बच्चन कुटुंबासाठी असे ट्विट केल्यामुळे सोशल मीडियावर अभिनेत्री जुही चावला यांच्यावर होत आहे ट्रोल, जाणून घ्या काय आहे कारण

.

देशातील कोरोनाची गती वेगाने वाढत आहे आणि आता शतकातील महान नायकही त्यात अडकला आहे जेव्हापासून लोकांना अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली तेव्हापासून लोकांमध्ये चिंता वाढत आहे.

बच्चन कुटुंबीयांचे आरोग्य सुधारण्याची चाहत्यांकडून सतत शुभेच्छा मिळत आहेत तसेच सुपरहिरो आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी लवकरच बरे व्हावे यासाठी बॉलिवूड आणि स्पोर्ट्स स्टार ही प्रार्थना करत आहेत. नुकतीच अभिनेत्री जूही चावलानेही बच्चन कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत ट्विट केले होते तथापि त्यांनी ट्विटमध्ये असे काही लिहिले ज्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर खूप ट्रोलिंग झाली.

वास्तविक जूहीने ट्विटरवर अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बरे होण्याच्या शुभेच्छा देत लिहिले होते की अमित जी अभिषेक आयुर्वेद लवकरच बरी होतील बघा. आयुर्वेद मुळे लोकांचा गैरसमज झाला आणि ज्यामुळे तिच्या ट्विट वर खूप ट्रोल केले गेले. एका चाहत्याने लिहिले हा आयुर्वेद कोण आहे तर एकाने लिहिले की त्यांना सोडा तुमची लक्षणेही ठीक नाहीत तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या.

ट्रोल झाल्यानंतर जुहीने हे ट्विट त्वरित डिलीट केले यानंतर जूही यांनी पुन्हा ट्विट केले, अमित जी, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या तुम्ही सर्व लवकर बरे व्हावे हीच प्रार्थना. माझ्या आधीच्या ट्विटमध्ये कोणतीही चूक नव्हती जेव्हा मी आयुर्वेद लिहिले होते तेव्हा त्याचा अर्थ असा होता की निसर्ग आपल्याला लवकच बरे करेल.

मिळालेल्या माहितीनुसार की शनिवारी रात्री अमिताभ बच्चन यांना नानावती हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याच्या बातमीने चाहत्यांना आ श्चर्य चकित केले. यानंतर अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट केले की मला कोरोना झाला आहे काही काळानंतर अभिषेक बच्चनही कोरोना पॉझिटिव्ह म्हणून बातमी आली. दुसर्‍या दिवशी जेव्हा संपूर्ण कुटुंबाची पुन्हा टेस्ट झाली तेव्हा ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले मात्र जया बच्चन यांचा अहवाल निगेटिव आला आहे.

अभिषेक बच्चन यांनी ट्विटद्वारे चाहत्यांना माहिती दिली त्यांनी लिहिले आहे की ऐश्वर्या आणि आराध्याचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. ते दोघेही घरात अलग राहतील त्यांची माहिती बीएमसीला दिली आहे बाकीच्या सर्व सदस्यांचा आणि माझ्या आईचा अहवाल निगेटिव्ह आला आहे कृपया तुम्ही काळजी घ्या आणि सर्व नियम पाळा आपण सर्वांनी आमच्या साठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment