घेऊन जायचे. त्याला या कामाच्या बदल्यात एक किंवा दोन रुपये मिळायचे.

READ  बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोनी भी'ती'ने वैनिटी वॅनमध्ये लपून बसली; त्यानंतर जे घडले ते ऐकून तर विश्वास बसणार नाही...

त्याच्या झोपडपट्टीशेजारी एक सिंधी छा’व’णी होती. तेथे प्रताप जानी आणि राम कुमार असे दोघेजण राहत होते. ते जॉनला मिमिक्री वगैरे शिकवत असत. जॉन त्यांनाच त्याचा पहिला गुरू मानतो. एक दिवस जॉन, प्रताप आणि राम कुमार कुठेतरी जात होते. त्यांना जाताना पाहून सिंधी छा’व’णी’त बसलेल्या एका व्यक्तीने जॉनला सांगितले की, तू या दोन लोकांसोबत राहू नये. त्यांच्या सोबत राहून तू सुद्धा दा’रु’डा होशील.

rd25v0qbnfr7bzi8 1612182443

दा’रु’ड्या’ची अवस्था काय असते हे वडिलांमुळे जॉन ने अनुभवले होते. या नवीन सिंधी व्यक्तीने जॉनला स्वतःसाठी काहीतरी करण्याचा स’ल्ला दिला. जॉनने त्यालाच विचारले, काय करावे? तर तो म्हणाला की मी पेन विकतो. तू करशील का पेन विक्री? जॉनी म्हणाला, मला तुम्ही शिकवाल तर मी नक्की करेल. मग त्या गृहस्थाने जॉनीला पेन विक्री करण्यासाठी सोबत घेतला. पुढचे तीन महिने जॉनराव त्याच्या बरोबर रस्त्यावर बसला आणि पेनची विक्री केली.

READ  विराट आणि अनुष्का ठेवणार आहेत त्यांच्या बाळाला फिल्मी दुनिये पासून दूर, कारण ऐकून थक्क व्हाल!

येथे जॉनला आपल्या कलेचे सोने करण्याची संधी आणि वेळ दोन्ही मिळत होते. तो ग्राहकांशी सुप्रसिद्ध फिल्मस्टार्सच्या आवाजात बोलत असे. परंतु यामुळे झाले असे की, ज्या माणसाने पेन विक्रीच्या व्यवसायात जॉनला उतरविले होते, त्याचाच व्यवसाय कमी होऊ लागला. कारण आता त्याचा प्रत्येकजण आपल्या आवडत्या फिल्मस्टार्स कडून पेन विकत घेण्याचा फील घेण्यासाठी जॉनकडूनच पेन विकत घेऊ लागला.

EVZG QIVAAE D6Q

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment