जेव्हा गौरी खानच्या भावाने शाहरुख खानला दिली होती जिवंत मा’रण्याची ध’मकी, तेव्हा शाहरुखने…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील किंग खान म्हणून प्रसिद्धीत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा “दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे” हा चित्रपट आपण सर्वांनी पाहिला आहे. यामध्ये राज हा सिमरन सोबत लग्न करण्यासाठी काय काय करत नाही बरं, हे तर बघितले. पण मित्रांनो तुम्हांला माहित आहे का, “दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे” या चित्रपटात राज- सिमरन यांची जशी लव्हस्टोरी आहे. अगदी तशीच शाहरुख खान व गौरी यांचीही रोमॅन्टिक लव्हस्टोरी आहे. अभिनेता शाहरुख खान आणि गौरी यांच्या लव्हस्टोरी मध्ये देखील खूप- खूप प्रॉ’ब्ले’म्स आले. तेव्हा कुठे ते दोघेही लवबर्ङ एकमेकांचे झाले. वेगवेगळे धर्म, कुटुंबाची बंधने अशा अनेक स’म’स्यां’ना या क्यूट कपलने तोंड दिले आहे.

75441694

शाहरुख व गौरीची पहिली- वहिली भेट 1984 मध्ये दिल्लीतील पंचशील क्लब मधील पार्टीत झाली. तेव्हा या अदाकारी शाहरूखला गौरी एका नजरेत पाहताच आवडली. त्यानंतर गौरीच्या प्रत्येक पार्टीत शाहरूख न बोलावता सर्वांत आधी जात असे. त्यानंतर 25 ऑगस्ट 1984 ला तिसऱ्याच भेटीत त्याने गौरीचा फोन नंबर तर मिळवला आणि तिला प्रपोज केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गौरीने सुद्धा लगेचच होकार दिला. त्यांच्या प्रेमाच्या गुटर्गु मध्ये पाच वर्षे उ’ल’टू’न गेली.

शाहरुखला अभिनेता बनायचे होते, मात्र गौरी त्याच्या या निर्णयाच्या एकदम वि’रो’धा’त होती. त्यामुळे ती त्याच्याशी तु’ट’क- तु’ट’क राहू लागली. एव्हाना शाहरूख गौरी मध्ये पूर्णपणे गुं’ग झाला होता. पण तो आपला निर्णय बदलत नसल्याने त्या नात्यात गौरीचा जीव घु’स’म’टा’य’ला लागला. आपल्या वयाच्या शाहरूखच्या नात्याचे भविष्य काय असेल, हा विचार तिला सतावू लागला.

See also  अभिनेत्री मिताली मयेकर लंडनच्या ट्रिपवर जाऊन करतीये, मुंबईतील फेमस मित्रांची टिंगल

SRK 1

त्याच दरम्यान गौरीचा 19 वा वाढदिवस आला. शाहरुखने आपल्या गौरीसाठी संपूर्ण रूम सुंदर सजवली व तिच्यासाठी भरपूर गिफ्ट्स सुद्धा आणून ठेवले. आपल्यासाठी शाहरूखचे असलेले एवढं वेडं प्रेम पाहून तिला अक्षरशः अश्रू कोसळले. परंतु गौरी का र’ड’त आहे, याचे कारण मात्र शाहरुखला समजू शकले नाही. दुसऱ्या दिवशी ती काहीही न सांगता अचानक शहराबाहेर निघून गेली. त्यामुळे शाहरुख खूप टेन्शन मध्ये आला.

एक दिवस गौरीचा पत्ता मिळवण्यासाठी शाहरुखने तिच्या घरी मुलीच्या आवाजात फोन केला. तेव्हा तिच्या घरच्यांनी ती मुंबईत आहे, असे तर सांगितले. पण तिचा पत्ता मात्र मुळीच दिला नाही. शाहरूखला चिंतेत पाहून त्याच्या आईने त्याला ताबडतोब 10000 रु. दिले व तू ज्या मुलीवर प्रेम करतोस, तिला ताबडतोब घेऊन ये, असे सांगितले. “दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे” या चित्रपटातील हा सीन शाहरूख च्या लाइफ मध्ये अगदी छान जु’ळू’न आला. मग शाहरुख जगाची पर्वा न करता आपल्या गौरीला शोधायला निघाला.

 

दुसऱ्या दिवशी त्याने ताबडतोब मुंबई गाठली. शाहरुखला एवढंच माहीत होते की, गौरीला समुद्रकिनारी फिरायला खूप आवडते. मात्र तरीही कोणताही पत्ता माहीत नसताना गौरीचा शोध घेणे, हे खूप कठीण होते. गौरीच्या शोधात शाहरूखला स्टेशनवर, रस्त्यांवर असे राहावे लागत होते, कारण मुंबईत त्यांचे कुणीही नातेवाईक नव्हते.

