जॉनी लिव्हरची दोन्ही मुलं आहेत लंडन उच्चशिक्षित, मुलगी आहे खूपच सुंदर आणि मुलाची आहे सिक्सपॅक बॉडी…
बॉलिवूडमध्ये खऱ्या अर्थाने कॉमेडी किंग म्हणून जर कोणी लोकप्रिय असेल तर तो म्हणजे जॉनी लिव्हर. सन १९८४ मध्ये जॉनीने आपल्या फिल्म करिअरची सुरुवात केली होती. आजवर त्याने जवळपास ३०० पेक्षा जास्त फिल्म्स मधे काम केले आहे.
आपल्या जबरदस्त कॉमेडी रोल्स साठी त्याला चक्क १३ वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेले आहे. त्याच्या सर्वच फिल्म्स मधून जॉनीने फिल्मी रसिकांचे पुरेपूर मनोरंजन केलेले आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की आता बॉलिवूडच्या फिल्म इंडस्ट्रीत लवकरच जॉनी लिव्हरच्या मुलाची एन्ट्री होणार आहे.
होय!, कॉमेडी किंग जॉनी लिव्हरचा मुलगा फिल्म इंडस्ट्री मधे येण्यास सज्ज झाला आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचे फोटोज खूपच व्हायरल होत आहेत. शर्ट लेस होऊन, सिक्स पॅक्स ऍब्ज दाखवतानाचे फोटो शूट करून त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
आज या लेखातून तुम्हाला जॉनी लिव्हरच्या दोन्ही मुलांची ओळख आम्ही करून देणार आहोत. तर जॉनी लिव्हरच्या मुलाचे नाव आहे जेसी. तो एक उत्कृष्ट म्युझिक कंपोझर म्हणजेच संगीतकार आहे. तसे आत्तापर्यंत जेसीने बॉलिवूडच्या फिल्म्स मधून छोट्या भूमिका केल्या असल्या तरी . सूत्रांच्या माहितीनुसार आता लवकरच तो बॉलिवूड फिल्म्स मधे लीड रोल करत पर्दापण करणार असल्याचे समजतंय. सध्या जेसी एका दमदार रोलच्या शोधात आहे कारण त्याची बॉलीवूड मधील एंट्री धु’म’ध’डा’क्या’त करायची असे त्याचे ठरलंय.
१२ वर्षाचा असतांना जेसीच्या गळ्याला मोठा ट्यु’म’र होता. कालांतराने त्याचे कॅ’न्स’रमध्ये रूपांतर झाले. परदेशात त्याच्यावर अनेक वर्षे उ’प’चा’र झाले. कॅ’न्स’र सारख्या आ’जा’रातून बाहेर आल्यानंतर त्याने शिक्षण पूर्ण केले. नंतर लंडनमध्ये ह्युमन रिसोर्सेस मध्ये डिग्रीही पूर्ण केली. जेसी हा त्याच्या वडिलांप्रमाणेच गुणी अभिनेता आणि एक चांगला मिमिक्री आर्टिस्ट देखील आहे.
सध्या जेसी आपल्या मस्क्युलर लुक्स साठी सोशल मीडियावर खूप जास्त चर्चेत असतो. ‘कभी खुशी कभी गम’ या फिल्म मधे जेसीने आपल्याच वडिलांची म्हणजेच जॉनी लिव्हरच्या लहानपणीची भूमिका निभावली होती. सध्या जेसी स्वतःला फिजिकली फिट ठेवण्यासाठी जिम मध्ये खूप मेहनत घेत आहे. त्याने कष्टाने आकर्षक बॉडी बनवली आहे. सध्या त्याला फिल्म्सच्या ऑफर्स सुद्धा येणे चालू झाले आहे.
सरावासाठी तो छोटे रोल्सही करतोय परंतु लीड रोल साठी त्याला हवंय एक चांगले तगडे स्क्रिप्ट. नुकताच जेसीने ह्रितिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘वॉर’ चित्रपटांत छोटीशी भूमिका केली होती. त्याने सैफ अली खानसोबत ‘लाल कप्तान’ फिल्म मधेही रोल केलाय. आगामी काळात जेसीचे नवीन चित्रपट प्रदर्शित होतील.
“जॅमी लिव्हर” हे आहे जॉनी लिव्हरच्या मुलीचे नाव. जॉनी प्रमाणेच ती भारतीय स्टँडअप कॉमेडियन आणि फिल्म ऍक्टर आहे. १० सप्टेंबर १९८० ला मुंबई मधे जॅमीचा जन्म झाला. सुरुवातीचे शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण केल्यानंतर तिनेही लंडन युनिव्हर्सिटी मध्ये मार्केटिंग कम्युनिकेशन मध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली. आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात जॅमीने स्टँडअप कॉमेडियन म्हणूनच केली.
‘कॉमेडी सर्कस के महाबली’ ह्या सोनी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय कॉमेडी शो मधे सुद्धा तिने आपल्या कॉमेडीची छा’प पा’ड’ली. फिल्म इंडस्ट्री मधील प्रथितयश निर्माते निर्देशक अब्बास मस्तान ह्यांच्या ‘किस किसको प्यार करू’ या फिल्म मधून तिने आपल्या अभिनय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. योगायोग असा की, याच फिल्म मधून कॉमेडी स्टार कपिल शर्मानेही आपल्या बॉलीवूड करिअरची सुरुवात केली. जॅमीने ‘राष्ट्रपुत्र’ ‘हाऊसफुल ४ ‘या फिल्म मधेही रोल केलेला आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.