एकामागोमाग एक दिवस असेच जाऊ लागले, पण गौरीचा ठावठिकाणा काही लागेना. आईने दिलेले सर्व पैसे सुद्धा आता संपू लागले होते. शेवटी शाहरुखने आपला एक किमती कॅमेरा गौरीसाठी 4000 किंमतीला विकला. शेवटी एक दिवस शाहरुखला त्याची गौरी दिसलीच. त्याला पाहताच गौरी त्याला मिठी मारत जोरजोरात र’डू लागली. मग तो तिला घेऊन दिल्लीला परतला.

See also  नवऱ्याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने अखेर कबूल केली चूक, म्हणाली, "काही हरकत नाही चूक मोठी नाही"

Shah Rukh Khan

एव्हाना शाहरूखला बरेचसे लोक ओळखू लागले होते. पण एक दिवस गौरीच्या आई- वडिलांना आपल्या मूलीचे एका दुसऱ्या जातीच्या मुलासोबत रिलेशन असल्याचे समजताच त्यांना खूप मोठा ध’क्का बसला. शाहरुख व आपल्या नात्यात निर्माण होणाऱ्या स’म’स्ये’मुळे गौरी खूप चिंतेत होती. तर दुसरीकडे शाहरूखचे शूटिंगसाठी मुंबईला जाणे, तिला मान्य नव्हते. शाहरुख पण आपली आई आणि गौरी यांना सोङून मुंबईला कायमचा जाऊ शकत नव्हता. 1991 मध्ये शाहरूखची आई फातिमा यांचे एका आजाराने अकस्मात निधन झाले. आईच्या मृ’त्यू’मुळे तो अगदी एकटा पडला. पुढे दोन हप्त्यांनी तो कायमचा मुंबईत शिफ्ट झाला.

पुढे गौरी व शाहरुखने आपल्या लग्नासाठी आई- वडिलांना सांगायचे ठरवले. त्यासाठी शाहरुखने आधी गौरीच्या मामा- मामींना मनवायचे ठरवले व त्यांनी पहिल्या भेटीतच त्यांना इम्प्रेस केले. आपल्या घरी लवकरच एक पार्टी आहे, त्या पार्टीमध्ये तू पण ये आणि गौरीच्या मम्मी- पप्पांना भेट असे त्यांनी सांगितले. ठरल्याप्रमाणे त्या पार्टीमध्ये आल्यावर शाहरुखला बहुतेक लोकांनी ओळखले.

 

तेव्हा गौरीचा वङील पण शाहरूखला पाहून खुश झाले. मात्र जेव्हा त्यांना समजले की, तो मुस्लिम आहे. तेव्हा मात्र त्यांनी त्याला ह’क’ल’वू’न लावले. तेव्हा तर शाहरुखने तिथून जायचे ठरविले. पण तो जाताना गौरीच्या आईचे किचनमध्ये जाऊन खूप स्वादिष्ट भजी दिलीत, त्यासाठी त्यांचे आभार मानले. त्यामुळे मिसेस छब्बा तर इम्प्रेस झाल्या.

या दोघांच्याही घरी खूपच तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. कारण शाहरुख हा मुस्लिम धर्मीय होता तर गौरी ही ब्राह्मण धर्मीय होती. इतकंच नव्हे तर, एका अभिनेत्यासोबत लग्न केल्यावर गौरीचे भविष्य तरी कसे असणार? यासाठी त्यांचा वि’रो’ध होता.

See also  रणवीर सोबतच्या ब्रेकअप बद्दल कतरीना कैफने केला मोठा खुलासा, म्हणाली "रणबीरने...

Vikrant Chibber Images 2

याच दरम्यान गौरीच्या भावाने शाहरूखला फोनवरून जी’वं’त मा’र’ण्या’ची ध’म’की सुद्धा दिली. मग शाहरुख आपल्या “च’म’त्का’र” या चित्रपटासाठी मुंबईला निघून आला. घरातील या त’णा’व’पू’र्ण वातावरणामुळे गौरीच्या आईने एक दिवस झोपेच्या गो’ळ्या खा’ल्ल्या. लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेल्याने त्यांचा जी’व वाचला. या प्रसंगामुळे गौरी व शाहरुख कमजोर नाही पडता आणखी मजबूत झाले व त्यांनी को’र्ट’मॅ’रे’ज करण्याचा निर्णय घेतला.

कोर्टात लग्नासाठी अर्ज दिल्यावर त्यांना 30 दिवसांत लग्न करायचे होते. त्यामुळे त्यांना काहीही करून घरच्यांना तयार करायचे होते. गौरीचे आई- वडील समजून चुकले की, हे दोघेही काही केल्या मुळीच ऐकणार नाही. शेवटी त्यांनी शाहरूख- गौरीच्या विवाहाला आपली संमती दिली. मग 26 ऑगस्ट 1991 ला गौरी व शाहरुखने रजिस्टर पद्धतीने लग्न केले. त्यानंतर त्यांचा निकाह सुद्धा झाला. ज्यामध्ये गौरीचे नाव “आएशा” असे होते. त्यानंतर 25 ऑक्टोंबर 1991 ला गौरी व शाहरुखने हिंदू रीति- रिवाजाप्रमाणे लग्न केले आणि सात जन्मांच्या रेशीमगाठीत शाहरुख व गौरी बांधले गेले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment